आंतरराष्ट्रीय

December 15, 2025 12:22 PM December 15, 2025 12:22 PM

views 24

अमेरिकन सरकार आजपासून H-1Bआणि H-4 व्हिसा अर्जदारांची पडताळणी सुरू करणार

अमेरिकन सरकार आजपासून H-1Bआणि H-4 व्हिसा अर्जदारांची अतिरिक्त तपासणी आणि पडताळणी सुरू करणार आहे.  यामध्ये त्यांच्या सोशल मीडिया प्रोफाइलची तपासणीदेखील समाविष्ट आहे. १५ डिसेंबरपासून सर्व H-1Bअर्जदार आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या व्यक्तींच्या ऑनलाइन संदेशांचा आढावा घेतला जाईल, असं एका नवीन आदेशात प...

December 15, 2025 12:41 PM December 15, 2025 12:41 PM

views 26

प्रधानमंत्री दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी जॉर्डनला रवाना

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज जॉर्डन, इथीओपिया आणि ओमान या ३ देशांच्या दौऱ्यावर रवाना झाले. सर्वप्रथम ते जॉर्डनला भेट देतील. या भेटीत ओमानचे राजे अब्दुल्ला द्वितीय इब्न अल हुसेन आणि प्रधानमंत्री  जफर हुसेन यांच्याशी परस्परसंबंधाबाबत चर्चा करणार असल्याचं मोदी यांनी रवाना होताना  सांगितलं. याशिवाय ते ज...

December 15, 2025 11:06 AM December 15, 2025 11:06 AM

views 29

भारतानंं बांगलादेशचे दावे फेटाळले

बांगलादेशच्या माजी प्रधानमंत्री शेख हसीना यांना त्यांच्या समर्थकांना भडकावणारी विधानं करण्यासाठी नवी दिल्लीमधून प्रोत्साहन मिळत असल्याच्या बांगलादेशमधील अंतरिम सरकारनं एका निवेदनाद्वारे केलेल्या दाव्याचं भारतानं स्पष्टपणे खंडन केलं आहे. याबाबत प्रसिद्ध केलेल्या एका निवेदनात भारताच्या परराष्ट्र व्यवह...

December 14, 2025 8:15 PM December 14, 2025 8:15 PM

views 28

ऑस्ट्रेलियात सिडनी इथल्या बॉण्डी समुद्रकिनाऱ्यावर झालेल्या गोळीबारात १२ जण ठार

ऑस्ट्रेलियात सिडनी इथल्या बॉण्डी समुद्रकिनाऱ्यावर आज  संध्याकाळी झालेल्या गोळीबारात एका हल्लेखोरासह १२ जण ठार  झाले. तर आणखी एका हल्लेखोराला पोलिसांनी ताब्यात घेतलं. या हल्ल्यात  दोन पोलिस अधिकाऱ्यांसह २९ जण जखमी झाले आहेत. ही घटना  धक्कादायक आणि अत्यंत वेदनादायक असल्याचं ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री ...

December 14, 2025 2:56 PM December 14, 2025 2:56 PM

views 11

हमासच्या शस्त्रास्त्र निर्मिती विभागाचा प्रमुख ‘राद साद’ ठार

गाझा पट्टीत काल झालेल्या हल्ल्यात हमासच्या शस्त्रास्त्र निर्मिती विभागाचा प्रमुख ‘राद साद’ ठार झाल्याची माहिती इस्रायलने दिली आहे. सादने हमासच्या सैन्य उभारणीचं नेतृत्वही केलं होतं. दोन वर्षांपूर्वी ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर झालेल्या हल्ल्याच्या सूत्रधारांपैकी ‘साद’ हा एक होता. त्याच्यामुळेच गाझामध्य...

December 13, 2025 8:14 PM December 13, 2025 8:14 PM

views 6

डोनाल्ड ट्रंप यांनी मध्यस्थी केल्यानंतरही थायलंड-कंबोडिया चकमकी सुरु

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी मध्यस्थी केल्यानंतरही थायलंड आणि कंबोडिया दरम्यान चकमकी सुरु आहेत. दोन्ही देशांच्या नेत्यांमधे शस्त्रसंधीकरण्यावर सहमती झाली असल्याचं ट्रंप यांनी जाहीर केलं होतं. मात्र कोणताही शस्त्रसंधी झालेला नाही असं थायलंड सरकारने स्पष्ट केलं आहे. तर कंबोडियाने अद्याप प्रति...

December 12, 2025 2:54 PM December 12, 2025 2:54 PM

views 22

युरोप मधल्या शाळेत हिजाब किंवा बुरखा घालण्यावर बंदी

 युरोप मधल्या ऑस्ट्रिया या देशानं १४ वर्षांखालच्या मुलींनी शाळेत हिजाब किंवा बुरखा घालण्यावर बंदी घालणारा कायदा मंजूर केला आहे. हा नियम सर्व सरकारी आणि खासगी शाळांमध्ये लागू होणार आहे. तरुण मुलींना सक्षम बनवून त्यांना अत्याचारांपासून मुक्त ठेवण्यासाठी हा नियम अमलात आणल्याचं ऑस्ट्रिया सरकारनं म्हटलं ...

December 12, 2025 2:50 PM December 12, 2025 2:50 PM

views 9

पाकिस्तानच्या रात्री झालेल्या स्फोटात शाळा पूर्णपणे उद्ध्वस्त

पाकिस्तानच्या उत्तर वझिरिस्तानमधल्या मीर अली इथल्या एका सरकारी शाळेत काल रात्री झालेल्या स्फोटात शाळा पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. अयाज कोट इथल्या शाळेत अज्ञात हल्लेखोरांनी स्फोटके पेरली होती. या स्फोटामुळे शाळेतले सर्व शैक्षणिक उपक्रम ठप्प झाले आहेत.

December 12, 2025 2:46 PM December 12, 2025 2:46 PM

views 7

जपानमध्ये ६. ७ दशांश रिक्टर स्केल क्षमतेचा भूकंपाचा धक्का

जपानमध्ये, आओमोरी प्रांताच्या पूर्व किनाऱ्यावर आज सकाळी ६ पूर्णांक ७ दशांश रिक्टर स्केल क्षमतेचा भूकंपाचा धक्का बसला. या भूकंपाचा केंद्रबिंदू केप एरिमो प्रांताच्या  नैऋत्येला सुमारे १२० किलोमीटर अंतरावर भूगर्भात २० किलोमीटर खोलीवर होता.   जपानच्या हवामान संस्थेनं  भूकंपानंतर त्सुनामीचा इशारा दि...

December 12, 2025 2:42 PM December 12, 2025 2:42 PM

views 7

बांगलादेशचे अध्यक्ष मोहम्मद शहाबुद्दीन यांचा सार्वत्रिक निवडणुकीनंतर आपलं पद सोडण्याचा निर्णय

बांगलादेशचे अध्यक्ष मोहम्मद शहाबुद्दीन यांनी पुढल्या वर्षी १२ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर आपलं पद सोडण्याचा निर्णय जाहीर केला आहे.   मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालच्या हंगामी सरकारमध्ये आपल्याला अपमानास्पद वागणूक मिळत असल्यामुळे हा निर्णय घेतल्याचं त्यांनी म्हटलं आहे. &n...