December 18, 2024 8:23 PM

views 11

वानुआटू पोर्ट व्हिला इथं झालेल्या भूकंपात आतापर्यंत किमान १४ जणांचा  मृत्यू

वानुआटू या दक्षिण प्रशात महासागरातल्या देशाची राजधानी पोर्ट व्हिला इथं काल झालेल्या शक्तिशाली भूकंपात आतापर्यंत  किमान १४ जणांचा  मृत्यू झाला आहे. या भूकंपामुळे दोन इमारती कोसळल्यामुळे त्यात २०० जण जखमी झाले आहेत. बचावकार्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या आपत्ती मदत प्रतिसाद पथकाचे अधिकारी या देशात दाखल झाले आ...

December 18, 2024 8:09 PM

views 19

उत्तराखंडमधे येत्या जानेवारीपासून समान नागरी कायद्याची अंमलबजावणी-पुष्कर सिंग धामी

उत्तराखंडमधे येत्या जानेवारीपासून समान नागरी कायद्याची अंमलबजावणी केली जाईल असं उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांनी सांगितलं. उत्तराखंड गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा विकास महामंडळाच्या डेहराडून इथं झालेल्या बैठकीत धामी यांनी ही माहिती दिली. समान नागरी कायदा लागू करणारं उत्तराखंड  हे पहिलं र...

December 18, 2024 8:02 PM

views 16

व्हिनिशियस ज्युनियर आणि ऐताना बोन्मती फिफा सर्वाेत्कृष्ट फुटबॉलपटू पुरस्काराचे मानकरी

फुटबॉलमधे ब्राझिलचा व्हिनिशियस ज्युनियर हा फिफाच्या यंदाच्या सर्वाेत्कृष्ट पुरूष फुटबॉलपटू पुरस्काराचा मानकरी ठरला आहे. अर्जेटिनाचा लिओनेल मेसीनं हा पुरस्कार आधीच्या दोन वर्षांसाठी जिंकला होता. स्पेनची ऐताना बोन्मती हिनं सलग दुसऱ्या वर्षी सर्वोत्कृष्ट महिला फुटबॉलपटूचा पुरस्कार पटकावला आहे. कतारची र...

December 18, 2024 7:44 PM

views 35

आयकर विभागाचं १९ लाख २१ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त करसंकलन

चालू आर्थिक वर्षात आयकर विभागानं कालपर्यंत १९ लाख २१ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त करसंकलन केलं आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत, या वेळी त्यात २० पूर्णांक ३२ शतांश टक्के वाढ झाली आहे.  आयकर विभागानं त्यानंतर ३ लाख ३८ हजार कोटी रुपये परतावा म्हणून दिले आहेत. त्यामुळे निव्वळ प्रत्यक्ष करसंकलन १५ ला...

December 18, 2024 7:34 PM

views 22

वस्तू आणि सेवा कायद्यात दुरुस्ती, मुद्रांक शुल्कात वाढ प्रस्तावित करणारं विधेयक मंजूर

वस्तू आणि सेवा कराच्या संदर्भात २०१७ ते २०२० या ३ आर्थिक वर्षातला व्याज किंवा दंड किंवा दोन्ही माफ करण्यासाठीची अभय योजना राज्य सरकारनं लागू केली आहे. ३१ मार्च २०२५ ही कराच्या रकमेचा भरणा करण्याची अंतिम तारीख आहे. त्यापूर्वी देय रकमेचा भरणा केल्यास त्यावरचं सर्व व्याज आणि दंड माफ होणार असल्याने संबं...

December 18, 2024 7:28 PM

views 25

एसटी प्रवास भाड्यात साडेचौदा टक्के वाढ प्रस्तावित-भरत गोगावले

एसटी प्रवास भाड्यात साडेचौदा टक्के वाढ प्रस्तावित असल्याचं एसटी महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावले यांनी आज सांगितलं. ते नागपुरात वार्ताहर परिषदेत बोलत होते. एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचाही प्रश्न आहे. या सगळ्याचा आर्थिक बोजा पेलता यावा, यासाठी भाडेवाढ करावी लागणार आहे, असं  त्यांनी सांगितलं.  येत्या वर्...

December 18, 2024 7:24 PM

views 13

परभणी शहरात हिंसाचारप्रकरणी व्यापाऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी-धर्मपाल मेश्राम

परभणी शहरात हिंसाचारा दरम्यान व्यापाऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, त्यांना कोणत्याही FIR ची सक्ती न करता पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, तसंच या प्रकरणात ज्यांच्या विरोधात जनाक्रोश आणि नागरिकांच्या तक्रारी आहेत अशा तीन पोलीस अधिकाऱ्यांना तात्काळ सक्तीच्या रजेवर पाठवावं, असे आदेश  राज्य अनुसू...

December 18, 2024 7:04 PM

views 22

परभणी आणि बीडमधल्या हिंसाचार प्रकरणी विधानसभेत चर्चा सुरू

परभणीतल्या पुतळा विटंबना, हिंसाचार, आंदोलन आणि बीड जिल्ह्यातल्या हत्येबाबत विरोधी सदस्यांनी उपस्थित केलेल्या मुद्दयावर आज विधानसभेत चर्चा सुरु झाली. काँग्रेसच्या नितीन राऊत यांनी चर्चेला सुरुवात केली. परभणीतल्या घटनेनंतर पोलिसांनी दलित वस्तीत घुसून अमानुष मारहाण केली. हे गंभीर आहे, अशा अधिकाऱ्यांवर ...

December 18, 2024 6:57 PM

views 26

रत्नागिरीत वायुगळतीमुळं बाधित विद्यार्थ्यांच्या पालकांचं रास्ता रोको आंदोलन

रत्नागिरी जिल्ह्यातल्या जयगडमध्ये मागच्या आठवड्यात झालेल्या  वायुगळतीमुळं बाधित  विद्यार्थ्यांच्या पालकांनी आज जयगडमध्ये रास्ता रोको आंदोलन केलं. पालकांनी जयगड सागरी पोलीस ठाण्यात जाऊन जिंदाल कंपनीबद्दल रोष व्यक्त केला, तसंच कायमस्वरूपी ठोस उपाययोजनांची मागणी केली. संतप्त  पालकांनी कंपनीच्या गाड्या ...

December 18, 2024 6:59 PM

views 18

शहरी नक्षलवादाला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक विधानसभेत सादर

नक्षलवादाला आळा घालण्यासाठी, शहरी नक्षल अड्डे बंद करण्यासाठी 'महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक-2024' मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मांडले. संविधानावरचा विश्वास डळमळीत करण्यासाठी काही संस्था कार्यरत आहेत. अटकेतल्या नक्षलवाद्यांना सोडवण्यासाठी त्या शहरी भागात काम करतात. या संस्थांना आळा...