निवडणुका

November 12, 2024 2:45 PM

views 30

विधानसभा निवडणुकीसाठी रत्नागिरीत आज टपाली मतदान सुरू

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी रत्नागिरीत आज टपाली मतदान सुरू आहे. पोलीस, तसंच मतदान केंद्रावर कर्तव्य बजावणारे अधिकारी आणि कर्मचारी यांनी रत्नागिरी शहरातल्या दामले हायस्कूल मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला. विधानसभा निवडणुकीत मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर उपस्थित राहू न शकणाऱ्या ज्य...

November 12, 2024 3:30 PM

views 6

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांची आजची सभा रद्द

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांची बुलडाणा जिल्ह्यातल्या चिखली मतदारसंघातली आजची नियोजित सभा रद्द झाली आहे. विमानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे आपण चिखलीला येऊ शकलो नाही, असं राहुल गांधी यांनी समाज माध्यमावरल्या संदेशात म्हटलं आहे. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या सोयाबीन आणि कापसाला हमीभाव मिळत ...

November 12, 2024 2:03 PM

views 10

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आज प्रधानमंत्र्यांसह अनेक बड्या नेत्यांच्या ठिकठिकाणी सभा

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या प्रचार शिगेला पोहोचला आहे. सर्वच पक्षांचे ज्येष्ठ नेते झंझावाती दौरे करुन आपापल्या पक्षाच्या किंवा आघाडीच्या उमेदवारांना मत देण्याचं आवाहन मतदारांना करत आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि इतर ज्येष्ठ नेते राज्यातल्या विविध जिल्ह्यांमध्ये प्रचारसभा घेणार आहेत. भाजप...

November 12, 2024 11:09 AM

views 29

केंद्रीय संचार ब्यूरो तर्फे राज्यातल्या १४ जिल्ह्यात मतदार जनजागृती अभियान सुरु

केंद्रीय संचार ब्यूरो तर्फे राज्यातल्या १४ जिल्ह्यात कालपासून मतदार जागृती अभियान सुरु करण्यात आलं आहे. मतदारांना खात्रीने मतदान करण्याचं आवाहन करत शहर आणि ग्रामीण भागात दहा दिवस हा प्रचार रथ फिरणार आहे. छत्रपती संभाजीनगर इथं जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून हा चित्ररथ रवान...

November 12, 2024 8:27 PM

views 28

झारखंड विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी उद्या मतदान

झारखंड विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी उद्या मतदान  होत आहे. या टप्प्यात ४३ मतदारसंघात मतदान होणार असून त्यासाठीची तयारी पूर्ण झाली आहे. यासाठी २२५ संवेदनशील मतदान केंद्रांसह एकूण १५ हजार ३४४ मतदान केंद्र उभारली आहेत. सुरक्षा दलाच्या दोनशेहून अधिक तुकड्या तैनात आहेत. सकाळी सात ते संध्याकाळ...

November 11, 2024 8:17 PM

views 42

११ राज्यांतल्या ३३ विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीसाठी आणि वायनाड लोकसभा मतदारसंघासाठीचा प्रचार संपला

११ राज्यांतल्या ३३ विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीसाठी आणि केरळमधल्या वायनाड लोकसभा मतदारसंघासाठी आज संध्याकाळी प्रचार संपला. राजस्थानात ७, पश्चिम बंगालमधे ६, आसाममधे ५, बिहारमधे ४, कर्नाटकात ३ आणि मध्य प्रदेश-सिक्कीममधे प्रत्येकी २ जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे. केरळ, छत्तीसगड, गुजरात, मेघालय ...

November 11, 2024 8:15 PM

views 26

झारखंड विधानसभा निवडणूक : पहिल्या टप्प्यातल्या मतदारसंघातला प्रचार संपला

झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचा प्रचार आज सायंकाळी संपला. या टप्प्यातील ४३ जागांसाठी बुधवारी मतदान होणार आहे. या टप्प्यात प्रचारादरम्यान दोनशेहून अधिक सभा घेण्यात आल्याचं वृत्त आमच्या वार्ताहरानं दिलं आहे. एनडीएनं बांगलादेशी घुसखोरी, हेमंत सोरेन सरकारविरोधातील भ्रष्टाचार, बेरोजगा...

November 11, 2024 7:42 PM

views 29

आचारसंहिता लागू झाल्यापासून ४९३ कोटी रुपयांहून अधिक रकमेची मालमत्ता जप्त

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध अंमलबजावणी संस्थांच्या कारवाईत १५ ऑक्टोबरपासून आतापर्यंत ४९३ कोटी ४६ लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे. तर सी व्हिजिल ऍपवर आतापर्यंत आचारसंहिता भंगाच्या ४ हजार ७११ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी ४ हजार ६८३ तक्रारी नि...

November 11, 2024 7:29 PM

views 28

राज्यात मतदान जनजागृती कार्यक्रमाला सुरूवात

केंद्रीय संचार ब्यूरो, पुणे प्रादेशिक कार्यालयातर्फे राज्यातील १४ जिल्ह्यात आजपासून मतदार जागृती अभियान सुरु करण्यात आलं आहे. मतदारांना खात्रीने मतदान करण्याचं आवाहन करत शहर आणि ग्रामीण भागात दहा दिवस हा प्रचार रथ फिरणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यात जिल्हास्तरीय जनजागृती कार्यक्रमाला आज सुरुवात झाली. अह...

November 11, 2024 7:23 PM

views 29

काँग्रेस आणि भाजपा नागरिकांची फसवणूक करत असल्याची प्रकाश आंबेडकर यांची टीका

काँग्रेस आणि भाजपा नागरिकांची फसवणूक करत असल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज वाशिम इथल्या प्रचारसभेत केली. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी संविधानाच्या रंगावरून वाद घालून लोकांना भ्रमित करू नये, असंही आंबेडकर म्हणाले.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.