राष्ट्रीय

June 21, 2024 1:35 PM June 21, 2024 1:35 PM

views 12

नवी दिल्लीत संसदभवन इथं योगसत्राचे आयोजन

नवी दिल्लीत संसदभवन इथं आज विशेष योग सत्र आयोजित करण्यात आलं होतं. त्याचं नेतृत्व लोकसभेचे माजी सभापती ओम बिर्ला यांनी  केलं. योगाभ्यास हा मानवी आयुष्याचा पाया बनला असून त्यानं सगळ्या सांस्कृतिक सीमा ओलांडल्या आहेत, असं ते यावेळी म्हणाले.  केंद्रीय परराष्ट्रव्यवहार मंत्री एस जयशंकर, आरोग्य मंत्री जे...

June 21, 2024 1:20 PM June 21, 2024 1:20 PM

views 14

जगातील सर्वात उंच चिनाब पुलावर ८ डब्यांच्या मेमू रेल्वेची यशस्वी चाचणी

भारतीय रेल्वेनं काल जम्मू काश्मिरमधल्या जगातील सर्वात उंचीवरच्या चिनाब पुलावर आठ डब्यांच्या मेमू रेल्वेची यशस्वी चाचणी केली. ही चाचणी यशस्वी झाल्यामुळे जम्मू काश्मिरमधील राईसी ते बारामुल्ला दरम्यान रेल्वे वाहतूक सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. रामबान जिल्ह्यातल्या संगलदान पासून ते रईसी दरम्यान ४...

June 21, 2024 12:17 PM June 21, 2024 12:17 PM

views 13

लखबीर सिंग संधू दहशतवाद्याशी संबंधित प्रमुख दहशतवाद्याला अटक

बब्बर खालसा इंटरनॅशनल या बंदी घालण्यात आलेल्या दहशतवादी संघटनेवर कारवाई करत राष्ट्रीय तपास संस्था अर्थात एनआयएने पंजाबमधील फिरोजपूर येथून लखबीर सिंग संधू या दहशतवाद्याशी संबंधित असलेल्या, जसप्रीत सिंग या आणखी एका प्रमुख दहशतवाद्याला अटक केली आहे. त्याच्याकडून शस्त्रास्त्र तसंच अंमली पदार्थ आणि दोन ल...

June 21, 2024 11:35 AM June 21, 2024 11:35 AM

views 11

दिल्लीमध्ये उष्णतेची लाट !

दिल्लीमध्ये गेल्या २४ तासात उष्माघातामुळे सफदरगंज रुग्णालयात ६ रुग्ण भरती झाले होते. त्यापैकी दोनरुग्णांचा मृत्यू झाला आहे तर तीन जणांची प्रकृती चिंताजनक आहे. उष्णतेच्या त्रासाशीसंबंधित ४७ रुग्ण सध्या रुग्णालयात दाखल असून त्यापैकी २९ जणांची प्रकृती चिंताजनकआहे. १६ जूनपासून उष्णतेशी संबंधित आजारांमुळ...

June 21, 2024 10:20 AM June 21, 2024 10:20 AM

views 18

लोकसभा निवडणूक : ईव्हीएम यंत्राची पडताळणी करण्यासाठी निवडणूक आयोगाकडे ८ अर्ज दाखल

२०२४च्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या निकाल जाहीर झाल्यानंतर, ईव्हीएम यंत्राची पडताळणी करण्यासाठी काही राजकीय पक्षांच्या उमेदवारांकडून निवडणूक आयोगाकडे आठ अर्ज दाखल झाले आहेत. महाराष्ट्रातून अहमदनगर लोकसभा मतदारसंघातले पराभूत उमेदवार डॉ.सुजय विखे पाटील यांच्या अर्जाचाही यात समावेश आहे. तसंच तामिळन...

June 21, 2024 10:09 AM June 21, 2024 10:09 AM

views 7

अरविंद केजरीवाल यांना मद्य घोटाळ्याशी संबंधित प्रकरणामध्ये जामीन मंजूर

दिल्लीचे मुख्यमंत्री तसंच आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना मद्य घोटाळ्याशी संबंधित प्रकरणामध्ये दिल्लीच्या राऊस ॲव्हेन्यू कोर्टाने काल जामीन मंजूर केला. याआधी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी त्यांना अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला होता. मात्र, पुन्हा त्यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली हो...

June 21, 2024 10:05 AM June 21, 2024 10:05 AM

views 13

नीट परिक्षेसंबंधीत चौकशी करण्याची उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्याची घोषणा

वैद्यकीय प्रवेशासाठीची राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा-नीट २०२४ संबंधीत मुद्यांची चौकशी करण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याची घोषणा केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केली आहे. ते काल नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत बोलत होते. राष्ट्रीय परीक्षा परिषद आणि तिच्या कार्यप्रणालीत आणखी स...

June 21, 2024 2:35 PM June 21, 2024 2:35 PM

views 12

दहाव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचा सर्वत्र उत्साह

दहावा आंतरराष्ट्रीय योग दिन आज संपूर्ण देशभरात तसंच जगभरातल्या अनेक देशांमध्ये उत्साहानं साजरा होत आहे. "स्वतःसाठी आणि समाजासाठी योग" ही या वर्षीच्या योग दिवसाची मध्यवर्ती संकल्पना आहे.आंतरराष्ट्रीय योग दिनाचा देशातला मुख्य कार्यक्रम जम्मू आणि काश्मीरमध्ये श्रीनगर इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ...

June 21, 2024 9:51 AM June 21, 2024 9:51 AM

views 11

लोकसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून भर्तृहरी महताब यांची नियुक्ती

भाजपाचे खासदार भर्तृहरी महताब यांची लोकसभेच्या हंगामी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ही नियुक्ती केली असल्याची माहिती, केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजीजू यांनी समाज माध्यमावरील संदेशाद्वारे दिली आहे. लोकसभेच्या अध्यक्षांची निवड होईपर्यन्त, महताब अध्यक्षप...

June 21, 2024 11:29 AM June 21, 2024 11:29 AM

views 13

बांगलादेशच्या प्रधानमंत्री शेख हसीना दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर

बांग्लादेशच्या प्रधानमंत्री शेख हसिना आजपासून दोन दिवसाच्या भारत दौऱ्यावर येत आहेत. राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची त्या भेट घेणार असून, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासमवेत त्यांची द्विपक्षीय बैठक होईल. शेख हसीना परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांची देखील भेट घेणार आ...

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.