राष्ट्रीय

December 21, 2024 1:02 PM

views 19

आज पहिला जागतिक ध्यानधारणा दिन

आज पहिला जागतिक ध्यानधारणा दिन साजरा होत आहे. शांतता आणि कल्याणाच्या भावनेतून तसंच आयुष्य समरसून जगण्यासाठी प्रेरित करणं हे या दिनाचं उदि्दष्ट आहे. संयुक्त राष्ट्रांच्या महासभेनं अलिकडेच यासंबंधी भारताद्वारे सहप्रायोजित प्रस्ताव सर्वसंमतीनं स्वीकार केला होता.   तणाव, हिंसा आणि सामाजिक असंतोषासह अनेक...

December 21, 2024 12:43 PM

views 30

भारतीय कापूस महामंडळानं कापूस उत्पादक १२ राज्यातल्या १४९ जिल्ह्यांमध्ये मिळून ४९९खरेदी केंद्रं स्थापन

भारतीय कापूस महामंडळानं कापूस उत्पादक 12 राज्यातल्या 149 जिल्ह्यांमध्ये मिळून 499 खरेदी केंद्रं स्थापन केल्याची माहिती केंद्र सरकारनं काल राज्यसभेत दिली. या केंद्रांमध्ये कोणत्याही दर्जात्मक निर्बंधांशिवाय शेतकऱ्यांकडून किमान आधारभूत किमतीनं कापूस खरेदी केली जाणार आहे. वस्त्रोद्योग राज्यमंत्री पवित्...

December 21, 2024 1:48 PM

views 21

केंद्र सरकार आणि आशियाई विकास बँक यांच्यातल्या ३५० दशलक्ष डॉलर्सच्या कर्ज करारावर स्वाक्षऱ्या

केंद्र सरकार आणि आशियाई विकास बँक यांच्यात काल 350 दशलक्ष डॉलर्सचा धोरण आधारित कर्ज करार करण्यात आला. बहुस्तरीय आणि एकात्मिक मालसाठवणूक आणि वाहतूक यंत्रणा कार्यक्रमाअंतर्गत हे कर्ज मंजूर झालं आहे. केंद्र सरकारच्या विविध मालसाठवणूक आणि वाहतूक प्रकल्पांच्या आधुनिकीकरणासाठी हे कर्ज देण्यात आलं आहे.

December 21, 2024 9:58 AM

views 18

भारतीय रिझर्व्ह बँकेनं मणप्पूरम फायनान्स कंपनीला ठोठावला 20 लाख रुपयांचा दंड

भारतीय रिझर्व्ह बँकेनं मणप्पूरम फायनान्स कंपनीला 20 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. ग्राहकांच्या माहितीच्या काही विशिष्ट तरतूदींमध्ये असंबद्धता आढळून आल्यामुळे दंडाची कारवाई करण्यात आली. गेल्या वर्षी मार्च महिन्यात मणप्पूरम फायनान्सची तपासणी केल्यानंतर कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली होती. कंपनीनं काह...

December 21, 2024 9:07 AM

views 14

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या अर्थमंत्र्यांसोबत अर्थसंकल्पपूर्व चर्चा

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल राजस्थानमधील जैसलमेर इथं राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या अर्थमंत्र्यांसोबत अर्थसंकल्पपूर्व चर्चा केली. या बैठकीत केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी, गोवा, हरियाणा, जम्मू-काश्मीर, मेघालय आणि ओडिशा या राज्यांचे मुख्यमंत्री आणि अरुणाचल प्रदेश, बिहार,...

December 21, 2024 9:08 AM

views 25

त्रिपुरामध्ये आगरतळा इथं आज ईशान्य राज्य परिषदेची 72 वी बैठक होणार

त्रिपुरामध्ये आगरतळा इथं आज ईशान्य राज्य परिषदेची 72 वी बैठक होणार आहे. केंद्रिय गृहमंत्री अमित शहा या बैठकीच्या अध्यक्षस्थानी असतील. ईशान्य प्रदेश विकास मंत्री ज्योतिरादित्य शिंदे, राज्यमंत्री डॉक्टर सुकांता मुजुमदार हे देखील या बैठकीत सहभागी होणार आहेत. तसंच ईशान्येकडील सर्व राज्यांचे राज्यपाल आणि...

December 20, 2024 8:19 PM

views 64

संसद भवनाच्या आवारात आंदोलन

भाजपाचे दोन खासदार काल जखमी झाल्याच्या निषेधार्थ राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या खासदारांनी आज संसद भवनाच्या आवारात आंदोलन केलं. काँग्रेसनं डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केल्याचा आरोप या खासदारांनी केला. नागालँडमधल्या खासदार फगनॉन कोन्याक यांच्यांशी कथित गैरवर्तन केल्याप्रकरणी राहुल गांधी यांनी माफी...

December 20, 2024 7:36 PM

views 17

शेअर बाजारात मोठी घसरण

देशातल्या शेअर बाजार आठवडाभर सुरू असलेली घसरण आजही कायम राहिली. या आठवडाभरात सेन्सेक्स ४ हजारांहून अधिक आणि निफ्टी सुमारे बाराशे अंकांनी घसरला आहे. जागतिक बाजारातली घसरण, फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर कपातीचा अपेक्षेपेक्षा कमी वेग यामुळं ही घसरण झाल्याचं विश्लेषकांचं मत आहे.   दिवसअखेर सेन्सेक्स १...

December 20, 2024 11:14 AM

views 14

जानेवारी २०२५ मध्ये ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमाचा आठवा भाग सादर होणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 'परीक्षा पे चर्चा' या कार्यक्रमाच्या माध्यमातून दर वर्षी विद्यार्थ्यांशी संवाद साधत असतात. या कार्यक्रमाचा आठवा भाग पुढील महिन्यात अर्थात जानेवारी 2025 मध्ये सादर होणार आहे. या संवादात्मक कार्यक्रमासाठी नोंदणी सुरू झाली असून, 14 जानेवारीपर्यंत MyGov पोर्टलवर नोंदणी करता येई...

December 19, 2024 8:17 PM

views 19

भारतीय पासपोर्टधारकांना २६ देशांमध्ये व्हिसामुक्त प्रवेश

भारतीय पासपोर्टधारकांना २६ देशांमध्ये व्हिसामुक्त प्रवेश असून ४० देशांमध्ये व्हिसा ऑन अरायव्हलची सुविधा असल्याचं सरकारनं म्हटलं आहे. परराष्ट्र राज्यमंत्री कीर्ती वर्धन सिंह यांनी राज्यसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली. नेपाळ, भूतान आणि मालदीवच्या नागरिकांना भारतात व्हिसा-मुक्त प्रवेश आहे. पर्यटन,...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.