राष्ट्रीय

July 16, 2024 3:36 PM

views 23

नीट पेपर फुटी प्रकरणी झारखंडमध्ये एकाला अटक

नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआयने काल रात्री झारखंडमधे हजारीबाग इथल्या एका गेस्ट हाऊसमधून एकाला अटक केली आहे. त्याच बरोबर हजारीबाग इथून अटक झालेल्यांची संख्या ५ झाली आहे. या व्यक्तीच्या ताब्यातून महत्त्वाची कागदपत्रं जप्त केल्याचं सीबीआयनं सांगितलं आहे.

July 16, 2024 3:24 PM

views 22

सरकारची पाचवी सकारात्मक स्वदेशीकरण यादी प्रसिद्ध

संरक्षण क्षेत्रातली आयात कमी करून आत्मनिर्भरतेवर भर देण्याच्या उद्देशानं सरकारनं पाचवी सकारात्मक स्वदेशीकरण यादी प्रसिद्ध केली आहे. लाइन रिप्लेसमेंट युनिट्स, सुटे भाग, कच्चा माल अशा एकंदर ३४६ वस्तूंचा समावेश या यादीत आहे. याचं आयात मूल्य एक हजार कोटी रुपयांपेक्षाही जास्त आहे. यापूर्वी या वस्तू फक्त ...

July 16, 2024 3:25 PM

views 42

पॅलेस्टाइनमधल्या निर्वासितांसाठी 25 लाख डॉलरच्या निधीचा पहिला हप्ता भारताकडून जारी

भारतानं पॅलेस्टाइनमधल्या निर्वासितांसाठी 25 लाख डॉलरचा निधीचा पहिला हप्ता काल संयुक्त राष्ट्रांच्या मदत संस्थेकडे म्हणजे यूएनआरडब्ल्यूएकडे काल जारी केला. भारतानं 2024-25 या वर्षात पन्नास लाख डॉलर मदत देण्याचं जाहीर केलं आहे. पॅलेस्टाइनमधल्या निर्वासितांसाठी औषधं, शिक्षण, मदत आणि सामाजिक सेवा यांच्या...

July 16, 2024 2:59 PM

views 21

वस्तू आणि सेवा निर्यातीत ५ पूर्णांक ४ दशांश टक्के वाढ

 देशाची वस्तू आणि सेवा निर्यात जून महिन्यात ५ पूर्णांक ४ दशांश टक्क्यांनी वाढून ६५ अब्ज ४७ कोटी डॉलरवर पोहोचली आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीत ही माहिती देण्यात आली. चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल ते जून या तिमाहीत निर्यात ८ पूर्णांक ६ दशांश टक्क्यांनी वाढून २०० अब्ज ३३ को...

July 16, 2024 2:58 PM

views 23

तेलंगण सरकारकडून शेतकरी कर्जमाफीच्या अंमलबजावणीसाठी नियमावलींची अधिसूचना प्रसिद्ध

तेलंगण सरकारनं शेतकरी कर्जमाफीच्या अंमलबजावणीसाठी नियमावलींची अधिसूचना काल प्रसिद्ध केली. शेतकऱ्यांच्या एका कुटुंबाला दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी देण्यात येणार आहे, असं या नियमावलीत नमूद करण्यात आलं आहे. शेतकरी कुटुंब निश्चित करण्यासाठी नागरी पुरवठा विभागानं दिलेली अन्नसुरक्षा पत्रिका ग्राह्य धर...

July 16, 2024 8:01 PM

views 19

साक्षीदारांच्या चौकशीसाठी पोलीसांच्या अखत्यारीतली जागा न निवडण्याचे केंद्रिय गृह मंत्रालयाचे सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना निर्देश

गुन्ह्याचा तपास करताना साक्षीदारांची चौकशी करण्यासाठी पोलीस ठाण्यातली किंवा पोलीस विभागाच्या अखत्यारीतली जागा निवडू नये असं केंद्र सरकारने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना सांगितलं आहे.केंद्रीय गृहमंत्रालयाचे सचिव अजय भल्ला यांनी या संदर्भात सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवां...

July 16, 2024 3:01 PM

views 32

जम्मू-काश्मीरच्या डोडा जिल्ह्यात सुरक्षा दलाचे ५ जवान शहीद

जम्मू-काश्मीरच्या डोडा जिल्ह्यात काल रात्री दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत गंभीर जखमी झालेल्या पाच सुरक्षादल जवानांचा आज मृत्यू झाला. यात लष्कराच्या एका अधिकाऱ्याचाही समावेश आहे. या भागात दहशतवाद्यांचा वावर असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर राष्ट्रीय रायफल्स आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या विशेष कार्य...

July 16, 2024 2:51 PM

views 22

अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणी फेरविचार याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली

अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणी तपासासाठी विशेष तपास पथक किंवा तज्ज्ञांचं पथक नेमण्याची मागणी फेटाळून लावण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाबाबत फेरविचाराची विनंती करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं काल फेटाळून लावली. सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती जे. बी. पर्दिवाला आणि न्यायमूर्ती...

July 16, 2024 1:20 PM

views 29

अमित शहा नवी दिल्लीत अमली पदार्थविषयक समन्वय केंद्राच्या 7व्या शिखर परिषदेचे अध्यक्षस्थान भूषवणार

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा नवी दिल्लीत अमली पदार्थविषयक समन्वय केंद्राच्या सातव्या शिखर परिषदेचं अध्यक्षस्थान भूषवणार आहेत.गुरुवारी होणाऱ्या या परिषदेत अमित शहा अमली पदार्थ प्रतिबंध माहिती केंद्र म्हणजे मानस या हेल्पलाइनचं उद्घाटन करणार आहेत.   अंमली पदार्थ नियंत्रण विभागाच्या श्रीनगर विभागीय ...

July 16, 2024 11:14 AM

views 16

विमानप्रवास अधिक सुलभ आणि सर्वांना परवडणारा करण्याला सरकारचं प्राधान्य -किंजरापू राममोहन नायडू

विमानप्रवास अधिक सुलभ आणि सर्वांना परवडणारा करणं याला सरकारचं प्राधान्य असून, विमान वाहतूक सर्वदूर नेण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे, असं केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री किंजरापू राममोहन नायडू यांनी काल नवी दिल्ली इथं सांगितलं. दुसऱ्या आशिया पॅसिफिक मंत्रिस्तरीय परिषदेच्या पूर्वतयारीनिमित्त आयोजित ...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.