December 12, 2024 1:43 PM

views 54

गाझा पट्टीत युद्धबंदी करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांचा ठराव मंजूर

संयुक्त राष्ट्र संघाच्या महासभेत आज गाझा पट्टीत सुरु असलेल्या इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धबंदी करण्या संदर्भातला ठराव मंजूर झाला. यावेळी सर्व युद्धबंद्यांना तात्काळ सोडण्याचीही मागणी करण्यात आली. १९३ सदस्यांच्या राष्ट्रसंघातल्या १५८ सदस्यांनी युद्धबंदी करण्याच्या ठरावाच्या बाजूनं मतदान केलं.  

December 12, 2024 4:06 PM

views 22

छत्तीसगडमध्ये झालेल्या चकमकीत ७ माओवादी ठार

छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांशी आज झालेल्या चकमकीत सात माओवादी ठार झाले. नारायणपूर जिल्ह्यातल्या दक्षिण अबोझमद भागात केंद्रीय राखीव पोलीस दल, विशेष तपास पथक आणि जिल्हा राखीव दल यांनी संयुक्तपणे राबवलेल्या शोध मोहिमेदरम्यान आज सकाळी ही चकमक झाली. या माओवाद्यांचे मृतदेह सुरक्षा दलांनी ताब्यात घेतले असून ...

December 12, 2024 11:01 AM

views 19

सातारा जिल्हा सत्र न्यायाधीशांसह चौघांविरोधात लाचखोरी प्रकरणी गुन्हा दाखल

सातारा इथले तिसरे जिल्हा आणि सत्र न्यायाधीश धनंजय निकम यांच्यासह चौघांविरोधात लाचखोरी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक दयानंद गावडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. फसवणुकीच्या गुन्ह्यातील संशयिताला जामीन मिळवून देण्यासाठी पाच लाख रुपयांची...

December 12, 2024 10:58 AM

views 22

लातूर जिल्ह्यात आजपासून क्रीडा सप्ताहाचं आयोजन

लातूर जिल्ह्यात आजपासून क्रीडा सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे. १८ डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या सप्ताहाचं आज सकाळी जिल्हा क्रीडा संकुलावर उद्धाटन होईल. या सप्ताहात जिल्ह्यात विविध ठिकाणी विविध स्पर्धा होणार आहेत, यामध्ये धावणे, कराटे, तायक्वांदो, कुस्ती, स्केटिंग, लॉन टेनिस, आट्या-पाट्या, रग्बी, सायकल...

December 12, 2024 10:52 AM

views 23

बीड जिल्ह्यात वाढती गुंडगिरी आणि अपहरणाच्या घटनांची सीबीआय मार्फत चौकशी करण्यात यावी – बजरंग सोनवणे

बीड जिल्ह्यात वाढती गुंडगिरी आणि अपहरणाच्या घटनांची केंद्रीय अन्वेषण विभाग-सीबीआय मार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी केली आहे. काल दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सोनवणे यांनी भेट घेऊन ही मागणी केली. याविषयावर तातडीने ठोस पावलं उचलण्याचं आश्वासन केंद्रीय ग...

December 12, 2024 10:45 AM

views 38

नांदेड जिल्ह्यात श्रीक्षेत्र माहूर येथे दत्तशिखर गडावर आजपासून दत्त जयंती उत्सव सोहळ्याला होतोय प्रारंभ

नांदेड जिल्ह्यात श्रीक्षेत्र माहूर इथं दत्तशिखर गडावर आजपासून दत्त जयंती उत्सव सोहळ्याला प्रारंभ होत आहे. आज पहिली पालखी निघणार असून, १४ डिसेंबर रोजी दुपारी बारा ते दोन या वेळेत दत्त जन्मोत्सव साजरा होणार आहे. १७ डिसेंबरला काकड आरतीने दत्त जयंती उत्सवाची सांगता होईल. या सोहळ्यानिमित्त एसटीच्या माहूर...

December 12, 2024 10:43 AM

views 20

नैसर्गिक आपत्तीने शेत पिकांच्या झालेल्या नुकसानापोटी राज्य सरकारतर्फे निधी मंजूर

यंदाच्या पावसाळ्यात नैसर्गिक आपत्तीने शेत पिकांच्या झालेल्या नुकसानापोटी राज्य सरकारने निधी मंजूर केला आहे. धाराशिव जिल्ह्यातल्या एक लाख ६३ हजार ९७ हेक्टर क्षेत्रावरील एक लाख ८० हजार ७८६ शेतकऱ्यांच्या शेत पिकांचं नुकसान झाल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाने पाठवला होता, या नुकसानीपोटी २२१ कोटी ८१ लाख ३० ...

December 12, 2024 10:40 AM

views 25

बहुपैलू चित्रकर्मी राजकपूर यांच्या कुटुंबीयांनी घेतली प्रधानमंत्र्यांची भेट

बहुपैलू चित्रकर्मी राजकपूर यांच्या कुटुंबीयांनी काल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची नवी दिल्लीत भेट घेतली. राज कपूर यांची जन्मशताब्दी चौदा डिसेंबरला आहे. त्या निमित्तानं चाळीस शहरांमध्ये तेरा ते पंधरा डिसेंबर या काळात राज कपूर चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात आला असून, त्यासाठी कपूर कुटुंबीयांनी पंतप्...

December 12, 2024 1:46 PM

views 37

गव्हाच्या साठ्याच्या मर्यादेत बदल करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय

गव्हाच्या साठ्याच्या मर्यादेत बदल करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. हे बदल ३१ मार्च २०२५ पर्यंत लागू असतील. मोठे व्यापारी आणि घाऊक विक्रेत्यांसाठी गव्हाच्या साठ्याची मर्यादा आता दोन हजार टनांवरून एक हजार टनांपर्यंत कमी करण्यात आली आहे. किरकोळ विक्रेत्यांसाठी प्रति विक्री कक्षासाठीची मर्यादा ...

December 12, 2024 10:35 AM

views 14

परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर आणि संयुक्त अरब अमिरातीचे परराष्ट्र व्यवहार मंत्री आज नवी दिल्लीत चौथ्या भारत-संयुक्त अरब अमिरात धोरणात्मक संवाद परिषदेत होणार सहभागी

परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर आणि संयुक्त अरब आमिरातीचे परराष्ट्र व्यवहार मंत्री शेख अब्दुल्ला बिन झायेद अल नाह्यान आज नवी दिल्लीत चौथ्या भारत-संयुक्त अरब आमिरात धोरणात्मक संवाद परिषदेत सहभागी होणार आहेत. नाह्यान आज दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेणार आहेत. परराष्ट्र व्यवहार मंत्रा...