राष्ट्रीय

May 1, 2025 8:37 PM May 1, 2025 8:37 PM

views 8

देशात गेल्या महिन्यात २ लाख ३७ हजार लाख कोटी रुपयांच्या जीएसटीचं संकलन

देशात गेल्या महिन्यात २ लाख ३७ हजार लाख कोटी रुपयांच्या  जीएसटी, अर्थात वस्तू आणि सेवा कराचं संकलन झालं आहे. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात २ लाख १० हजार कोटी रुपयांचा महसूल जमा झाला होता. त्या तुलनेत यावेळी या कर संकलनात १२ पूर्णांक ६ दशांश टक्के वाढ झाली आहे.    गेल्या महिन्यात २७ हजार ३४१ कोटी...

May 1, 2025 8:33 PM May 1, 2025 8:33 PM

views 10

एस जयशंकर यांची चो ताई युल यांच्याशी पहलगाम हल्ल्याविषयी दूरध्वनीवरून चर्चा

परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी दक्षिण कोरियाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री चो ताई युल यांच्याशी पहलगाम दहशतावादी हल्ल्याविषयी दूरध्वनीवरून चर्चा केली. भारताच्या दहशतवादाविरुद्धच्या लढाईला दक्षिण कोरियानं पाठिंबा दिल्याबद्दल त्यांनी चो ताई युल यांचे आभार मानले. 

May 1, 2025 7:59 PM May 1, 2025 7:59 PM

views 16

पहलगाम हल्ल्याच्या न्यायालयीन चौकशीची मागणी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

पहलगाम हल्ल्याच्या न्यायालयीन चौकशीची मागणी करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज फेटाळली.  अशा प्रकारची न्यायालयीन चौकशी सैन्यदलाचं धैर्य खच्ची करु शकेल असं कारण न्यायालयानं दिलं आहे. घटनेचं गांभीर्य लक्षात घेता ही याचिका करणं चुकीचं आहे, असं न्यायालयानं म्हटलं आहे.

May 1, 2025 7:46 PM May 1, 2025 7:46 PM

views 24

देशात यावर्षी २५६ मेट्रिक टन गव्हाची खरेदी

देशात यावर्षी २५६ मेट्रिक टन गव्हाची खरेदी पूर्ण झाली असल्याची माहिती अन्न आणि सार्वजनिक पुरवठा सचिव संजीव चोप्रा यानी दिली आहे. दिल्लीत बातमीदारांशी बोलताना ते म्हणाले की, या वर्षीच्या अखेरपर्यंत ३१२ मेट्रिक टन गव्हाची खरेदी करण्याचं उद्दीष्ट पूर्ण करण्यात येईल. ऑनलाईन नोंदणीमुळे शेतकऱ्यांच्या गव्ह...

May 1, 2025 7:23 PM May 1, 2025 7:23 PM

views 6

चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रांकीरेड्डी यांना मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार प्रदान

चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रांकीरेड्डी यांना आज युवक व्यवहार आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडविय यांनी नवी दिल्ली इथं  २०२३ चा मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार दिला. या दोनही खेळाडूंची समर्पण वृत्ती आणि असामान्य कामगिरीचा हा गौरव आहे असं मांडविय यांनी समाजमाध्यमावरच्या आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

May 1, 2025 7:18 PM May 1, 2025 7:18 PM

views 11

पहिल्या जागतिक दृक्‌श्राव्य मनोरंजन शिखर परिषदेचं मुंबईत प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

देशात सध्या ऑरेंज इकॉनॉमी अर्थात सर्जनकेंद्रीत अर्थव्यवस्थेचा उदय होतो आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत जिओ वर्ल्ड कन्वेन्शन सेंटर इथे सुरू असलेल्या वेव्हज् अर्थात जागतिक दृक्‌श्राव्य मनोरंजन शिखर परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यात आशय, सर्जनशीलता आणि संस्क...

May 1, 2025 8:13 PM May 1, 2025 8:13 PM

views 3

व्यावसायिक वापराच्या गॅस सिलेंडरच्या किमतीत घट

इंधन कंपन्यांनी आज व्यावसायिक वापरासाठीच्या १९ किलो वजनी गॅस सिलेंडरच्या किमती कमी केल्या. मुंबईत या सिलेंडरचा दर  आता १ हजार ७१३रुपये ५० पैशांऐवजी १ हजार ६९९ रुपये  तर दिल्लीत १ हजार ७४७ रुपये ५० पैसै झाला आहे.  घरगुती वापराच्या १४ किलो वजनी सिलेंडरच्या किमतीत मात्र कोणताही बदल केलेला नाही.

May 1, 2025 3:42 PM May 1, 2025 3:42 PM

views 4

आज कामगार दिन

जागतिक अर्थव्यवस्थेतलं कामगारांचं योगदान अधोरेखित करण्यासाठी आज कामगार दिन साजरा केला जातो. कामगारांचे कामाचे तास आठ तासापर्यंत मर्यादित करण्यासाठी अमेरिकेत झालेल्या आंदोलनापासून एक मे हा दिवस कामगार दिन म्हणून ओळखला जातो. जगभरातल्या कामगारांचे हक्क आणि कामगारांच्या पिळवणूकी विरोधातली आंदोलनं यांचं ...

May 1, 2025 1:42 PM May 1, 2025 1:42 PM

views 15

प्रधानमंत्र्यांच्या हस्ते ‘वेव्हज’ परिषदेचं उद्घाटन

वेव्हज् हा फक्त एका परिषदेचं संक्षिप्त नाव नाही, तर खरोखर एक सांस्कृतिकतेची, सर्जनशीलतेची, जागतिक स्तरावर परस्परसंबंधांची लाट आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. मुंबईत जिओ वर्ल्ड कन्वेन्शन सेंटर इथे सुरू असलेल्या वेव्हज् अर्थात जागतिक दृक्‌श्राव्य मनोरंजन शिखर परिषदेच्या उद्घाट...

April 30, 2025 7:25 PM April 30, 2025 7:25 PM

views 4

ISCE बोर्डाचा १० वी आणि १२ वीचा निकाल जाहीर

भारतीय शालेय प्रमाणपत्र परीक्षा परिषदेने आयएससीई इयत्ता १० वी आणि आयएससी इयत्ता १२ वी चे निकाल आज जाहीर केले. दोन लाख पन्नास हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती तर ९९ हजार पाचशे एकावन्न विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती.   दहावीत ९९ पुर्णांक ३७ टक्के गुणांसह मुलींनी...

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.