राष्ट्रीय

November 12, 2024 3:34 PM November 12, 2024 3:34 PM

views 6

देशातल्या इतर राज्यातल्या विधानसभा आणि वायनाड लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीसाठी तयारी पूर्ण

देशातल्या इतर राज्यातल्या विधानसभा पोटनिवडणुकीसाठीच्या पाच, बिहारमधे विधानसभेच्या चार जागांसाठी तर केरळात लोकसभा आणि विधानसभेच्या प्रत्येकी एका जागेसाठी उद्या होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठीची तयारी पूर्ण झाली आहे.      आसाममधे ३४ उमेदवार रिंगणात असून ९ लाखाहून अधिक मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यासा...

November 12, 2024 2:34 PM November 12, 2024 2:34 PM

views 10

देशाच्या एकूण प्रत्यक्ष कर संकलनात १५ पूर्णांक ४१ शतांश टक्क्यांची वाढ

चालू आर्थिक वर्षात आत्तापर्यंत देशाच्या एकूण प्रत्यक्ष कर संकलनात १५ पूर्णांक ४१ शतांश टक्क्याची वाढ झाली आहे. हे संकलन १२ लाख १० हजार कोटी रुपयांहून अधिक झाल्याची माहिती सीबीडीटी अर्थात केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळानं दिली आहे. कॉर्पोरेट कर संकलनातही किरकोळ वाढ झाली आहे. गेल्या वर्षी एक एप्रिल ते १० ...

November 12, 2024 2:20 PM November 12, 2024 2:20 PM

views 6

युद्धाच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी लवचिक संरक्षण धोरण महत्वाचं असल्याचं संरक्षणमंत्र्यांचं प्रतिपादन

सुरक्षा व्यवस्थेला उद्भवणारा धोका आणि युद्धाच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी लवचिक संरक्षण धोरण महत्वाचं असल्याचं संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्ली इथं दिल्ली संरक्षण संवादात बोलत होते. लवचिक संरक्षण धोरण ही केवळ धोरणात्मक निवड नाही तर आत्यंतिक गरज आहे, असंही ते म्हणाले. भ...

November 12, 2024 2:03 PM November 12, 2024 2:03 PM

views 4

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आज प्रधानमंत्र्यांसह अनेक बड्या नेत्यांच्या ठिकठिकाणी सभा

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या प्रचार शिगेला पोहोचला आहे. सर्वच पक्षांचे ज्येष्ठ नेते झंझावाती दौरे करुन आपापल्या पक्षाच्या किंवा आघाडीच्या उमेदवारांना मत देण्याचं आवाहन मतदारांना करत आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि इतर ज्येष्ठ नेते राज्यातल्या विविध जिल्ह्यांमध्ये प्रचारसभा घेणार आहेत. भाजप...

November 12, 2024 1:56 PM November 12, 2024 1:56 PM

views 9

सार्वजनिक प्रसारण दिन आज होतोय साजरा

सार्वजनिक प्रसारण दिन आज साजरा होत आहे. फाळणीच्या वेळी हरियाणात कुरुक्षेत्र इथं आसरा घेतलेल्या निर्वासितांना आधार देणारं भाषण राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी १२ नोव्हेंबर १९४७ रोजी आकाशवाणी दिल्लीच्या स्टुडियोमधून केलं होतं. त्या स्मृतीप्रित्यर्थ हा दिवस साजरा होतो. आकाशवाणी दिल्लीच्या सभागृहात आज य...

November 12, 2024 10:21 AM November 12, 2024 10:21 AM

views 5

प्रधानमंत्र्यांचा इगास उत्सवाच्या सोहळ्यात सहभाग

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल नवी दिल्लीत उत्तराखंडचे लोकसभा खासदार अनिल बलूनी यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आलेल्या इगास उत्सवाच्या सोहळ्यात सहभाग घेतला. यानिमित्तानं मोदींनी समाजमाध्यमावर उत्तराखंडच्या जनतेचं अभिनंदन केलं,तसंच इगासची परंपरा जिवंत ठेवण्यासाठी त्यांनी उत्तराखंडमधील लोकांच...

November 12, 2024 10:09 AM November 12, 2024 10:09 AM

views 9

केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी नवी दिल्ली इथं AIIB च्या शिष्टमंडळासोबत घेतली बैठक

केंद्रीय वित्त आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी काल नवी दिल्ली इथं एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक अर्थात AIIB च्या शिष्टमंडळासोबत बैठक घेतली. गेल्या काही वर्षांत बँकेची झालेली उल्लेखनीय वाढ आणि कामगिरीबद्दल अर्थमंत्र्यांनी बँकेचं कौतुक केलं. बँकेची प्रशंसा करतानाच त्यां...

November 12, 2024 10:05 AM November 12, 2024 10:05 AM

views 13

रशियाचे पहिले उपपंतप्रधान डेनिस मँतुरोव यांनी काल नवी दिल्लीत प्रधानमंत्र्यांची घेतली भेट

रशियाचे पहिले उपपंतप्रधान डेनिस मँतुरोव यांनी काल नवी दिल्लीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान, त्यांनी दोन्ही देशातील व्यापार,आर्थिक संबंध, ऊर्जा आदी विविध क्षेत्रात परस्पर सहकार्य वाढविण्याविषयी सविस्तर चर्चा केली. मोदी यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांना शुभेच्छा देत...

November 12, 2024 10:02 AM November 12, 2024 10:02 AM

views 4

मॉरिशसमधील निवडणूकीतील विजयाबद्दल प्रधानमंत्र्यांनी डॉ. रामगुलाम यांचं केलं अभिनंदन

मॉरिशसमधील निवडणूकीतील विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉक्टर नवीन रामगुलाम यांचं अभिनंदन केलं आहे. मॉरिशसचं नेतृत्व करण्यासाठी त्यांना शुभेच्छा देत पंतप्रधान मोदी यांनी डॉक्टर रामगुलाम यांना भारत भेटीचं निमंत्रण दिलं. तसंच दोन्ही देशातील सहकार्य सक्षम करण्यासाठी एकत्र काम करण्यास उत्सुक असल...

November 12, 2024 9:58 AM November 12, 2024 9:58 AM

views 5

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून दादरा, नगर हवेली आणि दमण दीवच्या दौऱ्यावर

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव या केंद्रशासित प्रदेशाचा तीन दिवसीय दौऱ्यावर रवाना होत आहेत. दौऱ्याच्या पहिल्या दिवशी राष्ट्रपती जामपूर इथलं पक्षीगृह, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय आणि दमण इथल्या एनआयएफटी संस्थेला भेट देतील. दुसऱ्या दिवशी त्या सिल्वासा इथल्या ...