December 12, 2024 10:24 AM

views 20

अफगाणिस्तानचे निर्वासितांसाठीचे मंत्री खलिल रेहमान हक्कानी यांचा काबूलमध्ये आत्मघातकी हल्ल्यात मृत्यू

अफगाणिस्तानचे निर्वासितांसाठीचे मंत्री खालिल रेहमान हक्कानी यांचा काल आत्मघातकी हल्ल्यात मृत्यू झाला. काबूलमधील त्यांच्या कार्यालयात हा स्फोट झाला. हक्कानी कागदपत्रांवर सही करत असताना आत्मघातकी हल्लेखोरानं प्रवेश केला आणि त्यानं बॉब उडवून दिला. या हल्ल्यात आणखी सहा जणांचाही मृत्यू झाला. हा हल्ला आयस...

December 12, 2024 10:15 AM

views 14

फिडे जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत आज डी. गुकेश आणि डिंग लिरेन यांच्यात अंतिम सामना

फिडे जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत आज दुपारी भारताचा ग्रँडमास्टर डी. गुकेश आणि चीनचा गेल्या वेळचा विजेता डिंग लिरेन यांच्यात चौदावा आणि अंतिम सामना होणार आहे. या सामन्यातील विजेत्याला जागतिक विजेत्याचा मान मिळणार आहे. हा सामना अनिर्णित राहिल्यास उद्या स्पीडचेस प्रकारातून विजेता निवडला जाईल. काल गुकेश आणि...

December 12, 2024 10:12 AM

views 14

खेलो इंडिया 2025 हिवाळी स्पर्धा लडाख आणि जम्मू-काश्मीरमध्ये दोन स्वतंत्र टप्प्यांमध्ये होणार

खेलो इंडिया 2025 हिवाळी स्पर्धा लडाख आणि जम्मू-काश्मीरमध्ये दोन स्वतंत्र टप्प्यांमध्ये होणार आहेत. लडाखमध्ये 23 ते 27 जानेवारी या काळात आईस हॉकी आणि आईस स्किइंगसारख्या स्पर्धा होणार आहेत, तर जम्मू-काश्मीरमध्ये 22 ते 25 फेब्रुवारी या काळात अल्पाइन स्किइंग, स्नोबोर्डिंग अशा स्पर्धा होणार आहेत. केंद्री...

December 12, 2024 9:10 AM

views 55

‘शांतता… पुणेकर वाचत आहेत’ उपक्रमात साडेतीन लाख पुणेकर सहभागी

राष्ट्रीय पुस्तक न्यासतर्फे आयोजित पुणे पुस्तक महोत्सवाअंतर्गत पुणे शहरात ठिकठिकाणी 'शांतता... पुणेकर वाचत आहेत'उपक्रम काल राबवण्यात आला. साडेतीन लाख लोक या उपक्रमात सहभागी झाले. हा प्रतिसाद पाहता आगामी पुणे पुस्तक महोत्सव अधिक व्यापक होईल असा विश्वास महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे यांनी व्यक्त केला....

December 12, 2024 8:55 AM

views 15

युवकांमधला नवोन्मेष आणि तंत्रज्ञान कौशल्य ही देशाची खरी ताकद, प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

भारताचं सामर्थ्य आमची युवा शक्ती आहे. आणि युवकांमधला नवोन्मेष आणि तंत्रज्ञान कौशल्य ही आमची खरी ताकद असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. सातव्या स्मार्ट इंडिया हॅकेथॉनच्या अंतिम फेरीतील तेराशे विद्यार्थ्यांशी प्रधानमंत्र्यांनी दूरस्थ पद्धतीनं संवाद साधला. देशभरातल्या 51 केंद्रांवर य...

December 12, 2024 8:35 AM

views 45

महिलांच्या पन्नास षटकांच्या क्रिकेट मालिकेत ऑस्ट्रेलियाचा भारतावर विजय

महिला क्रिकेटमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात काल पर्थ इथे झालेल्या पन्नास षटकांच्या तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारताचा 83 धावांनी पराभव करत ही संपूर्ण मालिका जिंकली. 299 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचा डाव 45 षटक आणि एका चेंडूत 215 धावांतच आटोपला. भारताकडून स्मृती मंधानान...

December 11, 2024 8:05 PM

views 17

परभणीत कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात, जमावबंदीचे आदेश लागू

परभणी शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोरील संविधानाच्या प्रतीची अवहेलना केल्यामुळे आंबेडकरी अनुयायांनी केलेलं आंदोलन आज तीव्र झालं. आंबेडकरी संघटनांकडून परभणी बंदची हाक देण्यात आली तसंच ठिकठिकाणी रास्तारोको करण्यात आला. काही ठिकाणी दगडफेक आणि दुकानाची मोडतोड झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं...

December 11, 2024 7:52 PM

views 19

अनेक दिवसांच्या संघर्षानंतर सिरीयाची राजधानी दमास्कस येथील जनजीवन पूर्ववत

अनेक दिवसांच्या संघर्षानंतर सिरीयाची राजधानी दमास्कस येथील जनजीवन पूर्ववत होत असून लोक त्यांच्या दैनंदिन कामासाठी घराबाहेर पडत आहेत, असं सिरीयाचे हंगामी प्रधानमंत्री मोहम्मद अल बशीर यांनी सांगितलं. बाहेर देशात गेलेल्या सिरीयन नागरिकांना परत आणणं ही आपली प्राथमिकत आहे असं बशीर म्हणाले. देशात स्थैर्य ...

December 11, 2024 7:40 PM

views 30

एसटी अपघातांचं प्रमाण कमी करण्यासाठी चालकांच्या त्रिसूत्रीवर भर देण्यात येईल- भरत गोगावले

एसटी अपघातांचं प्रमाण कमी करण्यासाठी चालकांना सुयोग्य प्रशिक्षण, त्यांचं मानसिक आरोग्य सुदृढ करणं तसंच तांत्रिकदृष्ट्या सक्षम बसेस उपलब्ध करून देणं या त्रिसूत्रीवर यापुढे भर देण्यात येईल, असं प्रतिपादन एसटी महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावले यांनी आज केलं. भंडारा आणि नाशिक इथं झालेल्या एसटी अपघाताबरोबरच...

December 11, 2024 7:30 PM

views 18

महिला क्रिकेटमध्ये अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाचा भारतावर ८३ धावांनी विजय

महिला क्रिकेटमध्ये, आज पर्थ इथं झालेल्या तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारतावर ८३ धावांनी विजय मिळवला.  भारतानं नाणेफेक जिंकून यजमान ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं. ऑस्ट्रेलियानं निर्धारित ५० षटकात ६ गडी गमावून २९८ धावा केल्या. एनाबेला सिदरलँडच्या ११० धावांच्या तडाखेबंद खेळीम...