राष्ट्रीय

July 30, 2024 2:42 PM July 30, 2024 2:42 PM

views 2

आजारांना प्रतिबंध करणाऱ्या उपायांवर अधिक भर द्या- डॉ. अरुण गोयल

आजाराचं निदान आणि त्यासाठीच्या उपचारपद्धतींपेक्षा आजारांना प्रतिबंध करणाऱ्या उपायांवर अधिक भर द्यायला हवा असं आरोग्य सेवा महासंचालक डॉ. अरुण गोयल यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत आयोजित विविध वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यावसायिकांच्या बैठकीत बोलत होते.   डॉ. गोयल यांच्या अध्यक्षतेख...

July 30, 2024 1:27 PM July 30, 2024 1:27 PM

views 11

आगामी काळात भारत रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांसोबत संपर्क वाढवणार- एस. जयशंकर

भारत आगामी काळात रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांसोबत संपर्क वाढवेल, या दोन देशातला संघर्ष निवळण्यासाठी हा संपर्क महत्वाचा ठरेल असं परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी सांगितलं. जपानमधल्या राष्ट्रीय क्लबमध्ये, वार्ताहरांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पुढच्या महिन्यातल्या युक्रेन दौऱ्याव...

July 30, 2024 1:22 PM July 30, 2024 1:22 PM

views 6

कृषि पायाभूत सुविधा निधी अंतर्गत देशभरात ७६ हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांची उभारणी

कृषि पायाभूत सुविधा निधी अंतर्गत देशभरात ७६ हजार कोटी रुपयांचे ७२ हजार पायाभूत सुविधा प्रकल्प उभारण्यात आल्याचं माहिती केंद्रीय कृषि मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्हटलं आहे. लोकसभेत पुरवणी प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली. या योजनेअंतर्गत बँका आणि वित्तीय संस्थांद्वारे पात्र कर्जदारा...

July 30, 2024 1:05 PM July 30, 2024 1:05 PM

views 20

रालोआ सरकार अर्थव्यवस्थेची स्थिती हाताळण्यात ठरलं अपयशी – पियूष गोयल

राष्ट्रीय लोकशाही आघाडीने सत्तेवर आल्यानंतर देशाच्या कमकुवत अर्थव्यवस्थेला जगातल्या पहिल्या पाच अर्थव्यवस्थांच्या रांगेत नेऊन बसवलं, असं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियूष गोयल यांनी सांगितलं. रालोआ सरकार अर्थव्यवस्थेची स्थिती हाताळण्यात अपयशी ठरलं आहे, या लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी...

July 30, 2024 1:28 PM July 30, 2024 1:28 PM

views 13

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज संध्याकाळी लोकसभेत अर्थसंकल्पावरच्या चर्चेला उत्तर देणार

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज संध्याकाळी लोकसभेत अर्थसंकल्पावरच्या चर्चेला उत्तर देणार आहेत. निर्मला सीतारामन यांनी २३ जुलै रोजी संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प मांडला होता. त्यावर गेल्या काही दिवसांपासून संसदेच्या दोन्ही सभागृहात चर्चा  सुरु आहे.

July 30, 2024 10:04 AM July 30, 2024 10:04 AM

views 14

केंद्र सरकारच्या धोरणांमुळे देशातला बेरोजगारीचा दर 3.2 दशांश टक्क्यांच्या खाली – रोजगार मंत्री

केंद्र सरकारच्या विविध धोरणांमुळे देशातला बेरोजगारीचा दर 3.2 दशांश टक्क्यांपर्यंत खाली आला असून येत्या काही वर्षात हा दर 3 टक्क्यांच्या खाली येईल असा विश्वास श्रम आणि रोजगार मंत्री मनसुख मांडवीय यांनी व्यक्त केला आहे. ते काल लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात बोलत होते. येत्या 5 वर्षांत 4 कोटीपेक्षा जास...

July 30, 2024 9:32 AM July 30, 2024 9:32 AM

views 13

दहशतवाद्यांकडून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात असल्याचा क्वाड गटातील परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा

दहशतवाद्यांकडून सध्या नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला जात असल्याचा इशारा क्वाड गटातील चार देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांनी दिला आहे. त्याविरोधात संयुक्त राष्ट्र संघाच्या यादीतील दहशतवादी संघटनांवर आंतरराष्ट्रीय स्तरावर कारवाई केली जावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.   लष्कर- ए-तैयबा, जैश-ए महंमद तसं...

July 30, 2024 9:19 AM July 30, 2024 9:19 AM

views 11

दिल्लीतील युपीएससीच्या तीन परीक्षार्थींच्या मृत्यूप्रकरणाच्या चौकशीसाठी केंद्रीय गृहमंत्रालयाकडून समिती स्थापन

दिल्लीच्या राजेंद्र नगर भागात नुकताच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची तयारी करत असलेल्या तीन तरुण विद्यार्थ्यांचा एका कोचिंग वर्गात बुडून मृत्यू झाला. या घटनेची चौकशी करण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयानं समिती स्थापन केली आहे. ही दुर्घटना घडण्या मागची कारणं, त्याला नेमकं कोण जबाबदार आहे, अशा गोष...

July 29, 2024 8:35 PM July 29, 2024 8:35 PM

views 15

राहुल गांधी यांचं सभागृहातलं वर्तन राज्यघटनेबद्दल आदर नसल्याचं दाखवून देणारं – मंत्री अश्विनी वैष्णव

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचं सभागृहातलं वर्तन, त्यांना राज्यघटनेबद्दल आदर नसल्याचं दाखवून देणारं आहे, अशी टीका माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली आहे. राहुल गांधी लोकसभेच्या सभापतींना सातत्यानं प्रश्न विचारत राहिले त्यांचं हे वर्तन निषेधार्ह असल्याचं संसदीय कामकाज मंत्...

July 29, 2024 8:39 PM July 29, 2024 8:39 PM

views 9

लष्कराच्या चिलखती वाहनांसाठी Advanced Land Navigation System खरेदीसाठी मंजुरी

संरक्षण खरेदी परिषदेच्या आज झालेल्या बैठकीत लष्कराच्या चिलखती वाहनांसाठी Advanced Land Navigation System खरेदी करायला प्राथमिक मंजुरी देण्यात आली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. तटरक्षक दलासाठी २२ बोटी खरेदी करायलाही परिषदेनं प्राथमिक मंजुरी दिली.   दरम्यान, संरक...

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.