राष्ट्रीय

November 3, 2024 11:45 AM

views 21

मध्य प्रदेशातील बांधवगड व्याघ्र प्रकल्पात झालेल्या हत्तींच्या मृत्यूची चौकशी सुरू

मध्य प्रदेशातील बांधवगड व्याघ्र प्रकल्पात झालेल्या हत्तींच्या मृत्यूची चौकशी सरकारनं  सुरू केली आहे. पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या - वन्यजीव गुन्हे नियंत्रण कक्षाने, व्याघ्र प्रकल्पातल्या राखीव भागात झालेल्या दहा हत्तींच्या मृत्यूच्या चौकशीकरता एक पथक तयार केलं  आहे. हे पथक या प्रकरणाची ...

November 3, 2024 11:35 AM

views 18

देशाची संरक्षण निर्यात 2029-30 पर्यंत 50 हजार  कोटी रुपयांपर्यंत जाईल-संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

भारताच्या आत्मनिर्भर मोहिमेचे अपेक्षित परिणाम होत असून देशाची संरक्षण निर्यात 2029-30 पर्यंत 50 हजार  कोटी रुपयांपर्यंत जाईल असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. कानपूर इथल्या भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या 65 व्या स्थापना दिवस समारंभात ते काल बोलत होते. भारतीय तरुणांना 'विकसित भारत' हा दृ...

November 2, 2024 8:31 PM

views 28

भारत-चीन सीमेवर देम्चोक आणि देप्सांग परिसरांमधे भारताच्या बाजूने गस्त सुरु

भारत-चीन सीमेवर देम्चोक आणि देप्सांग परिसरांमधे भारताच्या बाजूने गस्त सुरु झाली असल्याचं परराष्ट्रव्यवहार मंत्रालयाने सांगितलं. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी आज नवी दिल्ली इथं प्रसारमाध्यम प्रतिनिधींना ही माहिती दिली. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरुन सैन्य मागं घेण्याबाबात गे...

November 2, 2024 8:29 PM

views 32

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर कॅनडानं केलेल्या आरोपांवरुन भारताकडून तीव्र नाराजी व्यक्त

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या बद्दल कॅनडाचे उपमंत्री डेव्हिड मॉरिसन यांनी तिथल्या राष्ट्रीय सुरक्षा स्थायी समितीसमोर केलेल्या आरोपाबद्दल भारताने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने नवी दिल्लीतल्या कॅनेडीयन उच्चा युक्तालयातल्या प्रतिनिधीला काल बोलावून याबाबत निषेध नोंदवल...

November 2, 2024 8:26 PM

views 16

ओदिशात झालेल्या अपघातात पाच जण ठार तर सात जण गंभीर जखमी

ओदिशातल्या सुंदरगढ जिल्ह्यातल्या गायकानापल्ली गावाजवळ पहाटेच्या सुमारास  एमसीएल-टपोरिया मार्गावर ट्रेलर ट्रक आणि व्हॅन मध्ये झालेल्या अपघातात पाच जण ठार तर सात जण गंभीर जखमी झाले. या अपघातात पाचही जणांचा जागीच मृत्यू झाला असून जखमींना रूग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे. दाट धु...

November 2, 2024 8:22 PM

views 8

NSP वर नव्याने अर्ज सादर करण्याची आणि अर्ज नूतनीकरणासाठी १५ नोव्हेंबरपर्यंत वाढ

शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या 'राष्ट्रीय साधन-सह-योग्यता शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत वर्ष  2024-25 साठी राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल (NSP) वर नव्याने  अर्ज सादर करण्याची आणि अर्ज नूतनीकरण करण्याची  अंतिम तारीख येत्या १५ नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. आर्थिकदृष्ट्या ...

November 2, 2024 8:08 PM

views 5

दिवाळी पाडव्या निमित्त राज्यभरात उत्साहाचं वातावरण

आज कार्तिक शुद्ध प्रतिपदा, बलिप्रतिपदा अर्थात दिवाळी पाडवा. हा दिवस साडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक मानला जातो. त्यामुळे घर, वाहन किंवा आभुषणं खरेदीसाठी आजचा मुहूर्त साधण्याकडे बहुतेकांचा कल असतो. आज बाजारपेठांमध्ये भेटवस्तू, तसंच मोबाईल फोन्स, आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंची खरेदीही मोठ्या प्रमाणात होत आहे. ...

November 2, 2024 8:37 PM

views 30

कश्मीर खोऱ्यात अनंतनाग जिल्ह्यात झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार

कश्मीर खोऱ्यात सुरक्षा दलं आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले.    श्रीनगर शहराच्या खान्यार परिसरात सुरक्षा दलांची शोधमोहीम सुरू असताना, दहशतवाद्यांसोबत चकमक झाली. यात एक दहशतवादी ठार झाला. उस्मान ऊर्फ छोटा वलीद असं मारल्या गेलेल्या दशतदवाद्याचं नाव असून, तो बराच काळ सक्र...

November 2, 2024 7:14 PM

views 9

आजच्या काळात भारतानं जगाचा मित्र म्हणून स्वतःचं स्थान निर्माण केलं -परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर

आजच्या काळात भारतानं जगाचा मित्र म्हणून स्वतःचं स्थान निर्माण केलं असल्याचं असं प्रतिपादन परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी केलं आहे. ते आज नवी दिल्ली इथं एका पुस्तक प्रकाशनाच्या समारंभात बोलत होते. आज भारत जास्तीत जास्त देशांशी मैत्री करू इच्छितो, त्याचवेळी काही मित्र इतरांपेक्षा अधिक गुंतागुंत ...

November 2, 2024 2:57 PM

views 4

अहमदनगर जिल्ह्यात २३ कोटी ७१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केली

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने उमेदवार आणि निवडणूक यंत्रणा कार्यरत झाले आहेत. अहमदनगर जिल्ह्यात सुपा टोलनाक्यावर एका गाडीतून २३ कोटी ७१ लाख रुपये किमतीची सोन्याची बिस्किटं आणि चांदी जप्त केली.   निवडणूक आयोगाचं पथक आणि पोलिसांनी या गाडीच्या संशयित हालचाली टिपून हटकलं आणि झडती घेत...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.