राष्ट्रीय

June 19, 2024 8:53 PM June 19, 2024 8:53 PM

views 8

खरीप हंगामासाठी केंद्रीय मंत्रीमंडळाची १४ पीकांच्या MSPला मंजुरी

खरीप हंगामासाठी १४ पीकांसाठीच्या MSP अर्थात किमान आधारभूत किंमतीला केंद्रीय मंत्रीमंडळानं आज मंजुरी दिली. उत्पादन खर्चाच्या तुलनेत ही किंमत किमान ५० टक्क्यांनी अधिक असेल याची खबरदारी घेतल्याचं माहिती प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितलं. धान, कापूस, ज्वारी, नाचणी, बाजरी, म...

June 19, 2024 8:51 PM June 19, 2024 8:51 PM

views 21

देशाला २०४७ पर्यंत विकसित करण्यात ज्ञान महत्त्वाची भूमिका बजावेल – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

२०४७ पर्यंत देशाला विकसित करण्यात ज्ञान महत्त्वाची भूमिका बजावेल, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. बिहारमधल्या राजगीर इथं नालंदा विद्यापीठाच्या नव्या कॅम्पसच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. भारतीय शिक्षण आणि ज्ञान पद्धती मजबूत करुन भारत सुपर पावर बनू शकतो. जगाला भारताची ओळख आण...

June 19, 2024 8:38 PM June 19, 2024 8:38 PM

views 15

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत ३ जुलैपर्यंत वाढ

दिल्ली उत्पादन शुल्क धोरणाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात दिल्ली विशेष न्यायालयानं आज दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत ३ जुलैपर्यंत वाढ केली आहे. न्यायालयीन कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यांना तिहार तुरुंगातून दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून न्यायालयात हजर करण्यात आलं. ...

June 19, 2024 8:36 PM June 19, 2024 8:36 PM

views 8

औष्णिक विद्युत केंद्रांमध्ये कोळशाचा मुबलक साठा उपलब्ध – कोळसा मंत्रालय

देशात कोळशापासून तयार होणाऱ्या ऊर्जेची मागणी यावर्षी ७ पूर्णांक ३ दशांश टक्के वाढली असून, देशातल्या औष्णिक विद्युत केंद्रांमध्ये कोळशाचा मुबलक साठा असल्याचं कोळसा मंत्रालयानं म्हटलं आहे. औष्णिक विद्युत केंद्रांमध्ये साडे चार कोटी टन इतका कोळसा उपलब्ध आहे. तर देशातला एकूण कोळसा साठा साडे चौदा कोटी मे...

June 19, 2024 8:31 PM June 19, 2024 8:31 PM

views 11

केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा यांनी घेतला उष्णतेच्या लाटेचा आढावा

केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा यांनी आज देशातल्या उष्णतेच्या लाटेची परिस्थिती आणि रुग्णालयांच्या तयारीचा आढावा घेतला. तसंच या रुग्णालयांमध्ये विशेष कक्ष निर्माण करण्याचे निर्देश दिले. राम मनोहर लोहिया रुग्णालयातील वैद्यकशास्त्राचे प्राध्यापक डॉ. अजय चौहान यांनी बातमीदारांना ही माहिती दिली. उष्णत...

June 19, 2024 9:07 PM June 19, 2024 9:07 PM

views 9

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची विशेष मुलाखत २० जून रोजी सकाळी ८.४५ वा. आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून प्रसारित

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची विशेष मुलाखत उद्या सकाळी पावणे ९ वाजता आकाशवाणी गोल्डसह देशभरातल्या आकाशवाणी केंद्रांवरुन प्रसारित होईल. राष्ट्रपतींच्या वाढदिवसानिमित्त माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी ही मुलाखत घेतली आहे. आकाशवाणीचं युट्युब चॅनल आणि इतर सोशल मीडियावरही ही मुलाखत ऐकता येईल.

June 19, 2024 8:44 PM June 19, 2024 8:44 PM

views 2

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली पहिली अर्थसंकल्पपूर्व बैठक

अर्थसंकल्पावर अर्थतज्ञांच्या सूचना आणि सल्ला घेण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली इथं आज पहिली अर्थसंकल्पपूर्व बैठक संपन्न झाली. या बैठकीला केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी, तसंच वित्त, आर्थिक व्यवहार, महसूल, वित्तीय सेवा आणि कॉर्पोरेट व्यवहार विभागांचे सचिव आण...

June 19, 2024 2:33 PM June 19, 2024 2:33 PM

views 3

टपाल कचेरी कायदा, २०२३ कालपासून अंमलात

टपाल कचेरी कायदा, २०२३ कालपासून अधिकृतरीत्या अंमलात आला आहे. तो आता १८९८ च्या भारतीय टपाल कचेरी कायद्याची जागा घेणार आहे. देशाची सुरक्षा आणि सार्वजनिक सुव्यवस्था राखण्यासाठी किंवा तसं ठोस कारण असल्यास टपालामार्फत पोहोचवण्यात येणारी पार्सल वाटेतच रोखण्याचा अधिकार टपालखात्याला देण्याची तरतूद या नव्या ...

June 19, 2024 1:41 PM June 19, 2024 1:41 PM

views 44

आदिवासी समुदायाचं भारतीय अर्थव्यवस्थेत मोठं योगदान – उपराष्ट्रपती जगदीप धनखड

आदिवासी समुदायाचं भारतीय अर्थव्यवस्थेत मोठं योगदान असून आदिवासी आपली ओळख आहेत, असं प्रतिपादन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केलं. मध्यप्रदेशातल्या दिंडोरी इथं जागतिक सिकल सेल निर्मूलन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते आज बोलत होते.   सिकलसेल आजाराचं निर्मूल करण्यासाठी सरकार कटिबद्ध असून २०४७ मध्...

June 19, 2024 1:39 PM June 19, 2024 1:39 PM

views 6

आरबीआयची तिसरी जागतिक हॅकेथॉन “HaRBinger 2024″मधे नोंदणीसाठी आज शेवटचा दिवस

भारतीय रिझर्व्ह बँकेनं तिसरी जागतिक हॅकेथॉन "HaRBinger 2024" चं आयोजित केली असून आज याच्या नोंदणीचा शेवटचा दिवस आहे. इच्छुकांनी नोंदणी आणि त्यांचे प्रस्ताव https://app.apixplatform.com/h1/harbinger2024 या संकेतस्थळावर नोंदवावेत असं आवाहन आरबीआयनं केलं आहे.   अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत आर...