राष्ट्रीय

January 16, 2025 8:14 PM

views 21

छत्तीसगडमध्ये झालेल्या चकमकीत १२ नक्षलवादी ठार

छत्तीसगडच्या बीजापूर जिल्हयात बस्तरच्या जंगलात सुरु असलेल्या चकमकीत किमान १२ माओवादी मारले गेले आहेत. बीजापूर जिल्ह्याच्या तेलंगणा सीमेवरील दक्षिण बस्तर च्या जंगलात आज सकाळी ९ वाजल्यापासून ही चकमक सुरू होती. या जंगलात मोठ्या प्रमाणात माओवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर केंद्रीय राखीव पोलीस दल, कोब्...

January 16, 2025 8:13 PM

views 10

भारताच्या इलेक्ट्रॉनिक्स निर्यातीमध्ये ३५.११ टक्क्यांनी वाढ

भारताची इलेक्ट्रॉनिक्स निर्यात ३५ पूर्णांक ११ शतांश टक्क्यांनी वाढून गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात ३ अब्ज ५८ कोटी डॉलर्स इतक्या उच्चांकावर पोहचली आहे. ही गेल्या दोन वर्षांतली उच्चांकी वाढ आहे. गेल्या वर्षी याच काळात २ अब्ज ६५ कोटी डॉलर्स इतकी निर्यात झाली होती.

January 16, 2025 8:10 PM

views 25

क्षेपणास्त्रांच्या पुरवठ्याकरता संरक्षण मंत्रालयाचा भारत डायनॅमिक्स लिमिटेडशी करार

भारतीय नौदलासाठी मध्यम पल्ल्याच्या, जमिनीवरुन हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांच्या पुरवठ्याकरता संरक्षण मंत्रालयानं आज भारत डायनॅमिक्स लिमिटेडशी करार केला. सुमारे ३ हजार कोटी रुपयांचा हा करार आहे. नौदलाच्या अनेक जहाजांवर ही क्षेपणास्त्र यंत्रणा बसवता येण्याजोगी असून, भविष्यात तयार केल्या जाणाऱ्या ब...

January 16, 2025 7:35 PM

views 19

आरबीआयनं डिफेन्स अकाऊंट्स को-ऑपरेटिव्ह बँकेवरचे निर्बंध हटवले

रिझर्व्ह बँकेनं डिफेन्स अकाऊंट्स को-ऑपरेटिव्ह बँकेवरचे निर्बंध आजपासून हटवले आहेत. गेल्यावर्षी मार्च महिन्यात बँकेवर निर्बंध लादले होते. मात्र बँकेच्या वित्तीय परिस्थितीची तपासणी केल्यानंतर निर्बंध हटवण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेनं घेतला आहे.

January 16, 2025 2:21 PM

views 23

प्रधानमंत्र्यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या स्टार्ट अप इंडिया या योजनेला आज ९ वर्षं पूर्ण

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या स्टार्ट अप इंडिया या योजनेला आज ९ वर्षं पूर्ण होत आहेत. या निमित्ताने प्रधानमंत्र्यांनी समाज माध्यमावर विशेष संदेश लिहिला आहे. सरकारने देशात स्टार्टअपला प्रोत्साहन देण्यासाठी सर्वतोपरी साहाय्य केल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या...

January 16, 2025 2:18 PM

views 35

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने पाच उमेदवारांची चौथी यादी केली जाहीर

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने पाच उमेदवारांची चौथी यादी आज जाहीर केली. बवाना मतदारसंघातून सुरेंदर कुमार, करोल बागमधून राहुल धनक निवडणूक लढणार आहेत. सुरेश गुप्ता हे रोहिणी मतदारसंघातून, तुघलकाबाद इथून विरेंदर बिधुरी आणि बद्रापूर इथून अर्जुन भदाना निवडणूक लढणार आहेत. त्याआधी मंगळवारी काँग्रे...

January 16, 2025 2:15 PM

views 8

पंजाब सरकार शहीद भगतसिंह यांच्या मूळ गावी वारसा मार्गाची निर्मिती करणार – मुख्यमंत्री भगवंत मान

पंजाब सरकार शहीद भगतसिंह यांच्या मूळ गावी वारसा मार्गाची निर्मिती करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री भगवंत मान यांनी काल केली. संग्रहालयापासून भगतसिंहांच्या वडिलोपार्जित घरापर्यंत ८५० मीटरचा रस्ता तयार करण्यात येणार आहे, असं मान यांनी सांगितलं. यामुळे देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातलं राज्याचं योगदान अधोरे...

January 16, 2025 2:13 PM

views 3

प्रयागराज येथे ३१ जानेवारीला हरित महाकुंभ मेळ्याचं आयोजन

प्रयागराज इथं सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यातून संस्कृती आणि भक्तीबरोबरच पर्यावरण संवर्धनही केलं जात आहे. ३१ जानेवारीला हरित महाकुंभ मेळ्याचं आयोजन केलं आहे. देशात पर्यावरण आणि जल संवर्धनासाठी काम करणारे एक हजारांहून अधिक कार्यकर्ते या दिवशी प्रयागराजला येणार आहेत. यावेळी निसर्ग, पर्यावरण, जल आणि स्वच...

January 16, 2025 2:11 PM

views 26

संशयित आरोपीने केलेल्या हल्ल्यात दोन पोलीस कर्मचारी जखमी

पश्चिम बंगालमध्ये काल एका संशयित आरोपीने केलेल्या हल्ल्यात दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले. या संशयितासह इतर दोघांना राजगंज इथल्या सुधारगृहात नेत असताना त्यानं पोलिसांची बंदूक हिसकावून घेतली आणि त्यांच्यावर गोळीबार केला. या घटनेत जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांवर उपचार सुरू आहेत.

January 16, 2025 2:08 PM

views 28

दिल्लीत संध्याकाळपर्यंत पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता – हवामान विभाग

दिल्ली आणि परिसरात आज सकाळी हलक्या पावसाच्या सरी कोसळल्या. यामुळे तापमानात घट झाली असली तरी दृश्यमान्यता सुधारली आहे. दिल्लीत संध्याकाळपर्यंत पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता भारतीय हवामान विभागानं दिली आहे. पश्चिमेला होत असलेल्या हवामान बदलाचा फटका राजस्थान, पंजाब, हरियाणा आणि दिल्लीला बसत असल्याची ...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.