December 19, 2024 8:09 PM

views 17

संसदभवन परिसरात झालेल्या धक्काबुक्कीवरुन भाजपा आणि काँग्रेसचे परस्परांविरोधात गुन्हे दाखल

संसद भवन परिसरात निदर्शनादरम्यान झालेल्या धक्काबुक्कीवरुन भाजपा आणि काँग्रेसने परस्परांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. भाजपानं निदर्शनादरम्यान पक्षाचे दोन खासदार जखमी झाल्यावरुन काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरुद्ध दिल्ली पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. भाजपाचे नेते अनुराग सिंह ठाकूर हे बातमीदार...

December 19, 2024 8:10 PM

views 14

भारत आणि पाकिस्तान दरम्यान होणारे क्रिकेट सामने त्रयस्थ देशात खेळवण्याचा ICC चा निर्णय

पुढच्या वर्षी पाकिस्तानात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत आणि पाकिस्तान दरम्यान होणारे सामने इतर ठिकाणी खेळवले जाणार असल्याचं आयसीसीनं स्पष्ट केलं आहे. ही स्पर्धा पाकिस्तानात आणि इतर ठिकाणी अशी हायब्रिड पद्धतीनं खेळवली जाणार आहे. भारतामध्ये पुढच्या वर्षी होणाऱ्या महिला क्रिकेट विश्वचषक आणि २०२६...

December 19, 2024 7:58 PM

views 29

NIA चे छत्तीसगड बिजापूर जिल्ह्यात चार ठिकाणी छापे

छत्तीसगडमधे, माओवाद्यांना केल्या जाणाऱ्या वस्तुपुरवठ्याचा तपास करण्यासाठी एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास संस्थेनं बिजापूर जिल्ह्यात चार ठिकाणी, छापे टाकले. छत्तीसगड आणि लगतच्या राज्यांमधे माओवाद्यांच्या कारवायांचा प्रभाव आणि संसाधनं रोखण्यासाठी एनआयएनं ही कारवाई केली. त्यात भैरमगड, अवापल्ली, आणि तर्रेम...

December 19, 2024 7:56 PM

views 31

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय सुरक्षा बैठक

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत उच्चस्तरीय सुरक्षा बैठक झाली. या बैठकीत गंभीर सुरक्षा प्रश्नांवर, विशेषतः जम्मू कश्मिरमधल्या परिस्थितीवर भर देण्यात आला. जम्मू कश्मिरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा, लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी, केंद्रीय गृहसचिव गोंविद मोहन, राष्ट्...

December 19, 2024 7:47 PM

views 17

भाजपा युती सरकारच्या काळात दलितांवर अत्याचार होत असून न्याय मिळत नाही-नाना पटोले

भाजपा युती सरकारच्या काळात दलितांवर सातत्यानं अत्याचार होत असून त्यांना न्याय मिळत नाही, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. विधानसभेत परभणी आणि बीड जिल्ह्यातल्या घटनांवरच्या चर्चेत ते बोलत होते. परभणीत पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन करुन निरपराध लोकांवर लाठीचार्ज केला, त्यांना ला...

December 19, 2024 8:27 PM

views 12

राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड यांच्याविरुद्ध दाखल झालेला अविश्वास प्रस्ताव उपाध्यक्षांनी फेटाळला

राज्यसभेचे अध्यक्ष उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या विरुद्ध दाखल झालेला अविश्वास प्रस्ताव उपाध्यक्ष हरिवंश यांनी फेटाळला आहे.  अध्यक्ष धनखड पक्षपात करत असल्याचा आरोप करुन विरोधकांनी हा अविश्वास प्रस्ताव मांडला होता. तो घाईघाईने, कसातरी आणि केवळ अध्यक्षांचं प्रतिमाहनन करण्यासाठी मांडला गेल्याची प्रतिक...

December 19, 2024 7:28 PM

views 20

बांगलादेशात होत असलेल्या हल्ल्याच्या वृत्तांची केंद्रसरकारकडून गंभीर दखल

बांगलादेशात हिंदू आणि इतर अल्पसंख्याकांवर हल्ले होत असल्याच्या वृत्तांची गंभीर दखल घेतली असल्याचं केंद्रसरकारने आज राज्यसभेत सांगितलं. परराष्ट्र व्यवहार राज्य मंत्री कीर्तीवर्धन सिंग यांनी एका लेखी उत्तरात सांगितलं की बांगला देशात हिंदू मंदिरं, आणि हिंदूंची घरं, दुकानं इत्यादींवर हिंसक हल्ले होत असल...

December 19, 2024 7:22 PM

views 8

बोट अपघाताच्या तपासाठी नौदलाची विशेष चौकशी समिती स्थापन

उरण इथे काल झालेल्या बोट अपघाताचा तपास करण्यासाठी भारतीय नौदलाने विशेष चौकशी समितीची स्थापना केली आहे. गेटवे ऑफ इंडियावरून काल एलिफंटाला निघालेल्या बोटीला उरण इथे अपघात झाला आणि त्यात १३ जण मृत्युमुखी पडले. यात नौदलाचे चार कर्मचारी आणि ९ प्रवाशांचा समावेश आहे. नौदलाचे दोन कर्मचारी अद्यापही बेपत्ता अ...

December 19, 2024 8:28 PM

views 42

अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने केलेल्या व्याज दरकपातीमुळे शेअर बाजारात घसरण

अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने केलेल्या दरकपातीचा परिणाम आज भारतीय शेअर बाजारांवर दिसून आला. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज ९६४ अंकांची घसरण झाली आणि तो ७९ हजार २१८ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही २४७ अंकांची घसरण नोंदवत २३ हजार ९५१ अंकांवर बंद झाला. फेडरल रिझर्व्हने व्याजद...

December 19, 2024 7:18 PM

views 26

हवामानाचा अंदाज अचूक देण्यासाठी पुण्यातल्या IITM इथं विशेष आभासी केंद्राची स्थापना

एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंग तंत्रज्ञानाचा वापर हवामान तसंच सागरी हवामान बदल अशा क्षेत्रांमध्ये करण्यात येत असल्याची माहिती भूविज्ञान राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली आहे. हवामान शास्त्राच्या अंदाजांमध्ये अचूकता आणणं तसंच त्याची का...