राष्ट्रीय

December 22, 2024 8:11 PM

views 11

अमरावतीत IIMC उभारणीसाठी २७ डिसेंबरपर्यंत निविदा दाखल करता येईल – माहिती आणि प्रसारण मंत्रालय

अमरावती जिल्ह्यात बडनेरा इथं उभारण्यात येणाऱ्या IIMC अर्थात  भारतीय जनसंचार संस्थेच्या उभारणीसाठी निविदा मागवल्या जात असून २७ डिसेंबरपर्यंत निविदा दाखल करता येतील असं माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांनी सांगितलं. नागपूर इथं  आकाशवाणी, दूरदर्शन, पत्र सूचना कार्यालय, केंद्रीय संचार ब्य...

December 22, 2024 7:45 PM

views 18

पंजाबमध्ये तीन मजली इमारत कोसळून दोन जणांचा मृत्यू

पंजाबमधल्या मोहाली इथं काल रात्री तीन मजली इमारत कोसळून झालेल्या अपघाताचं बचावकार्य २३ तासांनंतर थांबलं आहे. या अपघातात २ जणांचा मृत्यू झाला. ढीगऱ्याखाली कोणीही अडकलेलं नसण्याची शक्यता  NDRF च्या जवानांनी व्यक्त केल्यामुळे हे बचाव कार्य आता थांबवण्यात आलंय. मोहालीच्या उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी या घट...

December 22, 2024 6:24 PM

views 25

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा कुवेतच्या सर्वोच्च पुरस्कारानं सन्मान

येणाऱ्या काळात भारत आणि कुवेत यांचे संबंध अधिक वृद्धिंगत होतील, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. मोदी यांनी आज  कुवेत दौऱ्यात कुवेतचे अमीर शेख मेशल अल-अहमद अल-जबेर अल-सबाह यांच्यासोबत  औषधनिर्माण, माहिती-तंत्रज्ञान, फिन टेक, पायाभूत सुविधा आणि सुरक्षा अशा प्रमुख क्षेत्रातील द्विपक्षीय...

December 22, 2024 3:42 PM

views 31

मच्छिमारांना मिळणार किसान क्रेडीट कार्डचा लाभ

मासेमारी करणाऱ्यांनाही किसान क्रेडीट कार्डचा लाभ घेता येणार आहे. मासेमारी करणारे मच्छिमारांना ही सुविधा उपलब्ध करुन देण्यासह प्रधानमंत्री मत्स्य  किसान सह-समृद्धी योजनेअंतर्गत मत्स्य व्यावसायिक, मच्छिमार सहकारी संस्था आदींची नोंदणीही करण्यात येत आहे. १५ मार्च २०२५ पर्यंत याबाबतची मोहिम राबविण्यात ये...

December 22, 2024 1:54 PM

views 18

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं रविचंद्रन अश्विन यांना भावनिक पत्र

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून रविचंद्रन अश्विन यांनी निवृत्ती जाहीर केल्यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांना भावनिक पत्र लिहिलं आहे. क्रिकेट आणि देशासाठी अश्विन यांनी दिलेल्या अतुलनीय योगदानाबद्दल प्रधानमंत्र्यांनी त्यांचे आभार मानले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये घेतलेले ७६५ बळी आणि कसोटीत ...

December 22, 2024 1:32 PM

views 9

क्रीडामंत्री मनसुख मांडविय यांचा फिट इंडिया सायकल मोहिमेत सहभाग

केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडविय यांनी आज केंद्रीय राखीव पोलीस दल आणि भारत- तिबेट सीमा पोलिस दलाच्या जवानांसोबत आज नवी दिल्लीत फिट इंडिया सायकल मोहिमेत भाग घेतला. मांडविया यांनी मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियम ते रायसीना हिलपर्यंत सैनिकांसोबत सायकल चालवली. देशभरात अकराशेहून अधिक ठिकाणी या मोहिमेचे ...

December 22, 2024 1:17 PM

views 16

देशातल्या पहिल्या बायो-बिटूमेन बायपास महामार्गाचं उद्घाटन

भारतातल्या पहिल्या बायो-बिटूमेन सामग्रीचा वापर करून बांधलेल्या नागपूर- मनसर बायपास महामार्गाचं उद्घाटन केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नीतिन गडकरी यांच्या हस्ते काल करण्यात आलं. बिटुमेन सारख्या सामग्रीचा वापर करून बांधलेल्या पर्यावरणपूरक रस्त्यांमुळे रस्तेबांधणीचा खर्च कमी होईल तसंच रोजगार निर्मि...

December 22, 2024 1:09 PM

views 24

पोषणयुक्त तांदळावरील कराचा दर कमी करण्याची जीएसटी परिषदेची शिफारस

जीएसटी परिषदेनं पोषणयुक्त तांदळावरील कराचा दर कमी करून पाच टक्के करण्याची आणि पाकिटबंद तसंच लेबल केलेल्या वस्तूंच्या व्याख्येत सुधारणा करण्याची शिफारस केली आहे. वस्तू आणि सेवा कर परिषदेची ५५वी बैठक काल राजस्थानमध्ये जैसलमेर इथं झाली. वस्तू आणि सेवा कराशी संबंधित अनेक निर्णय या बैठकीत घेण्यात आले. के...

December 22, 2024 1:59 PM

views 32

भारत-कुवैत संबंध मजबूत करण्यात भारतीयांचा मोठा वाटा – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी कालपासून कुवेतच्या दौऱ्यावर आहेत. कुवेतच्या बायन पॅलेसमध्ये औपचारिक स्वागतानंतर प्रधानमंत्री आज कुवेतचे अमीर आणि राजपुत्र यांच्याशी स्वतंत्र बैठका घेणार आहेत. कुवेतच्या प्रधानमंत्र्यांशी ते शिष्टमंडळ स्तरावरही चर्चा करतील. गेल्या ४३ वर्षांतील भारतीय प्रधानमंत्र्यांची ही पहि...

December 21, 2024 8:23 PM

views 10

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी कुवेत दौऱ्यावर

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी कुवेतला पोहोचले. कुवेतचे प्रथम उप-प्रधानमंत्री शेख फहाद युसुफ सौद अल सबाह यांच्यासह इतर मंत्र्यांनी मोदी यांचं विमानतळावर स्वागत केलं. गेल्या ४३ वर्षांमधली भारतीय प्रधानमंत्र्यांची ही पहिलीच कुवेत भेट आहे. या भेटीमुळे दोन्ही देशातले संबंध अधिक द...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.