इंधन कंपन्यांनी आज व्यावसायिक वापरासाठीच्या १९ किलो वजनी गॅस सिलेंडरच्या किमती कमी केल्या. मुंबईत या सिलेंडरचा दर आता १ हजार ७१३रुपये ५० पैशांऐवजी १ हजार ६९९ रुपये तर दिल्लीत १ हजार ७४७ रुपये ५० पैसै झाला आहे. घरगुती वापराच्या १४ किलो वजनी सिलेंडरच्या किमतीत मात्र कोणताही बदल केलेला नाही.
Site Admin | May 1, 2025 8:13 PM | gas price
व्यावसायिक वापराच्या गॅस सिलेंडरच्या किमतीत घट
