आंतरराष्ट्रीय

January 11, 2026 5:48 PM

views 18

रशियाच्या वोरोनेझ शहरावर युक्रेननं केलेल्या ड्रोन हल्ल्यात एकजण ठार

रशियाच्या वोरोनेझ शहरावर युक्रेननं केलेल्या ड्रोन हल्ल्यात एकजण ठार झाला, तर इतर तिघे जखमी झाले. यात १० पेक्षा जास्त इमारती, घरं आणि एका शाळेचं नुकसान झाल्याची माहिती शहराच्या गव्हर्नरनं दिली. रशियाच्या हवाई सुरक्षा यंत्रणेनं १७ ड्रोन पाडल्याचंही त्यांनी सांगितलं.

January 11, 2026 11:17 AM

views 44

इराणमध्ये सरकारविरोधी निदर्शनं तीव्र

इराणमध्ये सरकारविरोधी निदर्शने तीव्र झाली आहेत. इराणमधील या अशांत परिस्थितीला दहशतवादीच जवाबदार असल्याचं इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड्सने म्हटलं आहे. इराणमध्ये सध्या इंटरनेट बंद असून तिथल्या सध्याच्या परिस्थितीबाबत माहिती मिळणं अवघड होत आहे. तेहरानसह रश्त, तब्रीझ, शिराझ, केरमानमध्ये महागाईच्या विरो...

January 10, 2026 8:00 PM

views 29

नोबेल शांतता पुरस्कारासाठी पात्र असल्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा पुनरुच्चार

भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या संघर्षासह जगभरात सुरू असलेली ८ युद्धं आपण थांबवल्याचा आणि कोट्यवधी लोकांचे प्राण वाचवल्याचा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज पुन्हा केला. जगातल्या इतर कोणत्याही नेत्याने अशी कामगिरी केलेली नाही, त्यामुळे आपण नोबेल शांतता पुरस्कारासाठी पात्र आहोत, याचा पु...

January 10, 2026 7:35 PM

views 28

महागाई, बेराजगारीच्या प्रश्नावर इराणमध्ये गेले १४ दिवस आंदोलन सुरू

इराणमधील आंदोलनाचा मोठा परिणाम हवाई वाहतुकीवर झाला आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या कारणास्तव तिथली इंटरनेट सेवा ठप्प आहे. परिणामी इराणहून येणारी आणि इराणला जाणारी अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणे प्रलंबित किंवा रद्द करण्यात आली आहेत. यूएईस्थित फ्लायदुबई या विमान कंपनीनं इराणला जाणारी सर्व उड्डा...

January 10, 2026 6:41 PM

views 21

कांगोमधल्या संघर्षादरम्यान शेजारच्या बुरुंडी देशात आश्रय घेणाऱ्या ५३ शरणार्थींचा मृत्यू

कांगोमधल्या संघर्षादरम्यान शेजारच्या बुरुंडी या देशात आश्रय घेणाऱ्या ५३ शरणार्थींचा मृत्यू झाल्याचं संयुक्त राष्ट्रांच्या निर्वासितांशी संबंधित संस्थेनं आपल्या अहवालात म्हटलं आहे. यापैकी २५ जणांचा मृत्यू कॉलराच्या प्रादुर्भावामुळे, तर सहा जणांचा मृत्यू रक्तक्षय आणि कुपोषणाशी संबंधित इतर आजारांमुळे झ...

January 10, 2026 6:39 PM

views 19

मुक्त व्यापार कराराशी संबंधित अडचणी दूर करून वाटाघाटींना वेग देण्याचे निर्देश

भारत आणि युरोपियन युनियनच्या व्यापार मंत्र्यांनी प्रस्तावित मुक्त व्यापार कराराशी संबंधित अडचणी दूर करून कराराला अंतिम रूप देण्यासाठी आपल्या अधिकाऱ्यांना याबाबतच्या वाटाघाटींना वेग देण्याचे निर्देश दिले आहेत. वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आणि युरोपियन युनियनचे व्यापार आणि आर्थिक सुरक्षा आयुक्...

January 10, 2026 12:35 PM

views 30

बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे नेते तारिक रहमान यांची पक्षाच्या अध्यक्षपदी नियुक्ती

बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे नेते तारिक रहमान यांची पक्षाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. माजी प्रधानमंत्री आणि प्रदीर्घ काळ पक्षाध्यक्ष राहिलेल्या खालिदा झिया यांच्या निधनामुळे हे पद रिक्त झालं होतं. पक्षाच्या स्थायी समितीच्या काल झालेल्या बैठकीत एकमताने हा निर्णय घेण्यात आला. पक्षाचे सरचि...

January 9, 2026 8:53 PM

views 37

चालू वर्षासह आगामी काही वर्षं भारत ही जगातली सर्वात तेजीनं वाढणारी अर्थव्यवस्था-UN

चालू आर्थिक वर्षात सुद्धा भारताचा आर्थिक विकास दर जगात सर्वाधिक   राहण्याची शक्यता  संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक आणि सामाजिक व्यवहार विभागानं वर्तवली आहे. २०२५-२६ मध्ये हा दर ७ पूर्णांक ४ दशांश टक्के राहण्याचा या विभागाचा अंदाज आहे. २०२४-२५ मध्ये हा दर ७ पूर्णांक १ दशांश टक्के होता. जगातल्या इतर सर्...

January 9, 2026 1:29 PM

views 51

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन भारत भेटीवर

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन पुढच्या महिन्यात भारत भेटीवर येणार आहेत. नवी दिल्ली इथं आयोजित करण्यात येणाऱ्या एआय इम्पॅक्ट परिषदेत ते सहभागी होतील. एआय इम्पॅक्ट परिषदेची घोषणा प्रधानमंत्र्यांनी फ्रान्स एआय ॲक्शन परिषदेत केली होती. पुढच्या महिन्यात १९-२० फेब्रुवारी रोजी ही परिषद होणार आह...

January 9, 2026 1:25 PM

views 32

इराणमधल्या ३१ प्रांतांमध्ये १३ दिवसांची इंटरनेट बंदी

इराणमधे सुरू असलेल्या सरकारविरोधी निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर इराणमधल्या ३१ प्रांतांमधे १३ दिवसांची इंटरनेट बंदी करण्यात आली आहे. यामुळे देशभरातली मोबाईल सेवादेखील विस्कळीत झाली आहे. २८ डिसेंबरला सुरू झालेल्या निदर्शनांमुळे माजलेल्या अराजकतेमुळे आतापर्यंत ४५ जणांचा मृत्यू झाला असून २०० पेक्षा जास्त ...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.