December 19, 2024 3:17 PM

views 20

देशात विविध भागात तापमानात वाढ होण्याची शक्यता

येत्या दोन दिवसांमध्ये तापमान मध्य भारतात तीन ते चार अंश सेल्शिअसने तर देशाच्या पूर्व भागात दोन ते तीन अंश सेल्शिअसने वाढण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे.   वायव्य भारतात पुढचे पाच ते सहा दिवस थंडीची लाट पसरेल. हिमाचल प्रदेश पूर्व राजस्थान आणि पंजाब मध्ये येत्या दोनतीन दिवसांमध्य...

December 19, 2024 3:07 PM

views 20

जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांसोबतच्या चकमकीत पाच दहशतवादी ठार

जम्मू आणि काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात आज सकाळी सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत पाच दहशतवादी ठार झाले. या मोहिमेत भारतीय लष्कराचे दोन जवानही जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. कुलगाम जिल्ह्यातल्या कादर या गावात दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर काल रात्रीपासून या भागा...

December 19, 2024 2:59 PM

views 23

महाकुंभ मेळ्यासाठी मध्यरेल्वे ३४ विशेष गाड्या सोडणार

उत्तरप्रदेशात प्रयागराज इथल्या महाकुंभमेळ्यासाठी मध्यरेल्वे ३४ विशेष गाड्या सोडणार आहे. मुंबई, पुणे, नागपूर तसंच इतर ठिकाणांहून या  विशेष गाड्या सुटतील. या गाड्यांमध्ये २० डिसेंबरपासून प्रवासी आरक्षण प्रणाली तसंच www.irctc.co.in या रेल्वेच्या संकेतस्थळावरुन आरक्षण करता येईल. या विशेष गाड्यांमध्ये दु...

December 19, 2024 2:50 PM

views 28

प्रसिद्ध तबलावादक पं. स्वपन चौधरी यांना राष्ट्रीय तानसेन सन्मान प्रदान

मध्ये प्रदेशमध्ये ग्वाल्हेर इथे आयोजित जगप्रसिद्ध तानसेन महोत्सवात काल राष्ट्रीय तानसेन पुरस्कार आणि राजा मानसिंग तोमर पुरस्कार प्रदान करण्यात आले. भारतीय शास्त्रीय संगीतातले प्रसिद्ध तबलावादक पंडित स्वपन चौधरी यांना सन २०२३साठी राष्ट्रीय तानसेन सन्मान प्रदान करण्यात आला. पाच लाख रुपये रोख, सन्मान च...

December 19, 2024 1:47 PM

views 13

अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हनं व्याजदरात पाव टक्के कपात करण्याचा निर्णय

अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हनं व्याजदरात पाव टक्के कपात करण्याचा निर्णय काल रात्री घेतला आहे. प्रमुख व्याजदर सव्वाचार ते साडेचार टक्क्यांच्या दरम्यान ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याचं फेडरल रिझर्व्हने प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. या निर्णयामुळे अमेरिकेच्या शेअर बाजाराच्या तिन्ही प्रमुख निर्देशांकात घट ...

December 19, 2024 3:25 PM

views 26

वैद्यकीय उपकरण निर्मिती क्षेत्रामध्ये विस्ताराची अफाट क्षमता – राज्यमंत्री अनुप्रिया पटेल

भारतातल्या वैद्यकीय उपकरण निर्मिती क्षेत्रामध्ये विस्ताराची अफाट क्षमता आहे असं प्रतिपादन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी केलं आहे. नवी दिल्ली इथं त्या वार्षिक आरोग्य परिषदेला संबोधित करत होत्या. भारतात वैद्यकिय उपकरणांचा व्यवसाय अंदाजे चौदा दशलक्ष डॉलर्स मूल्याचा आहे आणि तो वर्ष २०...

December 19, 2024 1:34 PM

views 32

हिवाळी अधिवेशन : संसदेच्या आवारात सत्ताधारी आणि विरोधकांचं निदर्शन

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या समर्थनार्थ तसंच काँग्रेसने बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान केल्याचा आरोप करत भाजप खासदारांनी आज संसदेच्या आवारात निदर्शनं केली. भाजपच्या सदस्यांनी हातात फलक घेत घोषणाबाजी केली. नेहरु- गांधी परिवाराने नेहमीच आंबेडकरांचा अपमान केल्याचा आरोप माजी केंद्रीय मंत्री अनुराग स...

December 19, 2024 3:07 PM

views 22

संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलेल्या विधानावरुन आज सलग दुसऱ्या दिवशी संसदेच्या दोन्ही सभागृहांमधे गदारोळ झाला. घोषणाबाजीमुळे कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. लोकसभेत कामकाज सुरु झाल्यावर काँग्रेस, द्रमुक, समाजवादी पार्टी, आणि इतर पक्षांचे सदस्य...

December 19, 2024 1:49 PM

views 38

विधानपरिषदेचे सभापती म्हणून राम शिंदे यांनी पदभार स्वीकारला

महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती म्हणून राम शिंदे यांची निवड झाल्याचं उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी आज जाहीर केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शिंदे यांना सभापतींच्या खुर्चीवर आसनस्थ केलं. मुख्यमंत्री देवें...

December 19, 2024 1:50 PM

views 18

रवींद्र वायकरांच्या खासदारकीला आव्हान देणारी याचिका फेटाळली

गेल्या लोकसभा निवडणुकीत वायव्य मुंबई मतदारसंघातले शिवसेना नेते रवींद्र वायकर यांच्या खासदारकीला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाने आज फेटाळली. वायकर यांचे प्रतिस्पर्धी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अमोल किर्तीकर यांनी ही याचिका दाखल केली होती. न्यायमूर्ती संदीप मारणे यांनी ती फेटाळल...