निवडणुका

November 30, 2024 8:22 PM

views 23

काँग्रेसच्या मुद्यांवर चर्चेची तयारी असल्याचं केंद्रीय निवडणूक आयोगाचं प्रतिपादन

महाराष्ट्रातली विधानसभा निवडणुकीची प्रक्रीया पूर्णपणे पारदर्शक होती, तरीही काँग्रेसने याबाबत उपस्थित केलेल्या वाजवी मुद्यांचा विचार केला जाईल असं केंद्रीय निवडणूक आयोगाने म्हटलं आहे. विधानसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाच्या यंत्रणेबाबत शंका उपस्थित करणारं पत्र काँग्रेसने निवडणूक आयोगाला लिहीलं होतं. त्य...

November 28, 2024 1:40 PM

views 42

भाजपा पक्ष श्रेष्ठींसमवेत महायुतीच्या घटक पक्षांची बैठक

महाराष्ट्रात अद्यापही सरकरस्थापना आणि मुख्यमंत्री कोण होणार याविषयी निर्णय झालेला नाही. यासंदर्भात आज नवी दिल्लीत महायुतीच्या घटक पक्षांच्या नेत्यांची आज अमित शहा यांच्याबरोबर संयुक्त बैठक होणार असून त्यानंतर सरकार स्थापनेबद्दल चित्र स्पष्ट होण्याची अपेक्षा आहे.    दरम्यान भाजपचं वरिष्ठ नेतृत्व...

November 25, 2024 6:46 PM

views 45

विधानसभा निवडणुकीत यशाचं श्रेय तिघांना एकसमान-प्रफुल पटेल

विधानसभा निवडणुकीत भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांनी एकत्र म्हणून काम केलं, त्यामुळे यशाचं श्रेय या तिघांना एकसमान आहे, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल पटेल यांनी म्हटलं आहे. संसद परिसरात ते  प्रसारमाध्यमांशी बोलत होते.  तिन्ही पक्षांचे नेते एकत्र चर्चा करुन मुख्यमं...

November 24, 2024 7:38 PM

views 20

ईव्हीएमचा प्रश्न मिटेपर्यंत बसपा कोणत्याही पोटनिवडणुकीत भाग घेणार नाही- मायावती

ईव्हीएम अर्थात, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांचा प्रश्न मिटेपर्यंत बहुजन समाज पार्टी कोणत्याही पोटनिवडणुकीत भाग घेणार नाही, असं पक्षाच्या अध्यक्ष मायावती यांनी आज जाहीर केलं. त्या लखनौ इथं पक्षाच्या बैठकीनंतर बातमीदारांशी बोलत होत्या. उत्तरप्रदेशात नुकत्याच झालेल्या ९ विधानसभा मतदारसंघामधल्या पोटनिवडणुक...

November 25, 2024 6:42 PM

views 29

राज्यात मुख्यमंत्रीपदासंदर्भात अद्याप निर्णयाची प्रतीक्षा

विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर राज्यात सत्तास्थापनेबाबत विविध पातळ्यांवर चर्चा सुरु आहे. महायुतीतल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या विधिमंडळ पक्षांच्या नेत्यांची निवड झाली आहे. शिवसेनेच्या गटनेतेपदी विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्...

November 24, 2024 3:38 PM

views 34

हिंगोलीत शिवसेना आणि भाजपा कार्यकर्त्यांमध्ये वाद

राज्य विधानसभा निवडणूक निकालानंतर काल हिंगोलीत शिवसेना आणि भाजपा कार्यकर्त्यांमध्ये वाद होऊन गोळीबार झाल्याचं वृत्त आहे. काल दुपारी दोन वाजण्याच्या सुमाराला झालेल्या या घटनेत पाच जण जखमी झाले. या गोळीबारात संतोष बांगर यांच्या पुतण्याला गोळी लागल्याची माहिती आहे. त्याला हैदराबाद इथल्या रुग्णालयात दाख...

November 24, 2024 1:44 PM

views 12

विविध राज्यांतल्या विधानसभांच्या पोटनिवडणुकांचे निकाल स्पष्ट

विविध राज्यांतल्या विधानसभांच्या एकंदर ४८ पोटनिवडणुकांचे निकाल स्पष्ट झाले. आसाममधल्या पाचपैकी तीन जागांवर भाजपानं, तर युनायटेड पीपल्स पार्टी लिबरल आणि आसोम गण परिषद या पक्षांनी प्रत्येकी एका जागेवर विजय मिळवला आहे. बिहारमधल्या चारपैकी दोन जागी भाजपानं, तर प्रत्येकी एका जागेवर हिंदुस्तानी आवाम मोर्च...

November 24, 2024 1:41 PM

views 31

झारखंडमध्ये विधिमंडळ पक्षनेत्याच्या निवडीसाठी इंडिया आघाडीची रांचीमध्ये बैठक

झारखंडमध्ये इंडिया आघाडीच्या नेत्याच्या निवडीसाठी घटकपक्षांच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक आज रांची इथं होणार आहे. झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल आणि मार्क्सवादी लेनिनवादी कम्युनिस्ट पक्षाचे आमदार या बैठकीला हजर राहतील. इंडिया आघाडीच्या विधानसभा पक्षनेतेपदी हेमंत सोरेन यांची निवड ...

November 24, 2024 3:17 PM

views 25

मुख्यमंत्रीपदाबाबत कोणतेही मतभेद नाहीत – एकनाथ शिंदे

महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्याविषयी महायुतीचे सर्व घटक पक्ष मिळून चर्चा करू असं शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. महायुतीमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटप करताना कोणतेही मतभेद नव्हते. त्यामुळे सत्तास्थापन करतानाही मतभेद नाहीत  असं शिंदे यांनी सांगितलं.

November 24, 2024 3:18 PM

views 42

विधानसभा निवडणुकीची अधिसूचना आज प्रसिद्ध होणार

महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाचं चित्र स्पष्ट झाल्यानंतर विधानसभा निवडणुकीची अधिसूचना आज प्रसिद्ध होईल. त्यानंतर १५ ऑक्टोबर रोजी जाहीर झालेली आचारसंहिता संपेल, अशी माहिती निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, या निवडणुकीत भाजपा आणि महायुतीला विक्रमी यश मिळालं, तर काँग्रेस आणि...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.