राष्ट्रीय

December 2, 2025 8:19 PM December 2, 2025 8:19 PM

views 12

मतदार याद्यांचं पुनरिक्षण आणि इतर मुद्द्यांवरुन संसदेत गदारोळ

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी मतदारयाद्यांच्या सखोल पुनरीक्षणाचा मुद्दा दोन्ही सभागृहात गाजला. या विषयावर तातडीने चर्चा करण्याची मागणी करत विरोधी पक्षाच्या सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी केल्यामुळे दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसातून दोन वेळा तहकूब झालं. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिज...

December 2, 2025 8:03 PM December 2, 2025 8:03 PM

views 22

दितवाह चक्रीवादळानं मोठं नुकसान ४१० जणांचा मृत्यू, ३३६ जण अद्याप बेपत्ता

श्रीलंकेत नुकत्याच येऊन गेलेल्या दितवाह चक्रीवादळानं मोठं नुकसान केलं असून विविध दुर्घटनांमध्ये ४१० लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याबरोबरच ३३६ जण अद्याप बेपत्ता असल्याची माहिती   श्रीलंकेच्या आपत्ती व्यवस्थापन केंद्रानं आज सकाळी  दिली. श्रीलंकेतल्या  २५ जिल्ह्यांमधल्या दीड कोटी लोकांना या चक्री...

December 2, 2025 7:59 PM December 2, 2025 7:59 PM

views 8

काशी तमिळ संगमम उपक्रमाच्या चौथ्या आवृत्तीचं उदघाटन

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज वाराणसी इथं काशी तमिळ संगमम उपक्रमाच्या चौथ्या आवृत्तीचं उदघाटन केलं. काशीमधल्या नमो घाटावर आयोजित या कार्यक्रमात तामिळनाडूतून आलेले चौदाशेहून अधिक प्रतिनिधी भाग घेत  आहेत. केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज...

December 2, 2025 8:08 PM December 2, 2025 8:08 PM

views 77

व्लादिमीर पुतिन यांच्या आगामी भारत भेटीत अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होण्याचा अंदाज

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या आगामी भारत भेटीत दोन्ही देशांदरम्यान अनेक करारांवर स्वाक्षऱ्या केल्या जाण्याचा अंदाज आहे, असं रशियाचे प्रवक्ते दिमित्री पेसकोव्ह यांनी दिल्लीत आयोजित दूरस्थ पत्रकार परिषदेत सांगितलं. एस -४०० ही क्षेपणास्त्र प्रणाली आणि एस यू -५७ हे लढाऊ विमान हे पुतिन यांच्या ...

December 1, 2025 8:38 PM December 1, 2025 8:38 PM

views 23

संसदेत गदारोळामुळे दोन्ही सदनांचं कामकाज उद्यापर्यंत तहकूब

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. विरोधी पक्ष सदस्यांनी मतदार यादी पुनरीक्षणासह विविध मुद्द्यांवर चर्चा करण्याची मागणी करत केलेल्या घोषणाबाजीमुळं दोन्ही सभागृहांच्या कामकाजात अडथळे आले. तत्पूर्वी दोन्ही सभागृहांनी दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली अर्पण केली आणि विश्वचषक जिंकणारा भारतीय म...

December 1, 2025 8:37 PM December 1, 2025 8:37 PM

views 19

नागालँडमध्ये हॉर्नबिल महोत्सवाला सुरुवात

नागालँडची राजधानी कोहिमा इथल्या किसामा इथं आज २६व्या हॉर्नबिल महोत्सवाची सुरुवात झाली. नागालँडचे गव्हर्नर अजय कुमार भल्ला, मुख्यमंत्री नेईफिऊ रिओ यांनी महोत्सवाचा औपचारिक प्रारंभ केला. नागालँडच्या राज्यदिनाबरोबरच सुरू होणाऱ्या या १० दिवसांच्या महोत्सवात विविध नागा समुदाय एकत्र येऊन परंपरा, लोककला, स...

December 1, 2025 8:24 PM December 1, 2025 8:24 PM

views 20

भारतानं ऑपरेशन सागर बंधू अंतर्गत श्रीलंकेला ५३ टन मदत साहित्य पोहोचवलं

ऑपरेशन सागर बंधू अंतर्गत दितवा चक्रीवादळाचा फटका बसलेल्या श्रीलंकेला भारतानं ५३ टन मदत साहित्य पोहोचवलं आहे. भारतीय नौदलाच्या दोन नौकांमधून साडेनऊ टन धान्य श्रीलंकेत पोहोचवण्यात आलं आहे. याशिवाय, तंबू, पांघरुणं, तयार अन्नपदार्थ, औषधं, वैद्यकीय साहित्य यासह आणखी साडे एकतीस टन मदत साहित्य, भारतीय हवाई...

December 1, 2025 8:04 PM December 1, 2025 8:04 PM

views 14

देशभरात डिजिटल अटक फसवणूक प्रकरणांचा तपास सर्वोच्च न्यायालयानं सीबीआयकडे सोपवला

देशभरात डिजिटल अटक फसवणूक प्रकरणांचा तपास आज सर्वोच्च न्यायालयानं सीबीआयकडे सोपवला. देशात डिजिटल अटक घोटाळे, गुंतवणूक घोटाळे आणि अंशकालीन कामासंबंधीचे घोटाळे या तीन प्रकारचे सायबर घोटाळे होत असल्याची माहिती, सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्य कांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची यांच्या पीठाला ॲमिकस क्युर...

December 1, 2025 7:55 PM December 1, 2025 7:55 PM

views 10

दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातल्या प्रदूषणावर उपाय शोधण्यासाठी महिन्यातून दोनदा सुनावणी

दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातल्या प्रदूषणाचा मुद्दा हा दर हिवाळ्यात न्यायालयात आणायचा मुद्दा नसून यावरचे अल्पकालीन आणि दीर्घकालीन उपाय शोधण्यासाठी यावर महिन्यातून दोनदा सुनावणी घेतली जाईल, असं आज सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं. कोरोनाच्या काळातही शेतातला कचरा जाळला जात होता, पण तरीही आकाश नि...

December 1, 2025 7:51 PM December 1, 2025 7:51 PM

views 13

GST संकलनात यंदा सात दशांश टक्क्यांची वाढ नोंदवत, १ लाख ७० हजार कोटी रुपयांवर

देशभरातलं वस्तू आणि सेवा कर संकलन गेल्यावर्षी नोव्हेंबरच्या तुलनेने यंदा सात दशांश टक्क्यांनी वाढून १ लाख ७० हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त झालं आहे. गेल्या वर्षी याच महिन्यात जीएसटी महसूल १ कोटी ६९ लाख कोटी रुपये इतका होता. तर ऑक्टोबरमध्ये केंद्राचा जीएसटी महसूल ३४ हजार ८४३ कोटी आणि राज्याचा जीएसटी म...