निवडणुका

November 11, 2024 7:56 PM

views 23

काँग्रेसच्या २८ पदाधिकाऱ्यांचं सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबन

विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरुद्ध बंडखोरी करत उमेदवारी दाखल केल्याबद्दल तसंच पक्षविरोधी कारवाई केल्याबद्दल काँग्रेसने विविध मतदारसंघातल्या २८ पदाधिकाऱ्यांना सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित केलं आहे. ही कारवाई प्रदेश प्रभारी रमेश चेन्निथला यांच्या आदेशावरून तसंच प्रदेशाध्यक्ष नाना प...

November 11, 2024 1:35 PM

views 24

झारखंड विधानसभेच्या पहिल्या टप्प्याच्या मतदानासाठी आज संध्याकाळी प्रचार थांबणार

झारखंड विधानसभेच्या पहिल्या टप्प्यात १३ नोव्हेंबर रोजी ४३ जागांसाठी मतदान होणार आहे. त्यासाठी आज संध्याकाळी प्रचार थांबणार आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी दुपारी १२ वाजता पक्ष कार्यकर्त्यांशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधणार आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि इंडिया आघा...

November 11, 2024 11:07 AM

views 31

हिंगोली जिल्ह्यात गृह मतदानाला सुरुवात, पहिल्या दिवशी ७०० ज्येष्ठ आणि दिव्यांग मतदारांचं मतदान

हिंगोली जिल्ह्यात गृह मतदानाला सुरुवात झाली असून, काल पहिल्या दिवशी ७०० ज्येष्ठ आणि दिव्यांग मतदारांनी मतदान केलं. गृह मतदानासाठी जिल्ह्यातून एक हजार ७० जणांनी नोंदणी केली आहे. सेनगाव तालुक्यातल्या हुळी इथं १०२ वर्षे वयाच्या आजोबांनी, तसंच ८७ वर्षीय पारूबाई पोले यांनी मतदानाचा हक्क बजावला.  

November 11, 2024 9:14 AM

views 54

85 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी अनेक ठिकाणी गृहमतदान सुविधा उपलब्ध

भारत निवडणूक आयोगानं 85 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यासाठी सांगली जिल्ह्यात नोंदणी करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्या घरी जावून गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करून दिली देत आहे. याबद्दल ज्येष्ठ नागरिकांनी भारत निवडणूक आयोग आणि निवडणूक यंत्रणेचे आभार मानले आहेत. व...

November 10, 2024 7:03 PM

views 23

महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकाचं राज्य बनवणं हा महायुतीचा उद्देश – गृहमंत्री अमित शाह

विधानसभा निवडणुकीचा प्रचार राज्यात शिगेला पोचला असून, आज विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी जाहीर सभा, रोड शो इत्यादींच्या माध्यमातून मतदारांना साद घातली. भाजपाचे ज्येष्ठ नेते, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही आज राज्यात प्रचारदौरा केला.    तत्त्वांसोबत तडजोड करत कसंही करून सत्तेत येणं हा महा...

November 10, 2024 7:17 PM

views 21

मविआचा महाराष्ट्रनामा हा वचननामा नसून ‘थापा’नामा असल्याची मुख्यंमत्र्यांची टीका

महाविकास आघाडीचा महाराष्ट्रनामा हा वचननामा नसून ‘थापा’नामा असल्याची टीका मुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. ठाणे इथं आज त्यांनी प्रचारासाठी रॅली काढली, तेव्हा ते बातमीदारांशी बोलत होते. महायुतीनं ‘लाडकी बहीण’ योजना सुरु केली, तेव्हा पैसे कुठून आणणार असं म्हणत आमच्याविरोधात न्यायालयात धाव घेणाऱ्...

November 10, 2024 6:50 PM

views 30

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका

राज्यातला शेतकरी शेतमालाला हमीभाव मागत आहे, मात्र भाजपाचे नेते इतर मुद्यांवर बोलून दिशाभूल करत आहेत अशी टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगोला इथल्या प्रचारसभेत केली. काश्मीरमधलं ३७० कलम हटवलं असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सांगतात मात्र काश्मीरमधले दहशतवादी हल्ले अजूनही थांबले नाहीत, भाज...

November 10, 2024 6:42 PM

views 22

मतदारांना आकर्षित करण्यासाठी लाडकी बहीण योजना आणली – शरद पवार

लोकसभा निवडणुकीत भाजपला मतदारांनी स्पष्ट कौल न दिल्यानं मतदारांना आकर्षित करण्यासाठी त्यांनी लाडकी बहीण सारखी योजना आणली, असं मत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केलं. ते आज एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. भाजपाच्या नेतृत्वाखालचं सरकार संविधानाला धक्का पोहोचवेल अशी भिती लोकसभा निवडण...

November 10, 2024 6:24 PM

views 21

काँग्रेसने संविधान बदलण्यात येणार असल्याचा विषारी प्रचार चालवलाय – मंत्री नितीन गडकरी

काँग्रेस ने संविधानाचा सोयीनुसार  वापर केला, अवहेलना केली, आणि आता संविधान बदलण्यात येणार असल्याचा विषारी प्रचार चालवला आहे, अशी टीका भाजपाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी केली आहे. यवतमाळमधे राळेगाव इथं ते प्रचारसभेत बोलत होते. त्यामुळे जातीवादी आणि सांप्रदायिक प्रचारापासून दूर रहावं असं आवाहन त्य...

November 10, 2024 6:17 PM

views 34

महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम करण्यासाठी हाती सत्ता द्या, राज ठाकरेंचं आवाहन

पुणे शहरातही आज विविध पक्षाच्या उमेदवारांनी जोरदार प्रचार केला. मला खुर्चीचा किंवा सत्तेचा सोस नाही, तर महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम करायचंय, म्हणून माझ्या हाती एकदा सत्ता द्या, असं आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं आहे. ते आज पुण्यात आयोजित प्रचार सभेत बोलत होते.   ...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.