December 19, 2024 7:05 PM

views 27

काँग्रेसचे नेते राहूल गांधी यांनी रालोआच्या खासदारांशी गैरवर्तन केल्याचा भाजपचा आरोप

संसदभवन परिसरात  काँग्रेसचे नेते राहूल गांधी यांनी रालोआच्या खासदारांशी गैरवर्तणूक केल्याचा आरोप भाजपाने केला आहे. भाजपाच्या मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना भाजपाचे नेते आणि केंद्रीय मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहूल गांधी यांनी प्रताप सारंगी आणि मुकेश राजपू...

December 19, 2024 6:59 PM

views 26

आयोग आपल्या दारी या उपक्रमांतर्गत सिंधुदुर्गात जनसुनावणी

कोकणाला एक वैचारिक बैठक असून इथे महिलांचा सन्मान राखला जातो असं मत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी केलं. आयोग आपल्या दारी या उपक्रमांतर्गत चाकणकर यांनी आज सिंधुदुर्गात ओरोस इथं जनसुनावणी घेतली, त्यानंतरच्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. जनसुनावणीत आलेल्या एकशे वीस तक्रारींपैकी ...

December 19, 2024 6:54 PM

views 16

हरीत महामार्ग धोरण २०१५ अनुसार राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांवर काम सुरु-नितीन गडकरी

हरीत महामार्ग धोरण २०१५ अनुसार राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांवर काम सुरु झाल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत सांगितलं. राष्ट्रीय महामार्गांवर बासष्ठ हजार किलोमीटरपेक्षाही अधिक पट्ट्यावर रोपं लावण्याचं काम सुरु झालं आहे. या प्रकल्पाची व्याप्ती लक्षात घेता यामुळे...

December 19, 2024 6:52 PM

views 24

वावखेडे स्टेडियमच्या सुवर्णमहोत्सवी वर्धापनदिनानिमित्त जानेवारीत भव्य सोहळा

मुंबईत असलेल्या वावखेडे स्टेडियमच्या सुवर्णमहोत्सवी वर्धापनदिनानिमित्त जानेवारीत भव्य सोहळा होणार आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या सोहळ्याची सुरुवात १२ जानेवारीला होईल तर समारोप १९ जानेवारीला  होणार आहे. यावेळी वानखेडेच्या सुवर्णमहोत्सवी ...

December 19, 2024 6:17 PM

views 47

आधारभूत किंमत धान खरेदीसाठी ऑनलाइन नोंदणी मुदतवाढ

आधारभूत किंमतीने धानखरेदी योजनेसाठी शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंंदणी करण्यास दिलेली अंतिम मुदत सरकारने वाढवली आहे.  जिल्ह्यातल्या सर्व मंजूर धान खरेदी केंद्रांनी  आता १५ ऐवजी ३१ डिसेंबरपर्यंत शेतकऱ्यांची ऑनलाईन शेतकरी नोंदणी पूर्ण करावी असं आवाहन भंडारा जिल्हा पणन अधिकाऱ्यांनी केलं आहे. आधारभूत किंमत धानख...

December 19, 2024 7:25 PM

views 29

नाशिकमधे सलग दुसऱ्या दिवशी कांद्याचे लिलाव बंद

कांद्याचे दर घसरत असल्यानं शेतकऱ्यांनी नाशिक जिल्ह्यात लासलगावमध्ये लिलाव बंद पाडले होते. सकाळी लिलाव सुरू होताच लासलगाव बाजार समितीत कांद्याला कमीत कमी ८०० ते जास्तीत जास्त २ हजार ९०० दर मिळाला. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले आणि लिलाव बंद पाडले. कांदा निर्यातीला प्रोत्साहन द्यावे, निर्यात शुल्क रद्द ...

December 19, 2024 3:42 PM

views 8

महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या सर्व समित्या विसर्जित

महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या राज्य, जिल्हा आणि ब्लॉक स्तरीय सर्व समित्या तत्काळ प्रभावाने विसर्जित करण्यात आल्या आहेत. संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यासाठी आणि राज्यात महिला काँग्रेसच्या सदस्यत्व मोहिमेला गती देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या अध्यक्ष अलका लांब...

December 19, 2024 3:42 PM

views 26

केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर लावलेलं २० टक्के शुल्क रद्द करा – उपमुख्यमंत्री अजित पवार

केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर लावलेलं २० टक्के शुल्क तातडीनं रद्द करण्याची मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय व्यापार आणि उद्योगमंत्री पियुष गोयल यांना पत्र लिहून केली आहे. नाशिकसह राज्यातल्या शेतकऱ्यांना त्यांचा लाल कांदा श्रीलंकेसह परदेशांमध्ये निर्यात करता यावा तसंच कांद्याला खर्चावर ...

December 19, 2024 3:33 PM

views 34

विकसित भारताला विकसित महाराष्ट्राची भक्कम जोड द्यायची आहे-एकनाथ शिंदे

महाराष्ट्राला सर्व आघाड्यांवर पहिल्या क्रमांकाचं राज्य करतानाच विकसित भारताला विकसित महाराष्ट्राची भक्कम जोड द्यायची आहे, असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानपरिषदेत केलं. राज्यपालांच्या अभिभाषणावरच्या चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते.   गेल्या अडीच वर्षात राज्याच्या कायापालट...

December 19, 2024 3:34 PM

views 26

बोट दुर्घटनेप्रकरणी काँग्रेसचा विधानसभेत स्थगन प्रस्ताव

मुंबईत काल झालेल्या बोट दुर्घटनेप्रकरणी काँग्रेसचे नाना पटोले यांनी आज विधानसभेत स्थगन प्रस्ताव मांडला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही यावर चर्चा करण्याची तयारी दर्शवली. या घटनेबद्दल सरकारने आजचं कामकाज संपेपर्यंत निवेदन द्यावं, त्यानंतर चर्चा घेण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असं अध्यक्ष राहुल नार्वेक...