राष्ट्रीय

January 21, 2025 1:22 PM January 21, 2025 1:22 PM

views 4

प्रजासत्ताक दिन संचलनाची जोरदार तयारी सुरु

येत्या रविवारी २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी दिल्लीत कर्तव्य पथावर होणाऱ्या शानदार संचलनाच्या कार्यक्रमात भारताचं सांस्कृतिक वैभव आणि भारतीय सैन्य दलाचं कौशल्य याचं दर्शन घडणार आहे. त्यात सहभागी होणाऱ्या पथकांचा कसून सराव चालू आहे. हवाई दलाच्या हेलिकॉप्टर्सनी आज हवाई कसरतीचा सराव केला. &...

January 20, 2025 8:27 PM January 20, 2025 8:27 PM

views 9

भारतात आर्थिक सुधारणांमुळे GDP दर 7-8% टक्के राहील- GDP अध्यक्ष बोर्ग ब्रेन्डे

भारतात आर्थिक सुधारणांमुळे मोठ्या प्रमाणावर गुंतवणूकीच्या पार्श्वभूमीवर जीडीपी अर्थात राष्ट्रीय स्थूल उत्पादन वाढीचा दर सात ते आठ टक्के राहील असा अंदाज डब्ल्यूइएफ अर्थात जागतिक आर्थिक मंचाचे अध्यक्ष आणि कार्यकारी अधिकारी बोर्ग ब्रेन्डे यांनी वर्तवला आहे. स्वित्झर्लंडमधल्या दावोस इथं आज या मंचाची ५५ ...

January 20, 2025 8:25 PM January 20, 2025 8:25 PM

views 11

छत्तिसगडमधे सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत दोन माओवादी ठार

छत्तिसगडमधल्या गरियाबंद जिल्ह्यात आज सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत दोन माओवादी ठार झाले. घटनास्थळावर सापडलेली  स्वयंचलित रायफल जप्त करण्यात आली आहे.  या चकमकीत कोब्रा बटालियनचा एक जवान जखमी झाला आहे. त्याला रायपूरला हलवण्यात आलं आहे.

January 20, 2025 8:24 PM January 20, 2025 8:24 PM

views 14

भारत जागतिक स्तरावरचा सातव्या क्रमांकावरचा कॉफी उत्पादक देश

गेल्या आर्थिक वर्षात भारताकडून होणारी कॉफीची निर्यात १ अब्ज २९ कोटी डॉलर्स इतकी झाली असून आता भारत जागतिक स्तरावरचा सातव्या क्रमांकावरचा कॉफी उत्पादक देश बनला आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. २०२०-२१ या काळात भारताने ७१ कोटी ९० लाख रुपये किमतीची कॉफी निर्यात क...

January 20, 2025 8:00 PM January 20, 2025 8:00 PM

views 11

जम्मू काश्मीरमधे दहशतवादविरोधी कारवाईत लष्कराचा एक जवान गंभीर जखमी

जम्मू काश्मीरमधे बारामुल्ला जिल्ह्यात जालोरा गुज्जरपती सोपोर जंगलपरिसरात दहशतवादविरोधी कारवाईत लष्कराचा एक जवान गंभीर जखमी झाला आहे. आज दुसऱ्या दिवशीही कारवाई सुरू आहे. लपून बसलेल्या दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या संयुक्त दलानं मोहीम तीव्र केली असून संपूर्ण परीसराला...

January 20, 2025 7:46 PM January 20, 2025 7:46 PM

views 7

महाराष्ट्राच्या मनन शर्मा या NCC छात्राला रक्षा मंत्री पदक

देशातला युवा ही देशाची संपत्ती असून ते राष्ट्र उभारणी आणि समृद्धीमध्ये योगदान देतील, असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्ली इथं राष्ट्रीय छात्र सेनेच्या प्रजासत्ताक दिन शिबिर 2025 ला संबोधित करताना बोलत होते.  सर्व छात्रांनी एकता आणि राष्ट्रीय अखंडतेला आपल्या जीवनात प्राधा...

January 20, 2025 7:44 PM January 20, 2025 7:44 PM

views 5

Delhi Election : आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी ३९७ गुन्हे दाखल

दिल्ली विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यापासून आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी आतापर्यंत ३९७ गुन्हे दाखल केले आहेत. एका निवेदनाद्वारे दिल्ली पोलिसांनी आज ही माहिती दिली. एका निवेदनात, 212 विना परवाना शस्त्रं, सुमारे 36 हजार लिटर दारू आणि 15 कोटी रुपये किमतीचे सुमारे 75 किलोग्...

January 20, 2025 7:44 PM January 20, 2025 7:44 PM

views 14

उत्तराखंड राज्य मंत्रिमंडळाची समान नागरी संहितेला मान्यता

उत्तराखंड राज्य मंत्रिमंडळाने आज समान नागरी संहितेला मान्यता दिली. तात्काळ प्रभावानं त्याची अंमलबजावणी केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांनी केली. या निर्णयामुळे उर्वरित राज्यांना त्याची प्रेरणा मिळेल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.  

January 20, 2025 7:17 PM January 20, 2025 7:17 PM

views 13

कामगारांना सामाजिक सुरक्षा देण्याला सरकारचं प्राधान्य-डॉ. मनसुख मांडविय

देशात ७० ते ८० लाख असंघटित कामगार असून कोणताही भेदभाव न करता कामगारांना सामाजिक सुरक्षा देणं याला सरकारचं प्राधान्य असल्याचं केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री डॉ. मनसुख मांडविय यांनी आज सांगितलं. असंघटित क्षेत्रातल्या कामगारांना संघटित बनवणं आणि त्यांना सामाजिक सुरक्षा कवच मिळवून देणं या विषयावरच्या द...

January 20, 2025 3:27 PM January 20, 2025 3:27 PM

views 1

८५ व्या अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषदेचं पाटणा इथं उद्घाटन

विधीमंडळाद्वारे देशातल्या नागरिकांची सेवा करण्याची महत्त्वाची जबाबदारी पीठासीन अधिकाऱ्यांवर आहे, असं प्रतिपादन लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी केलं. पाटण्यात सुरू झालेल्या ८५ व्या अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषदेच्या उद्घाटन समारंभात ते आज बोलत होते. विधीमंडळात होणारे गोंधळ आणि त्यांचं पावित्र्य ज...