December 19, 2024 10:01 AM

views 58

महिला क्रिकेट : भारत-वेस्ट इंडिज दरम्यान तिसरा सामना नवी मुंबईत होणार

भारत आणि वेस्ट इंडिजच्या महिला क्रिकेट संघांदरम्यान 20 षटकांचा तिसरा सामना आज नवी मुंबईत खेळला जाणार आहे. तीन सामन्यांच्या या मालिकेत दोन्ही संघांनी एकेक सामना जिंकून बरोबरी केली आहे.

December 19, 2024 9:48 AM

views 15

भ्रष्टाचार प्रकरणी सीबायची मुंबईतल्या सात अधिकाऱ्यांवर कारवाई

केंद्रिय अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयनं सामुहिक भ्रष्टाचार प्रकरणी काल मुंबईतून सात सरकारी अधिकाऱ्यांना अटक केली आहे. त्यांच्या कार्यालयांमध्ये आणि निवासस्थानी घातलेल्या छाप्यात २७ स्थावर मालमत्तांच्या कागदपत्रांसह एक कोटींपेक्षा जास्त रोख रक्कम ताब्यात घेण्यात आल्याचं सीबीआयनं सांगितलं. सीप्झमधलं जा...

December 19, 2024 9:45 AM

views 25

एनआयएचे शस्त्रास्त्र तस्करी प्रकरणी ४ राज्यांत छापे

राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएनं आंतरराज्य शस्त्रास्त्र तस्करी प्रकरणी चार राज्यांत छापे घातले. बिहारमध्ये 12, नागालँडमध्ये 3 तर हरियाणा आणि जम्मू काश्मीर राज्यात प्रत्येकी एका ठिकाणी छापा घालून एनआयनं प्रतिबंधित शस्त्रास्त्रं, मोबाइल, मेमरी कार्डस आणि पेन ड्राइव्ज जप्त केले. यासह एक मोटार, सुम...

December 19, 2024 9:35 AM

views 31

भारत-चीन यांच्यातली विशेष प्रतिनिधींची बैठक यशस्वी

भारत आणि चीन यांच्यातली विशेष प्रतिनिधींची 23 वी बैठक काल झाली. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वँग यी बैठकीत सहभागी झाले होते. दोन्ही देशांमधल्या सीमा भागातल्या प्रश्नांवर योग्य, व्यवहार्य आणि दोन्ही बाजूंना मान्य होईल असा पर्याय शोधून शांततेसाठी प्रयत्न करण्यावर बै...

December 19, 2024 9:24 AM

views 32

एसटीला नोव्हेंबर महिन्यात ९४१ कोटी रुपये उत्पन्न

दिवाळी सणाच्या निमित्ताने प्रवाशांची संख्या वाढल्यानं एसटी महामंडळाला नोव्हेंबर महिन्यात ९४१ कोटी रुपये उत्पन्न मिळालं. हे यंदाच्या वर्षातील सर्वाधिक मासिक उत्पन्न आहे. या महिन्यात एसटीने दररोज सरासरी ६० लाख प्रवाशांनी प्रवास केला. मागील वर्षाच्या याच काळातील उत्पन्नापेक्षा हे उत्पन्न सुमारे २६ कोटी...

December 19, 2024 1:51 PM

views 33

‘एक राष्ट्र एक निवडणूक’ विधेयकासाठी संयुक्त संसदीय समितीची स्थापना

'एक देश एक निवडणूक' संदर्भातल्या दोन विधेयकांवर विचारविनिमय करण्यासाठी ३१ सदस्यांची संयुक्त संसदीय समिती नेमण्यात आली आहे. या समितीत लोकसभेतले २१ आणि राज्यसभेतले दहा खासदार आहेत. भाजप नेते पी पी चौधरी, अनुराग सिंग ठाकूर, पुरुषोत्तम रुपाला यांच्यासह काँग्रेस नेते प्रियांका गांधी, मनिष तिवारी, तृणमूल ...

December 19, 2024 8:56 AM

views 51

व्यापाऱ्यांनी अभय योजनेचा लाभ घेण्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आवाहन

वस्तू आणि सेवा कराच्या संदर्भात २०१७ ते २०२० या तीन आर्थिक वर्षातला व्याज किंवा दंड किंवा दोन्हीही माफ करण्यासाठीची अभय योजना राज्य सरकारनं लागू केली आहे. संबंधित व्यापाऱ्यांनी या अभय योजनेचा लाभ घ्यावा, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं. ते काल विधानसभेत बोलत होते. यासंदर्भातली विवादित र...

December 19, 2024 3:19 PM

views 13

प्रवासी बोटीला झालेल्या अपघातात १३ जणांचा मृत्यू

गेटवे ऑफ इंडियापासून घारापुरीला जाणारी बोट उलटून काल झालेल्या अपघातात मृतांची संख्या तेरा झाली असून बेपत्ता असलेल्या दोघांचा शोध सुरु आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेतल्या मृतांच्या कुटुंबांना दोन लाख तर जखमींना पन्नास हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यां...

December 19, 2024 10:03 AM

views 25

बहारिनमध्ये अटक २८ भारतीय मच्छिमार मायदेशी परतले

बहारिनमध्ये अटक करण्यात आलेल्या २८ भारतीय मच्छिमारांना मायदेशी परत आणण्यात आलं आहे. तमिळनाडूतल्या या मच्छिमारांना गेल्या सप्टेंबर महिन्यात बहारिनच्या सागरी हद्दीत अवैधरित्या प्रवेश केल्याबद्दल अटक करण्यात आली होती. या सर्वांच्या सुटकेसाठी तिथल्या भारतीय दूतावासानं यशस्वी प्रयत्न केले. या सर्वांना अट...

December 18, 2024 8:43 PM

views 22

पुणे आणि मनमाड रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाला मंजुरी-अश्विनी वैष्णव

पुणे आणि मनमाडदरम्यानच्या २४८ किलोमीटरच्या रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाला मंजुरी मिळाली आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत अतारांकीत प्रश्नाला उत्तर देताना ही माहिती दिली. तसंच नाशिक- साईनगर शिर्डी, पुणे-अहमदनगर आणि साईनगर - पुणतांबा या तीन मार्गांच्या सर्वेक्षणालाही मंजुरी मिळाल्याचं त...