राष्ट्रीय

December 27, 2024 7:38 PM December 27, 2024 7:38 PM

views 10

डॉ. मनमोहन सिंग यांच्या स्मृतीप्रित्यर्थ संसदेत आदरांजली

केंद्रीय मंत्रिमंडळानं आज माजी प्रधानमंत्री डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करताना म्हटलं आहे की, डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे देशानं एक प्रख्यात राजकारणी, ख्यातनाम अर्थतज्ञ आणि प्रतिष्ठित नेता गमावला आहे. डॉ. मनमोहन सिंग यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आज संसदेत शोक ठराव पारित करण्यात आ...

December 27, 2024 7:11 PM December 27, 2024 7:11 PM

views 15

वायव्य आणि मध्य भारताच्या काही भागात मेघगर्जनेसह वादळी वारे

वायव्य आणि मध्य भारताच्या काही भागात आज मेघगर्जनेसह वादळी वारे आणि गारपिटीचा अंदाज असून, हवामान विभागानं या भागाला ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेशचा पश्चिम भाग, पूर्व राजस्थान आणि पश्चिम मध्य प्रदेशात अतिवृष्टी आणि गारपिटीची शक्यता असल्याचं हवामान वि...

December 27, 2024 3:59 PM December 27, 2024 3:59 PM

views 5

भारत-अमेरिकेतल्या धोरणात्मक भागीदारीच्या प्रगतीवर तसंच जागतिक घडामोडींवर चर्चा

परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर यांनी काल रात्री वॉशिंग्टन डीसी इथं अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिव्हान यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांनी भारत-अमेरिकेतल्या धोरणात्मक भागीदारीच्या प्रगतीवर आणि सध्याच्या प्रादेशिक तसंच जागतिक घडामोडींवर चर्चा केली. डॉ. जयशंकर २४ डिसेंबरपासून सहा दिवसांच्...

December 27, 2024 8:34 PM December 27, 2024 8:34 PM

views 3

मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती, प्रधानमंत्र्यांकडून शोक व्यक्त

माजी प्रधानमंत्री डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. डॉ सिंग हे अशा दुर्मिळ राजकारण्यांपैकी एक होते, ज्यांनी शैक्षणिक आणि प्रशासकीय अशा दोन्ही विश्वात आपला ठसा उमटवला, असं राष्ट्रपतींनी आपल्या...

December 27, 2024 3:15 PM December 27, 2024 3:15 PM

views 8

सक्तवसुली अधिकारी नियुक्त झालेल्या ३४ उमेदवारांना नियुक्ती पत्रं प्रदान

केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री डॉ. मनसुख मांडविय यांनी काल नवी दिल्ली इथं श्रम मंत्रालयात सक्तवसुली अधिकारी म्हणून नियुक्त झालेल्या ३४ उमेदवारांना नियुक्ती पत्रं दिली. निवड झालेल्या उमेदवारांचे अभिनंदन करून डॉ. मांडविय यांनी कामगारांच्या कल्याणासाठी परिश्रम करण्याचं आणि कामगार कायद्याच्या पालनाकडे ...

December 27, 2024 3:15 PM December 27, 2024 3:15 PM

views 9

बियाण्यांच्या उत्पादनावर अधिक लक्ष केंद्रीत केलं पाहिजे-अमित शहा

भारतीय बीज सहकारी संस्थेनं कमी पाणी आणि कमी कीटकनाशकांच कमी प्रमाण आवश्यक असलेल्या बियाण्यांच्या उत्पादनावर अधिक लक्ष केंद्रीत केलं पाहिजे असं केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. भारतीय बीज सहकारी संस्थेच्या काल झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. लहान शेतकऱ्यांकडून जास्तीत जास्...

December 27, 2024 2:46 PM December 27, 2024 2:46 PM

views 6

देशातल्या बँकांच्या नफ्यात सलग सहा वर्षं वाढ झाल्याची रिझर्व्ह बँकेच्या अहवालात माहिती

देशातल्या बँकांच्या नफ्यात २०२३-२४ या आर्थिक वर्षापर्यंत सलग सहा वर्षं वाढ झाली असून, चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीतही वाढीचा कल कायम असल्याचं भारतीय रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे. रिझर्व्ह बँकेनं देशातील बँकिंग आणि त्यातला कल याबाबतचा एक अहवाल काल प्रसिद्ध केला, त्यात ही माहिती देण्यात आली आहे...

December 27, 2024 12:32 PM December 27, 2024 12:32 PM

views 6

एमएसव्ही ताज धरे हराम या बुडालेल्या जहाजातून नऊ भारतीय कर्मचाऱ्यांची सुटका

भारतीय तटरक्षक दलानं एमएसव्ही ताज धरे हराम या बुडालेल्या जहाजातून नऊ भारतीय कर्मचाऱ्यांची सुटका केली. हे जहाज पाकिस्तानच्या शोध आणि बचाव क्षेत्रात गुजरातमधील पोरबंदरच्या पश्चिमेला सुमारे ३११ किलोमीटर अंतरावर बुडालं होतं.   गुजरातमधील मुंद्रा बंदरातून ते येमेनकडे निघालं होतं, मात्र उसळलेल्या समु...

December 26, 2024 3:28 PM December 26, 2024 3:28 PM

views 2

भारताच्या दक्षिण किनाऱ्यावर आलेल्या त्सुनामीला आज २० वर्षे पूर्ण

भारताच्या दक्षिण किनाऱ्यावर २६ डिसेंबर २००४ रोजी आलेल्या त्सुनामीला आज २० वर्षे पूर्ण झाली. या त्सुनामीमुळे तामिळनाडु आणि पुद्दुचेरीमध्ये हजारो लोकांचा मृत्यू झाला होता. इंडोनेशियातल्या सुमात्रा बेटांजवळ ९ पूर्णांक १ रिक्टर स्केलच्या भूकंपांमुळे आलेली त्सुनामी, ही इतिहासातल्या सर्वात भीषण नैसर्गिक आ...

December 26, 2024 1:55 PM December 26, 2024 1:55 PM

views 1

शहीद उधमसिंग यांच्या १२५व्या जयंतीनिमित्त देशाचं स्मरण

देश आज शहीद उधमसिंग यांची १२५ वी जयंतीनिमित्त त्यांच स्मरण करत आहे. शहीद उधमसिंग यांनी स्वातंत्र्यलढ्यात जालियानवाला बाग हत्याकांड घडवणाऱ्या जनरल ओडवायरची हत्या केली होती. देशातल्या तीन प्रमुख धर्मांमधली एकता दाखवण्यासाठी त्यांनी ब्रिटीशांच्या कोठडीत असताना राम मोहम्मद सिंग आझाद हे नाव धारण केलं होत...