राष्ट्रीय

November 30, 2024 10:21 AM November 30, 2024 10:21 AM

views 9

केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन बिहारमधील मधुबनी जिल्ह्यात क्रेडिट आउटरीच कार्यक्रमात सहभागी होणार आहेत

सरकारनं किसान क्रेडिट कार्ड योजनेचा विस्तार मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि इतर क्षेत्रांमध्ये करून त्यात वैविध्य आणल्याचं दरभंगा इथं झालेल्या पतपुरवठा संपर्क कार्यक्रमात बोलताना निर्मला सीतारामन यांनी सांगितलं. केंद्रीय अर्थसंकल्प आता महिलाकेंद्री ऐवजी महिलाप्रधान झाला असून येत्या काही वर्षांत जगातील...

November 30, 2024 1:31 PM November 30, 2024 1:31 PM

views 4

सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रम अर्थात यूआयपी अंतर्गत ७ कोटी ४३ लाख लाभार्थ्यांची नोंदणी

सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रम अर्थात यूआयपी अंतर्गत सुमारे ७ कोटी ४३ लाख लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात आली आहे. गरोदर महिलांना तसंच नवजात ते १६ वर्षांपर्यंतच्या मुलांना १२ प्रकारच्या रोगांसाठी या कार्यक्रमांतर्गत जीवनरक्षक लस देण्यात येते. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेल या...

November 30, 2024 8:50 AM November 30, 2024 8:50 AM

views 10

पर्यटन स्थळांचा जागतिक मानकांनुसार विकास करण्यासाठी केंद्र सरकारकडून ३ हजार ३०० कोटी रुपयांच्या ४० योजनांना मंजुरी

देशातल्या प्रसिद्ध पर्यटन स्थळांचा जागतिक मानकांनुसार विकास करण्यासाठी केंद्र सरकारने सुमारे तीन हजार ३०० कोटी रुपयांच्या ४० योजनांना मंजुरी दिली आहे. २३ राज्यातल्या या योजनांसाठी देण्यात येणाऱ्या विशेष आर्थिक मदतीवर पुढची ५० वर्षं कोणतंही व्याज आकारलं जाणार नाही, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. ...

November 29, 2024 8:29 PM November 29, 2024 8:29 PM

views 12

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपचा विजय हा सरकारच्या धोरणांवर आणि योजनांवर जनतेच्या विश्वासाचं निदर्शक असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

ओदिशा पाठोपाठ, हरियाणा, आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपाचा दणदणीत विजय हा लोकांचा सरकारच्या धोरणांवर आणि योजनांवरचा विश्वास दर्शवतो असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्री तीन दिवसांच्या ओदिशा दौऱ्यावर असून आज भुवनेश्वरमध्ये बिजू पटनायक आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ त्या...

November 29, 2024 8:22 PM November 29, 2024 8:22 PM

views 7

गेल्या ऑक्टोबर महिन्यात देशातल्या प्रमुख उद्योगांच्या उत्पादनात ३ पूर्णांक १ दशांश टक्क्यांनी वाढ

गेल्या ऑक्टोबर महिन्यात देशातल्या प्रमुख उद्योगांच्या उत्पादनात ३ पूर्णांक १ दशांश टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती, वाणिज्य मंत्रालयाने दिली आहे. एप्रिल ते ऑक्टोबर २०२४ या कालावधीत प्रमुख ८ उद्योगांमधे उत्पादन ४ पूर्णांक १ दशांश टक्क्यांनी वाढलं. त्यात कोळसा, तेलशुद्धिकरण, पोलाद, सिमेंट, वीज आणि खतं ...

November 29, 2024 3:44 PM November 29, 2024 3:44 PM

views 9

देशातल्या प्रसिद्ध पर्यटन स्थळांच्या विकासासाठी ३ हजार ३०० कोटींच्या ४० योजनांना केंद्राची मंजुरी

केंद्र सरकारने देशातल्या प्रसिद्ध पर्यटन स्थळांना जागतिक मानकांनुसार विकसित करण्यासाठी सुमारे तीन हजार ३०० कोटी रुपयांच्या ४० योजनांना मंजुरी दिली आहे. २३ राज्यातल्या या योजनांसाठी राज्यांना विशेष मदत दिली जाईल, ज्यावर, पुढची ५० वर्षं कोणतंही व्याज आकारलं जाणार नाही.   यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्...

November 29, 2024 1:21 PM November 29, 2024 1:21 PM

views 10

आम आदमी पक्षाच्या खासदारांचं संसदेबाहेर निदर्शन

दिल्लीत गुन्हेगारीच्या घटना वाढत असल्याचा आरोप करत आम आदमी पक्षाच्या खासदारांनी आज संसदेबाहेर निदर्शनं केली. दिल्लीत वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी सरकारच्या उपाययोजना कराव्यात असं पक्षाचे नेते संजय सिंह यांनी यावेळी वार्ताहरांशी बोलताना सांगितलं.     तसंच पंजाबमधल्या काँग्रेस खासदारांनीही आज संस...

November 29, 2024 1:07 PM November 29, 2024 1:07 PM

views 7

संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज आजही दिवसभरासाठी तहकूब

अदानी लाच प्रकरणासह इतर मुद्यांबाबत विरोधी पक्षांनी केलेल्या गदारोळामुळं संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजात आजही अडथळे निर्माण झाले. त्यामुळं संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज आज चौथ्या दिवशी देखील दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं.    आज सकाळी राज्यसभेचं कामकाज सुरु होताच विरोधी पक्षाच्या सदस्...

November 29, 2024 1:22 PM November 29, 2024 1:22 PM

views 10

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आजपासून तीन दिवसांच्या ओडिशा दौऱ्यावर

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आजपासून तीन दिवसांच्या ओडिशा दौऱ्यावर आहेत. भुवनेश्वर इथं होत असलेल्या पोलिस महासंचालक आणि पोलिस महानिरीक्षकांच्या अखिल भारतीय परिषदेला ते उपस्थित राहणार आहेत. ओडिशा प्रथमच या कार्यक्रमाचं आयोजन करत आहे. सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे पोलीस महासंचालक, तसंच केंद्रीय र...

November 29, 2024 1:22 PM November 29, 2024 1:22 PM

views 5

भारतीय आणि श्रीलंकन नौदलाच्या संयुक्त कारवाईत ५०० किलोचे अंमली पदार्थ जप्त

भारतीय नौदलाने श्रीलंकन नौदलाच्या सहकार्याने आज अरबी समुद्रात दोन मासेमारी नौकांमधून क्रिस्टल मेथ म्हणून ओळखले जाणारे सुमारे ५०० किलो वजनाचे अमली पदार्थ जप्त केले. भारतीय नौदलाने एक्स या समाजमाध्यमावर ही माहिती दिली आहे. या दोन्ही नौका आणि  जप्त केलेले अंमली पदार्थ पुढील कायदेशीर कारवाईसाठी श्रीलंके...

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.