December 14, 2024 2:27 PM

views 27

विशेष गरज असलेल्या व्यक्तींच्या कल्याणासाठी सरकार वचनबद्ध – मंत्री रामदास आठवले

विशेष गरज असलेल्या व्यक्तींच्या कल्याणासाठी सरकार वचनबद्ध असून दिव्यांग व्यक्तींसाठी अनेक विशेष योजना राबवत असल्याचं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. ते काल तेलंगणात सिकंदराबादमध्ये मानसिक दुर्बल सबलीकरण राष्ट्रीय संस्था इथं दिव्यांग व्यक्तींना शैक्षणिक सामग्रीचं वाट...

December 14, 2024 2:22 PM

views 10

देशातल्या सर्व मुख्य सचिवांची परिषद प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सुरु

देशातल्या सर्व मुख्य सचिवांची चौथी राष्ट्रीय परिषद नवी दिल्लीत होत असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी परिषदेच्या अध्यक्षस्थानी आहेत. केंद्र आणि राज्यसरकारांमधला ताळमेळ वाढवण्याच्या दृष्टीनं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारातून या परिषदेची सुरुवात झाली. तीन दिवस चालणाऱ्या या परिषदेची संकल्पना उद...

December 14, 2024 1:46 PM

views 9

महिला कनिष्ठ गट हॉकी आशिया चषक स्पर्धेत आज भारताचा सामना जपानबरोबर

महिला कनिष्ठ गट हॉकी आशिया चषक स्पर्धेत आज भारताचा सामना जपानबरोबर होणार आहे. ओमानची राजधानी मस्कत इथं ही स्पर्धा होत असून गेल्या गुरुवारी थायलंडवर भारताने ९ - ० असा दणदणीत विजय मिळवला होता. या विजयामुळे भारत उपांत्यफेरीत पोहोचला, तसंच पुढच्या वर्षी चिलीमधे होणाऱ्या एफआयएच कनिष्ठ गट जागतिक हॉकी स्पर...

December 14, 2024 10:25 AM

views 17

स्मार्ट इंडिया हॅकेथॉन २०२४च्या सॉफ्टवेअर फेरीत राज्यातल्या संघांची चमकदार कामगिरी

स्मार्ट इंडिया हॅकेथॉन २०२४च्या सॉफ्टवेअर फेरीत राज्यातल्या संघांनी चमकदार कामगिरी केली आहे. या फेरीत कन्व्हर्सेशनल इमेज रेकग्निशन चॅटबॉट', 'महिला सुरक्षा', 'ट्रॅफिक व्यवस्थापनासाठी एआय आधारित उपाय', 'लाइव्ह लोकेशन ट्रॅकिंग आदी मुद्यांवर या संघांनी उपाय शोधण्याचा प्रयत्न केला. यात मुंबईच्या वेलिंगकर...

December 14, 2024 10:19 AM

views 97

बीड जिल्ह्यातल्या मस्साजोग सरपंच हत्या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे वर्ग

बीड जिल्ह्यात मस्साजोग इथले सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास गुन्हे अन्वेषण विभाग-सीआयडीकडे वर्ग करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी ही माहिती दिल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. ‘‘संतोष देशमुख यांचं गेल्या सोमवारी नऊ डिसेंबरला अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली, या गुन्ह्...

December 14, 2024 10:15 AM

views 14

११ व्या अंबाजोगाई साहित्य संमेलनाला आजपासून प्रारंभ

मराठवाडा साहित्य परिषदेच्या ११ व्या अंबाजोगाई साहित्य संमेलनाला आजपासून सुरुवात होणार आहे. डॉ. शिरीष खेडगीकर यांच्या हस्ते या संमेलनाचं उद्घाटन होणार असून समारोप डॉ. आदित्य पतकराव यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. स्वागताध्यक्ष सुदर्शन रापतवार यांनी ही माहिती दिली. साहित्यिक बालाजी सुतार हे या संम...

December 14, 2024 10:13 AM

views 34

भविष्यात मुंबई फिनटेकची राजधानी होईल-वर्ल्ड हिन्दू इकॉनॉमिक परिषदेत मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन

भविष्यात मुंबई फिन-टेकची राजधानी होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. काल मुंबईत जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमधे वर्ल्ड हिन्दू इकॉनॉमिक परिषदेचं उद्घाटन करतांना ते बोलत होते. २०२८ ते २०३० पर्यंत ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचं उद्दिष्ट राज्य सरकार पूर्ण करेल, असा विश्वास...

December 14, 2024 9:55 AM

views 16

दिल्ली-डेहराडून द्रुत-गती मार्गाच्या पूर्ण झालेल्या टप्प्याचं पंतप्रधान यांच्या हस्ते उद्घाटन होणार – मंत्री नितीन गडकरी

दिल्ली-डेहराडून द्रुत-गती मार्गाच्या पूर्ण झालेल्या टप्प्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या 15 ते 20 दिवसांत उद्घाटन होणार असल्याची माहिती रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. या द्रुतगती महामार्गामुळे दिल्ली डेहराडून या दोन्ही शहरांमधील अंतर अडीच तासांपर्यंत कम...

December 14, 2024 9:52 AM

views 15

श्रीलंकेच्या राष्ट्रपती अनुरा कुमारा दिसानायके उद्यापासून भारत दौऱ्यावर

श्रीलंकेच्या राष्ट्रपती अनुरा कुमारा दिसानायके उद्यापासून भारत दौऱ्यावर येणार आहेत. अध्यक्षपदी निवडून आल्यानंतर दिसानायके यांची ही पहिलीच भारत भेट आहे. त्यांच्या तीन दिवसंच्या दौऱ्यात ते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतील आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी द्विपक्षीय, प्रादेशिक आणि परस्पर ह...

December 14, 2024 9:44 AM

views 19

देशभरात एकूण 1 लाख 75 हजारांहून अधिक आयुष्मान आरोग्य मंदिरं सुरू

आरोग्य मंदिर या महिन्याच्या 10 तारखेपर्यंत देशभरात एकूण 1 लाख 75 हजारांहून अधिक आयुष्मान आरोग्य मंदिरं सुरू करण्यात आली आहेत. अशी माहितीही आणखी एका प्रश्नाला उत्तर देताना अनुप्रिया पटेल यांनी दिली.