राष्ट्रीय

October 13, 2024 7:56 PM October 13, 2024 7:56 PM

views 5

जगभरात आज ‘आंतरराष्ट्रीय आपदा जोखीम शमन’ दिवस साजरा

जगभरात आज आंतरराष्ट्रीय आपदा जोखीम शमन दिवस साजरा झाला. संपूर्ण जगात आपदा जोखीमीबाबत जागरुकता निर्माण करणं तसंच आपदा जोखीम कमी करण्याची संस्कृती रुजवणं हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. ‘सशक्त भारतासाठी पुढच्या पिढीचं सक्षमीकरण’ ही या वर्षीच्या दिवसांची मुख्य संकल्पना आहे. आपदा मुक्त भविष्यासाठी युवका...

October 13, 2024 6:44 PM October 13, 2024 6:44 PM

views 2

संयुक्त राष्ट्र दिनानिमित्त २४ ऑक्टोबरला सर्व प्रमुख कार्यालयांमध्ये संयुक्त राष्ट्रांचा ध्वज आणि तिरंगा फडकवावा – गृह मंत्रालय

संयुक्त राष्ट्र दिनानिमित्त येत्या २४ ऑक्टोबरला, केंद्र सरकारचे सर्व विभाग, राज्य सरकारं तसंच केंद्रशासित प्रदेशांनी आपल्या सर्व प्रमुख कार्यालयीन इमारतींवर संयुक्त राष्ट्रांचा ध्वज आणि राष्ट्रीय ध्वज तिरंगा फडकवावा, असे निर्देश केंद्रीय गृहमंत्रालयानं दिले आहेत. मात्र राष्ट्रपती भवन, उपराष्ट्रपती भ...

October 13, 2024 7:20 PM October 13, 2024 7:20 PM

views 4

आंतर संसदीय संघाच्या १४९व्या बैठकीत लोकसभा सभापती ओम बिर्ला यांच्या नेतृत्वात भारतीय प्रतिनिधीमंडळ सहभागी

जिनिव्हा इथं आयोजित आंतर संसदीय संघाच्या एकशे एकोणपन्नासाव्या बैठकीमध्ये लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या नेतृत्वाखाली भारतीय प्रतिनिधीमंडळ सहभागी होत आहे. ही बैठक येत्या १७ तारखेपर्यंत चालणार असून शांततापूर्ण आणि शाश्वत भविष्यासाठी विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेषाचा वापर ही या बैठकीची संकल्पना आह...

October 13, 2024 1:46 PM October 13, 2024 1:46 PM

views 13

आसाम आणि जम्मू-काश्मीरमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के

आसाम आणि जम्मू-काश्मीरमध्ये आज सकाळी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. आसाममधील भूकंपाची तीव्रता ४ पूर्णांक २ रिक्टर स्केल इतकी होती. आसामच्या मध्यवर्ती भागात भूकंपाचे केंद्र होते. ब्रह्मपुत्रा नदीच्या उत्तरेकडील किनाऱ्या लगत असलेल्या उदलगुडी जिल्ह्यात सकाळी ७ वाजून ४७ मिनिटांनी भूकंपांचे धक्के जाणवले. य...

October 13, 2024 1:27 PM October 13, 2024 1:27 PM

views 12

पुढील पाच दिवसांत कर्नाटकच्या दक्षिण भागात मुसळधार पावसाची शक्यता

पुढील पाच दिवसांत कर्नाटकच्या दक्षिण भागात, केरळ, माहे, आणि तमिळनाडू येथे मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. तर अंदमान आणि निकोबार बेटे, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर आणि त्रिपुरा इथं पुढील दोन दिवस मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.  तर गुजरात, मध्यप्रदेश...

October 13, 2024 4:00 PM October 13, 2024 4:00 PM

views 18

प्रधानमंत्री गतीशक्ती बृहद आराखड्याला तीन वर्ष पूर्ण झाल्याबद्दल प्रधानमंत्र्यांचे प्रंशसोद्गार

भारताच्या पायाभूत सेवा क्षेत्राचा कायापालट करण्यात एक परिवर्तनकारी उपक्रम म्हणून उदयाला आलेल्या पीएम गतीशक्ती ब्रृहद आराखड्याला तीन वर्ष पूर्ण झाल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रशंसा केली आहे. गतिशक्ति उपक्रमानं देशाच्या मल्टीमोडल संपर्कव्यवस्थेला लक्षणीय चालना दिली असून प्रत्येक क्षेत्र...

October 13, 2024 11:30 AM October 13, 2024 11:30 AM

views 2

म्हैसूरमध्ये १० दिवस सुरू असलेल्या दसरा महोत्सवाची हत्तीच्या मिरवणुकीने सांगता

म्हैसूरमध्ये 10 दिवस सुरू असलेल्या म्हैसूर दसरा महोत्सवाची सांगता काल विजयादशमीच्या दिवशी भव्य जांबू सावरी म्हणजेच हत्तीच्या मिरवणुकीने झाली. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी, कुंभ लग्नात दसरा हत्ती अभिमन्यूने वाहून नेलेल्या 750 किलो सोन्याच्या हौद्यात विराजमान देवी चामुंडेश्वरीला पुष्पहार अ...

October 13, 2024 11:16 AM October 13, 2024 11:16 AM

views 7

मलबार 2024 अंतर्गत भारत, ऑस्ट्रेलिया, जपान आणि अमेरिकेच्या नौदलांचा संयुक्त सागरी सराव विशाखापट्टणम इथं सुरू

मलबार 2024 अंतर्गत भारत, ऑस्ट्रेलिया, जपान आणि अमेरिकेच्या नौदलांचा संयुक्त सागरी सराव विशाखापट्टणम इथं गेल्या 9 ऑक्टोबरपासून सुरू झाला आहे. सागरी सहकार्याला प्रोत्साहन देणे हा या सरावाचा उद्देश आहे. इंडो-पॅसिफिक प्रदेशात परस्पर कार्यक्षमता वाढविणे आणि भविष्यातील सराव या विषयांवर वरिष्ठ नौदल अधिकाऱ्...

October 13, 2024 10:49 AM October 13, 2024 10:49 AM

views 4

प्रधानमंत्री आंतरवासिता योजनेसाठी ऑनलाइन पोर्टलवर नोंदणी सुरू.

प्रधानमंत्री इंटर्नशिप अर्थात आंतरवासिता योजनेसाठी ऑनलाइन पोर्टलवर कालपासून नोंदणी सुरू झाली आहे. या महिन्याच्या 25 तारखेपर्यंत ही नोंदणी सुरू राहणार आहे. या योजनेसाठी पोर्टलवर आतापर्यंत 193 कंपन्यांनी 91 हजार आंतरवासिता संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. 2024-25 या आर्थिक वर्षात 1 लाख 25 हजार आंतरवासिता...

October 13, 2024 1:48 PM October 13, 2024 1:48 PM

views 12

लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला जिनेव्हा येथे होणाऱ्या IPU च्या 149 व्या बैठकीत भारतीय संसदीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करणार

जिनिव्हा इथं आजपासून सुरु होणाऱ्या आंतर संसदीय संघाच्या एकशे एकोणपन्नासाव्या बैठकीला लोकसभेचे सभापती ओम बिर्ला भारतीय प्रतिनिधीमंडळाचं नेतृत्व करणार आहेत. ही बैठक येत्या १७ तारखेपर्यंत असून शांततापूर्ण आणि शाश्वत भविष्यासाठी विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेषाचा वापर ही या बैठकीची संकल्पना आहे. ओम बिर...