December 11, 2024 7:21 PM

views 13

२१ वे ऑटोमेकॅनिका दुबई हे प्रदर्शन दुबई जागतिक व्यापार केंद्रात सुरु

वाहन उद्योगाशी संबंधित २१ वे ऑटोमेकॅनिका दुबई हे प्रदर्शन दुबई जागतिक व्यापार केंद्रात सुरु झालं असून भारतीय वाहन उद्योगाचा त्यात वाढता  सहभाग आहे. १७ दालनं,२ हजार २०० हुन अधिक सहभागी यामुळे गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षीचं प्रदर्शन १८ टक्क्यांनी मोठं ठरलं आहे. गेल्या वर्षी १६१ देशातल्या तब्बल ५३ ह...

December 11, 2024 7:14 PM

views 18

UNEP चा चॅम्पियन ऑफ अर्थ जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ माधव गाडगीळ यांना जाहीर

संयुक्त राष्ट्रांची पर्यावरण संस्था असलेल्या UNEP चा चॅम्पियन ऑफ अर्थ जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ माधव गाडगीळ यांना जाहीर झाला आहे. पर्यावरणाचं संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी काम करणाऱ्यांना तसंच, जागतिक हवामान बदल, दुष्काळ आणि जमिनीचा खालावत चाललेला दर्जा याविरोधात काम करणाऱ्या व्यक्ती...

December 11, 2024 7:11 PM

views 23

केंद्र सरकार आर्टिफिशिअल इंटेलिजन्स कायदा करण्याच्या विचाराधीन

केंद्र सरकार आर्टिफिशिअल इंटेलिजन्स अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेवर नियंत्रण आणणारा कायदा करण्याच्या विचाराधीन असून, यावर सभागृहाचं एकमत अपेक्षित असल्याचं केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज लोकसभेत सांगितलं. देशात एक व्यापक भारत एआय मिशन सुरू करण्यात आलं असून, त्यात एआय कंप्युट स...

December 11, 2024 6:53 PM

views 10

कुर्ला बस अपघाताची चौकशीसाठी बृहन्मुंबई इलेक्ट्रिक वाहतूक परिवहन मंडळाची चार सदस्यीय समिती स्थापन

मुंबईतल्या कुर्ला बस अपघाताची चौकशी करण्यासाठी बृहन्मुंबई इलेक्ट्रिक वाहतूक परिवहन मंडळानं चार सदस्यीय समितीची स्थापना केली आहे. चालकानं सुरक्षा नियमांच पालन केलं होतं की नाही किंवा बसमध्ये काही तांत्रिक बिघाड होता यासंदर्भातील चौकशी ही समिती करेल. तसंच अपघातातल्या मृतांच्या कुटुंबाना तातडीची मदत म्...

December 11, 2024 7:33 PM

views 7

राष्ट्रीय पंचायत पुरस्कार २०२४ चं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते वितरण

राष्ट्रीय पंचायत पुरस्कार हे पंचायतींच्या समर्पणाचं आणि प्रयत्नांचं प्रतीक असल्याचं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज केलं. राष्ट्रीय पंचायत पुरस्कार २०२४ चं वितरण आज नवी दिल्लीतल्या विज्ञान भवन इथं राष्ट्रपतींच्या हस्ते झालं, त्यावेळी त्या बोलत होत्या.   या वर्षी विविध श्रेणींमध्ये ...

December 11, 2024 3:52 PM

views 31

शेतकरी कामगार पक्षाचे रायगड जिल्हा सरचिटणीस आस्वाद पाटील यांची पक्षाला सोडचिठ्ठी

शेतकरी कामगार पक्षाचे रायगड जिल्हा सरचिटणीस आस्वाद पाटील यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. आस्वाद पटेल हे शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांचे भाचे आणि माजी मंंत्री दिवंगत मिनाक्षी पाटील यांचे पुत्र आहेत. आस्वाद पाटील यांच्यासोबत पक्षाचे अनेक कार्यकर्ते बाहेर पडणार असल्याचं सांगितलं जात आहे. विधानसभा न...

December 11, 2024 3:25 PM

views 515

आरबीआयचे २६वे गव्हर्नर म्हणून संजय मल्होत्रा यांनी पदभार स्वीकारला

भारतीय रिझर्व्ह बँकेचे २६वे गव्हर्नर म्हणून संजय मल्होत्रा यांनी आज पदभार स्वीकारला. संजय मल्होत्रा हे भारतीय प्रशासकीय सेवेतले राजस्थान केडरचे १९९० सालचे अधिकारी असून, ते अर्थमंत्रालयात महसूल सचिव पदावर कार्यरत होते.

December 11, 2024 3:05 PM

views 35

महाराष्ट्रात रेल्वे प्रकल्पांमध्ये १ लाख ६४ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक – रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव

महाराष्ट्रात रेल्वेशी संबंधित विविध प्रकल्पांमध्ये १ लाख ६४ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली असल्याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज लोकसभेत दिली. राज्यात रेल्वेला प्रत्येक स्थानकावर थांबा देण्यासंदर्भात खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते. पुण्याहून ...

December 11, 2024 1:50 PM

views 6

प्रधानमंत्री मोदी आणि गृहमंत्री शाह यांनी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना वाहिली आदरांजली

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी आज माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना त्यांच्या जयंती निमित्त आदरांजली वाहिली. भारताच्या विकासकार्यात प्रणब मुखर्जी याचं भरीव योगदान राहिलं आहे. प्रशासन आणि भारतीय संस्कृतीची खोल समज यामुळे सर्वच बाबतीत ते सर्वसहमती निर्माण करू शकत, अशा शब्दात ...

December 11, 2024 1:44 PM

views 13

सरकार आणि उद्योगांनी जगभरात एकत्र येऊन काम करण्याची गरज – अर्थमंत्री निर्मला सीतारामन

जागतिक शांतता प्रस्थापित करण्यासाठी सरकार आणि उद्योगांनी जगभरात एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे, असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सांगितलं. नवी दिल्लीत भारतीय उद्योग संघाद्वारे आयोजित जागतिक आर्थिक धोरण मंचाच्या मेळाव्यात ‘जागतिक अर्थव्यवस्थेेसाठी दशकभराची प्राथमिकता’ या विषयावर त्य...