December 14, 2024 9:29 AM

views 9

पंतप्रधान मातृवंदना योजनेच्या 3 कोटी 64 लाख लाभार्थ्यांना 18 हजार 854 कोटी रुपये वितरित

2017 पासून पंतप्रधान मातृवंदना योजनेच्या 3 कोटी 64 लाख लाभार्थ्यांना 18 हजार 854 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना महिला आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी काल ही माहिती दिली. या योजनेतील लाभार्थ्यांच्या कागदविरहित नोंदणीसाठी सरकारने अनेक योजना सुरू केल्या...

December 14, 2024 9:22 AM

views 20

प्रयागराज इथे 6 हजार 670 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचा पंतप्रधानांच्या हस्ते शुभारंभ

महाकुंभ 2025 हा एकता-समतेचा महायज्ञ ठरेल, देशाला मार्गदर्शन करेल आणि त्याची सर्वत्र चर्चा होईल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. 13 जानेवारी 2025 पासून अधिकृतपणे सुरू होणाऱ्या महाकुंभ-2025 चं औपचारिक उद्घाटन केल्यानंतर ते प्रयागराज संगम परिसरात एका मेळाव्यात बोलत होते. या प्रसंगी, त्यांनी...

December 13, 2024 8:28 PM

views 26

फ्रान्सचे नवे प्रधानमंत्री म्हणून फ्रान्स्वा बाऊरो यांची नेमणूक

फ्रान्सचे अध्यक्ष एमॅन्यूल मॅक्रॉन यांनी फ्रान्स्वा बाऊरो यांची नवे प्रधानमंत्री म्हणून नेमणूक केली. त्यांच्यासमोर सरकारला स्थिरता देणं आणि अर्थसंकल्प मंजूर करणं हे दोन आव्हानं आहेत. त्या आधीचे प्रधानमंत्री मायकल बार्नियर यांना अविश्वास दर्शक ठरावाद्वारे हटवलं होतं. फ्रान्सच्या इतिहासात सर्वात कमी क...

December 13, 2024 8:36 PM

views 28

विमानतळांवर लवकरच उडाण यात्री कॅफे सुरू होणार

उडाण योजनेअंतर्गत प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी सरकारतर्फे लवकरच विमानतळांवर उडाण यात्री कॅफे सुरू करण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री के.आर. राममोहन नायडू यांनी दिली. या कॅफेमध्ये प्रवाशांना परवडणाऱ्या किमतीत अन्न पदार्थांची विक्री करण्यात येईल. कोलकता विमानतळावर प्रायोगिक तत्त्वावर...

December 13, 2024 8:12 PM

views 15

पाकिस्तान कारागृहातल्या २,६३९ भारतीय मच्छीमारांची सुटका – मंत्री डॉ.एस जयशंकर

केंद्रसरकारच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे गेल्या दहा वर्षात पाकिस्तानच्या कारागृहात खितपत पडलेल्या २ हजार ६३९ भारतीय मच्छीमारांची सुटका करण्यात आली आहे, अशी  माहिती परराष्ट्र व्यवहारमंत्री डॉ. एस जयशंकर यांनी आज लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.  पाकिस्ताननं यावर्षी  २११ भारतीयांना ताब्यात घेतल्य...

December 13, 2024 8:07 PM

views 26

देशात अवयव दानासह उती दानाचं तसंच अवयव प्रत्यारोपणाचं प्रमाण वाढलं – राज्यमंत्री प्रतापराव जाधव

देशभरात राबवलेल्या  जनजागृती मोहिमांमुळं देशात अवयव दानासह उती दानाचं तसंच अवयव प्रत्यारोपणाचं प्रमाण वाढलं असल्याचं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाचं लेखी उत्तर देताना सांगितलं. २०१८ दरम्यान असलेली ६ हजार २९४ इतकी असलेली अवयव दात्यांची संख्य...

December 13, 2024 8:02 PM

views 21

देशात क्षयरोग ग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने घट – राज्यमंत्री अनुप्रिया पटेल

राष्ट्रीय धोरणात्मक योजनांच्या अंमलबजावणीमुळे देशात क्षयरोग ग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने घट झाली आहे. पुढच्या वर्षापर्यंत देशभरातून क्षयरोगाचं समूळ उच्चाटन करण्याचं लक्ष्य आहे, असं आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणाल्या. भारतात २०१...

December 13, 2024 8:37 PM

views 18

अभिनेता अल्लू अर्जूनला चार आठवड्यांचा हंगामी जामीन मंजूर

चित्रपट अभिनेता अल्लू अर्जूनला हैदराबाद उच्च न्यायालयानं चार आठवड्यांचा हंगामी जामीन मंजूर केला आहे. हैदराबादमधे चित्रपटाच्या प्रिमिअरच्या वेळी झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाल्याप्रकरणी आज त्याला अटक झाली होती.     अल्लू अर्जूनला अटक केल्यानंतर पोलिसांनी त्याला स्थानिक न्यायालयात ...

December 13, 2024 7:40 PM

views 37

बीडमध्ये शिक्षकाच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप

बीडमधले शिक्षक साजेद अली यांच्या खून प्रकरणात विशेष मोक्का न्यायालयाने १२ जणांना जन्मठेप सुनावली आहे. उर्वरित दोघांपैकी एकाला पाच वर्षांचा कारावास आणि पाच लाख रूपये दंडाची तर दुसऱ्याला सहा महिन्यांचा कारावास आणि पाचशे रूपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

December 13, 2024 7:47 PM

views 20

नागपूरमध्ये स्मार्ट इंडिया हॅकेथॉनच्या सातव्या अंतिम फेरीचा समारोप

नागपूरच्या हिंगणा येथील जी.एच. रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयातील स्मार्ट इंडिया हॅकॅथॉनच्या सातव्या अंतिम फेरीचा समारोप आज पार पडला. या स्पर्धेतील ज्यूरी सदस्यांनी केलेल्या मूल्यांकनावर आधारित, कौशल्य विकास मंत्रालयाने दिलेल्या ४ समस्यांवर उपाय सुचवणाऱ्या संघांना विजेते घोषित केले. विजेत्या संघां...