राष्ट्रीय

January 15, 2025 2:27 PM

views 13

परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी स्पेनच्या राष्ट्राध्यक्षांची घेतली भेट

परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी दोन दिवसांच्या स्पेन दौऱ्यात स्पेनचे राष्ट्राध्यक्ष पेद्रो सँचेज यांची भेट घेतली. दोन्ही देशातले संबंध अधिक दृढ करण्याबाबत उभय नेत्यांनी सहमती दर्शवली. यावेळी जयशंकर यांनी सँचेज यांना माद्रीद इथं झालेल्या चर्चेची माहिती दिली, तसंच दोन्ही देशांच्या द्विपक्षीय ...

January 15, 2025 2:24 PM

views 17

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू, पक्षांचे नेते मतदारांपर्यंत पोहोचण्याचा करत आहेत प्रयत्न

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असतानाच सर्व पक्षांचे नेते मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. भाजपाचे परवेश वर्मा आणि रोहिणी गुप्ता हे आज नामांकन अर्ज दाखल करणार आहेत. आपचे नेते मनिश सिसोदिया हे जंगपुरा मतदारसंघातून अर्ज दाखल करणार आहेत. तर काँग्रेसचे...

January 15, 2025 2:20 PM

views 14

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या नवीन मुख्यालयाचं आज नवी दिल्लीत झालं उद्घाटन

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या नवीन मुख्यालयाचं उद्घाटन आज नवी दिल्लीत झालं. पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, आणि काँग्रेस संसदीय पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी यांनी या इंदिरा भवनचं उद्घाटन केलं. लोकसभेतले विरोधी पक्ष नेता राहुल गांधी आणि इतर ज्येष्ठ नेते यावेळी उपस्थित होते.

January 15, 2025 2:14 PM

views 24

केरळच्या उद्योग मंत्र्यांनी यूएईच्या गुंतवणूक मंत्र्यांची आणि चेंबर ऑफ कॉमर्सच्या चेअरमनची घेतली भेट

केरळचे उद्योग मंत्री पी. राजीव यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ संयुक्त अरब अमिराती दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात राजीव यांनी यूएईचे गुंतवणूक मंत्री मोहम्मद हसन अल सुवैदी आणि चेंबर ऑफ कॉमर्सचे चेअरमन अहमद जसीम अल जाबी यांची भेट घेतली. येऊ घातलेल्या इनव्हेस्ट केरला ग्लोबस समिटबाबत त्यांनी आपली वचनबद्धता दर...

January 15, 2025 3:14 PM

views 29

७७व्या लष्कर दिनानिमित्त देशाचं सेनादलाला अभिवादन

सशस्त्र दलाच्या अतुलनीय बलिदानाचा सन्मान करण्यासाठी आज लष्कर दिन साजरा केला जात आहे. भारतीय लष्कराचं सैनिकांचं शौर्य, बांधिलकी आणि मातृभूमीची सेवा यांचा सन्मान करण्याचा हा दिवस आहे. याच दिवशी १९४९मध्ये तत्कालीन जनरल के. एम. करिअप्पा यांनी शेवटच्या ब्रिटीश कमांडर इन चीफकडून भारतीय सैन्याची सूत्रं हात...

January 15, 2025 10:20 AM

views 22

‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमासाठी विक्रमी नोंदणी

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासोबत परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी यावेळी विक्रमी सव्वा तीन कोटी विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी नोंदणी केली आहे. यात परदेशी विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. या कार्यक्रमाची आठवी आवृत्ती शालेय स्तरावर 12 जानेवारीपासून सुरू झाली असून, ती 23 जानेवारी र...

January 15, 2025 10:13 AM

views 25

महाकुंभमेळयात मकरसंक्रांतीच्या दिवशी सुमारे साडेतीन कोटी भाविकांनी केलं पवित्र स्नान

उत्तर प्रदेशातील प्रयागराज इथे सुरू असलेल्या महाकुंभमेळयात काल मकरसंक्रांतीच्या दिवशी त्रिवेणी संगमावर सुमारे साडेतीन कोटी भाविकांनी पवित्र स्नान केलं. या महाकुंभ मेळयात भाविकांना भाषेचा अडसर होऊ नये म्हणून ईलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने 'भाषिणी'मंच उपलब्ध करून दिला आहे. यात अकरा भ...

January 15, 2025 10:11 AM

views 24

लडाखमध्ये, कारगिलमधील राष्ट्रीय महामार्ग एकवर झालेल्या अपघातात पाच जणांचा मृत्यू

लडाखमध्ये, कारगिलमधील राष्ट्रीय महामार्ग एकवर कटपाकासी शिलिकचे इथं काल एका स्कॉर्पिओची ट्रिपरशी टक्कर होऊन झालेल्या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला, तर दोन जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये तीन स्थानिक रहिवाशांचा समावेश आहे. जखमींवर कारगिल जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

January 15, 2025 10:02 AM

views 15

पंजाब, हरयाणा, चंदीगढ, दिल्ली आणि उत्तर प्रदेशच्या पश्चिम भागात आज वीजांसह वादळी वारे वाहण्याचा हवामान विभागाचा अंदाज

पंजाब, हरयाणा, चंदीगढ, दिल्ली आणि उत्तर प्रदेशच्या पश्चिम भागात आज वीजांसह वादळी वारे वाहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पुढील दोन दिवस उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशात पाऊस आणि बर्फवृष्टि होण्याची शक्यताही हवामान विभागाने वर्तवली असून, मध्य भारत आणि महाराष्ट्रातील किमान तापमानात 2 ते 3 अंश स...

January 14, 2025 9:07 PM

views 17

राष्ट्रीय हळद बोर्डाच्या स्थापनेचं प्रधानमंत्र्यांकडून स्वागत

देशातल्या हळद उत्पादकांचे प्रश्न सोडवण्यासाठी तसंच हळद उत्पादनाला जागतिक बाजारपेठेत स्थान मिळवून देण्यासाठी केंद्रसरकारने राष्ट्रीय हळद बोर्डाची स्थापना केली आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी आज नवी दिल्ली इथं या हळदबोर्डाचं उद्घाटन केलं. तेलंगणात निजामाबाद इथं या बोर्डाचं मुख...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.