मनोरंजन

April 5, 2025 7:40 PM April 5, 2025 7:40 PM

views 12

प्रख्यात अभिनेते मनोजकुमार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

प्रख्यात चित्रपट अभिनेते, दिग्दर्शक मनोज कुमार यांच्या पार्थिवावर आज मुंबईच्या पवन हंस स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. अभिनेता अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, प्रेम चोप्रा, सलीम खान, रझा मुराद, राजपाल यादव, दिग्दर्शक सुभाष घई यांच्यासह मनोरंजनविश्वातले मान्यवर यावेळी उपस्थित होते. म...

April 5, 2025 8:23 AM April 5, 2025 8:23 AM

views 9

ज्येष्ठ चित्रपट अभिनेते, दिग्दर्शक मनोज कुमार यांचं निधन; आज मुंबईत अंत्यसंस्कार

हिंदी चित्रपटसृष्टीतले ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते मनोज कुमार यांचं काल सकाळी मुंबईत निधन झालं. ते 87 वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिव देहावर आज सकाळी अकरा वाजता मुंबईत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. मनोज कुमार यांचं मूळ नाव हरिकृष्ण गिरी गोस्वामी असं होतं; मात्र देशभक्त नायक म्हणू...

April 4, 2025 7:22 PM April 4, 2025 7:22 PM

views 3

आकाशवाणीच्या लोकप्रिय कार्यक्रम निर्मात्या सुषमा हिप्पळगावकर यांचं निधन

आकाशवाणीच्या लोकप्रिय कार्यक्रम निर्मात्या सुषमा हिप्पळगावकर यांचं  काल मुंबईत निधन झालं. त्या ७३ वर्षांच्या होत्या.  आकाशवाणी मुंबई केंद्रातून कार्यक्रम अधिकारी म्हणून त्यांनी २००६ मधे स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. नागपूर मध्ये लोकमत मधून त्यांनी पत्रकार म्हणून काही काळ काम केलं होतं.    आकाशवा...

April 1, 2025 7:24 PM April 1, 2025 7:24 PM

views 16

वेव्हजमध्ये ८५ हजार स्पर्धकांची नोंदणी

वेव्हज अर्थात वर्ल्ड ऑडिओ-व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिटचा एक भाग असलेल्या क्रिएट इन इंडियाच्या पहिल्या पर्वात ८५ हजारांच्या नोंदणीचा टप्पा गाठला आहे. यात ११०० आंतरराष्ट्रीय स्पर्धकांचा समावेश आहे. विविध प्रकारच्या ३२ प्रकारांसाठी घेण्यात आलेल्या फेऱ्यांमधून ७५०हून अधिक स्पर्धकांची निवड अंतिम फेरीस...

March 31, 2025 6:13 PM March 31, 2025 6:13 PM

views 11

मुंबई होणाऱ्या वेव्ह परिषदेच्या दरम्यान वेव्हज बाजाराचही आयोजन

मुंबई होणाऱ्या वेव्ह परिषदेच्या दरम्यान वेव्हज बाजाराचही आयोजन केलं जाणार आहे. यात चित्रपट, टीव्ही, Animation, VFX, Gaming, and Comics यासारख्या क्षेत्रातले दिग्गज एकत्र येणार आहेत. यात भागिदारी, व्यवसाय विस्तार यासारख्या गोष्टींवर चर्चा होईल. त्यासाठी प्रक्षेपण व्यवस्था, खरेदीदार - विक्रेते यांच्या...

March 26, 2025 3:21 PM March 26, 2025 3:21 PM

views 11

अभिनेत्री रुही सिंग यांची इंडियन कॉमिक्स असोसिएशनची प्रादेशिक ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती

अभिनेत्री रुही सिंग यांना इंडियन कॉमिक्स असोसिएशनची प्रादेशिक ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे आणि त्या वेव्हज २०२५ या कार्यक्रमात असोसिएशनचं प्रतिनिधित्व करणार आहेत. क्रिएट इन इंडिया अंतर्गत वेव्हज २०२५ परिषदेची अंतिम फेरी येत्या १ ते ४ मे दरम्यान मुंबईत होणार आहे.

March 25, 2025 7:44 PM March 25, 2025 7:44 PM

views 29

वेव्हज परिषदेसाठी अभिनेता अक्षय कुमारच्या शुभेच्छा

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने आज जागतिक दृक् श्राव्य आणि मनोरंजन परिषद वेव्हज २०२५ साठी शुभेच्छा दिल्या आहेत. ही परिषद १ ते ४ मे दरम्यान मुंबईत होणार आहे.   समाज माध्यमावर सामायिक केलेल्या व्हिडिओ संदेशात अक्षय कुमारनं या परिषदेचे कौतुक करत याला एक महत्वपूर्ण टप्पा म्हटलं आहे. ही परिषद जगभरातल ...

March 24, 2025 7:06 PM March 24, 2025 7:06 PM

views 24

‘वेव्हज बाजार’ कायमस्वरूपी ऑनलाईन मंच सुरू होणार

मुंबईत येत्या १ ते ४ मे दरम्यान होणाऱ्या वेव्हज या शिखर परिषदेच्या निमित्ताने वेव्हज बाजार हा कायमस्वरूपी ऑनलाईन मंच सुरु करण्यात येणार असून देशातल्या आशय निर्मात्यांसाठी जागतिक स्तरावर आदानप्रदान करण सोपं होणार आहे.    क्रिएट इन इंडिया उपक्रमाचा भाग असणाऱ्या वेव्ह्ज २०२५ अंतर्गत उद्या नागपूरमध...

March 23, 2025 3:37 PM March 23, 2025 3:37 PM

views 31

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडून बंद

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआय अर्थात केंद्रीय अन्वेषण संस्थेनं बंद केला आहे. या प्रकरणी सीबीआयनं दोन वेगवेगळे क्लोजर रिपोर्ट दाखल केले. एका तक्रारीत सुशांतच्या वडिलांनी अभिनेत्री रिया चक्रवर्तीवर आरोप केले होते. याचा क्लोजर रिपोर्ट सीबीआयनं पाटणा इथं विशेष न्यायालयात दाखल क...

March 23, 2025 1:11 PM March 23, 2025 1:11 PM

views 8

वेव्हज यंग फिल्ममेकर स्पर्धेची अंतिम यादी जाहीर

वेव्हज यंग फिल्ममेकर स्पर्धेसाठी देशभरातून तेराशेपेक्षा जास्त स्पर्धकांनी नाव नोंदणी केली आहे. यातल्या २० स्पर्धकांची अंतिम यादीत निवड झाली आहे. अमोल गुप्ते आणि चैतन्य चिंचलीकर यांचं मार्गदर्शन तसंच व्हिसलिंग वूड्स इंटरनॅशनलची मदत या स्पर्धकांना मिळाली. व्हिसलिंग वूड्स इंटरनॅशनलमधे मार्गदर्शन तसंच प...