निवडणुका

January 17, 2025 10:32 AM

views 28

दिल्ली विधानसभा निवडणुकीत 70 पैकी 68 जागांवर भारतीय जनता पक्ष निवडणूक लढवणार

दिल्ली विधानसभा निवडणुकीत, 70 जागांपैकी 68 जागांवर भारतीय जनता पक्ष निवडणूक लढवणार आहे. उर्वरित दोन जागांपैकी प्रत्येकी एक जागा राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे घटकपक्ष असलेल्या संयुक्त जनता दल आणि राम विलास गटाच्या जनशक्ती पक्षाला देण्यात आल्या आहेत.   बुरारी विधानसभा मतदारसंघातून संयुक्त जनता दल आणि...

January 17, 2025 10:24 AM

views 22

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. आतापर्यंत एकंदर 841 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.   सोमवारी 20 तारखेपर्यंत उमेदवार आपले अर्ज मागे घेऊ शकतात. दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी 5 फेब्रुवारीला मतदान होणार असून, 8 फेब्रुवारीला मतमोजणी होईल.

January 16, 2025 8:37 PM

views 23

दिल्ली विधानसभा : आम आदमी पक्षाचे मनीष सिसोदिया, सौरभ भारद्वाज, गोपाल राय यांनी उमेदवारी अर्ज भरले

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आज आम आदमी पक्षाचे मनीष सिसोदिया, सौरभ भारद्वाज, गोपाल राय यांनी उमेदवारी अर्ज भरले. भाजपाचे हरिष खुराणा, मनजिंदर सिंग सिरसा, आशिष सूद आणि कपिल मिश्रा यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. काँग्रेस नेते संदीप दीक्षित, अरीबा खान यांनीही आज उमेदवारी अर्ज भरले. या उमेदवारांसाठी वि...

January 16, 2025 2:18 PM

views 43

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने पाच उमेदवारांची चौथी यादी केली जाहीर

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने पाच उमेदवारांची चौथी यादी आज जाहीर केली. बवाना मतदारसंघातून सुरेंदर कुमार, करोल बागमधून राहुल धनक निवडणूक लढणार आहेत. सुरेश गुप्ता हे रोहिणी मतदारसंघातून, तुघलकाबाद इथून विरेंदर बिधुरी आणि बद्रापूर इथून अर्जुन भदाना निवडणूक लढणार आहेत. त्याआधी मंगळवारी काँग्रे...

January 15, 2025 8:35 PM

views 28

दिल्ली विधानसभा निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर, पोलिसांच्या उपाययोजना सुरु

दिल्ली विधानसभा निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर झालं असून या निवडणुका शांततेत आणि विनादबाव पार पडाव्यात याकरिता दिल्ली पोलिसांनी खबरदारीच्या उपाययोजना सुरु केल्या आहेत. १२३ विनापरवाना हत्यारं, ९२ काडतुसं, १२ कोटी रुपयांहून अधिक किमतीचे अमली पदार्थ पोलिसांनी जप्त केले असून एक कोटी रुपयांहून अधिकच्या रोकडी...

January 15, 2025 2:24 PM

views 19

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू, पक्षांचे नेते मतदारांपर्यंत पोहोचण्याचा करत आहेत प्रयत्न

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असतानाच सर्व पक्षांचे नेते मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. भाजपाचे परवेश वर्मा आणि रोहिणी गुप्ता हे आज नामांकन अर्ज दाखल करणार आहेत. आपचे नेते मनिश सिसोदिया हे जंगपुरा मतदारसंघातून अर्ज दाखल करणार आहेत. तर काँग्रेसचे...

January 10, 2025 8:01 PM

views 21

दिल्ली विधानसभा निवडणुकीची अधिसूचना जारी

दिल्ली विधानसभा निवडणुकीची अधिसूचना आज जारी झाली असून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. १७ जानेवारीपर्यंत उमेदवारांना अर्ज दाखल करता येतील. तर २० जानेवारी पर्यंत उमेदवारी अर्ज मागं घेता येतील. या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टी, भाजप आणि काँग्रेसमध्ये तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.

January 7, 2025 8:41 PM

views 31

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी एकाच टप्प्यात ५ फेब्रुवारीला मतदान

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी एकाच टप्प्यात ५ फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून ८ फेब्रुवारीला मतमोजणी होईल. केंद्रीय निवडणूक आयोगानं आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली.  या निवडणुकीसाठी १० जानेवारीला अधिसूचना प्रसिद्ध होईल, १७ तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. १८ ...

January 4, 2025 6:29 PM

views 20

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाची २९ उमेदवारांची यादी जाहीर

आगामी दिल्ली निवडणुकांसाठी नवी दिल्लीत भाजपनं आज आपचे संयोजक अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात माजी खासदार परवेश वर्मा यांची तर कलकाजी इथल्या जागेसाठी दिल्लीच्या मुख्यमंत्री अतिशी यांच्या विरोधात रमेश बिधुरी यांची उमेदवारी जाहीर केली आहे. याबरोबरच,  या निवडणुकांसाठी आपल्या पहिल्या २९ उमेदवारांची यादी ...

December 23, 2024 1:17 PM

views 26

विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपचं दिल्ली सरकारविरुद्ध आरोपपत्र जारी

दिल्लीत होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपने आज दिल्ली सरकारविरुद्ध आरोपपत्र जारी केले. सत्ताधारी आप सरकारनं नागरिकांना दिलेली आश्वासनं पूर्ण केले नाहीत असा आरोप करत भाजपचे ज्येष्ठ नेते  अनुराग ठाकूर, दिल्ली भाजपचे प्रमुख विरेंद्र सचदेवा आणि अन्य काही नेत्यांनी यासंदर्भातील पुरावे सादर केले आहेत....

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.