December 20, 2024 2:44 PM

views 41

परभणी आणि बीड हिंसाचार प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांची घोषणा

बीड आणि परभणी इथं गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या घटनांची न्यायालयीन चौकशी करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. या प्रकरणी विरोधकांनी उपस्थित केलेल्या अल्पकालीन चर्चेला ते विधानसभेत उत्तर देत होते. परभणी इथं झालेली घटना कोणत्याही समुदायांमधल्या वैरभावनेतून झाली नाही. या प्रकरणात अ...

December 20, 2024 11:14 AM

views 14

जानेवारी २०२५ मध्ये ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमाचा आठवा भाग सादर होणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 'परीक्षा पे चर्चा' या कार्यक्रमाच्या माध्यमातून दर वर्षी विद्यार्थ्यांशी संवाद साधत असतात. या कार्यक्रमाचा आठवा भाग पुढील महिन्यात अर्थात जानेवारी 2025 मध्ये सादर होणार आहे. या संवादात्मक कार्यक्रमासाठी नोंदणी सुरू झाली असून, 14 जानेवारीपर्यंत MyGov पोर्टलवर नोंदणी करता येई...

December 20, 2024 11:14 AM

views 21

महिला क्रिकेट : तीन सामन्यांच्या मालिकेत भारताचा वेस्टइंडिजवर विजय

महिलांच्या वीस षटकांच्या क्रिकेट मालिकेत भारतानं वेस्टइंडिजचा तिसऱ्या सामन्यात 60 धावांनी पराभव करत ही मालिका 2-1 अशी जिंकली. नवी मुंबईत झालेल्या या सामन्यात भारतीय महिलांनी टी-ट्वेंटीमधील आजवरची सर्वाधिक 217 धावसंख्या उभारली. स्मृती मंधनानं 77 तर रिचा घोषनं 54 धावा केल्या. रिचानं केवळ 18 चेंडूत पन्...

December 20, 2024 11:14 AM

views 21

नायजेरियात बालजत्रेत झालेल्या चेंगराचेंगरीत ३५ बालकांचा मृत्यू

नायजेरियामधील इबादान शहरात ख्रिसमसनिमित्त आयोजित बालजत्रेत झालेल्या चेंगराचेंगरीत 35 मुलांचा मृत्यू झाला असून सहा जण गंभीर जखमी झाल्याचं वृत्त आहे. एका शाळेत आयोजित या कार्यक्रमात रोख रक्कम आणि खाऊ वाटपाचं आयोजन करण्यात आलं होतं, त्यात सुमारे 5 हजार मुलं सहभागी झाली होती. नायजेरियाचे राष्ट्राध्यक्ष ...

December 19, 2024 8:38 PM

views 15

ग्रीसमध्ये बोट अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या ४० वर

ग्रीसमध्ये बोट अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या ४० वर पोहोचली आहे. लिबियामार्गे काही पाकिस्तानी नागरिकांना अवैधरित्या युरोपात नेलं जात असताना शनिवारी ही दुर्घटना घडली होती.

December 19, 2024 8:37 PM

views 18

जम्मू आणि काश्मीरमध्ये सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत पाच दहशतवादी ठार

जम्मू आणि काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात आज सकाळी सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत पाच दहशतवादी ठार झाले. हे दहशतवादी प्रतिबंधित दहशतवादी संघटना हिजबुल मुजाहिदीनचे सदस्य असून कुलगाम जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या भागातले रहिवासी होते. यात भारतीय लष्कराचे दोन जवानही जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल कर...

December 19, 2024 8:17 PM

views 23

भारतीय पासपोर्टधारकांना २६ देशांमध्ये व्हिसामुक्त प्रवेश

भारतीय पासपोर्टधारकांना २६ देशांमध्ये व्हिसामुक्त प्रवेश असून ४० देशांमध्ये व्हिसा ऑन अरायव्हलची सुविधा असल्याचं सरकारनं म्हटलं आहे. परराष्ट्र राज्यमंत्री कीर्ती वर्धन सिंह यांनी राज्यसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली. नेपाळ, भूतान आणि मालदीवच्या नागरिकांना भारतात व्हिसा-मुक्त प्रवेश आहे. पर्यटन,...

December 19, 2024 8:16 PM

views 30

भारतामध्ये विमानभाडं हे बहुतेक देशांपेक्षा कमी – मुरलीधर मोहोळ

भारतामध्ये विमानभाडं हे बहुतेक देशांपेक्षा कमी असल्याचं नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलं आहे. लोकसभेत एका लेखी उत्तरात त्यांनी ही माहिती दिली. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयानं निर्माण केलेल्या टॅरिफ मॉनिटरिंग युनिटने देशातल्या आणि परदेशातल्या विविध मार्गांवरच्या विमानभाड्य...

December 19, 2024 8:15 PM

views 17

आकाशवाणीतर्फे नवी मुंबईत प्रमुख भारतीय भाषांमधल्या कवितांचे संमेलन

आकाशवाणीच्या वतीनं प्रमुख भारतीय भाषांमधल्या कवितांचे कवी संमेलन आज नवी मुंबईत वाशी इथं होत आहे. मुंबई विद्यापीठाच्या हिंदी विभागाचे वरिष्ठ प्राध्यापक करुणाशंकर उपाध्याय सर्वभाषा कवि सम्मेलनाच्या अध्यक्षस्थानी होते. देशात भौगोलिक, सांस्कृतिक विविधता असतानाही सर्वांना एका सूत्रात बांधण्यासाठी कविता म...

December 19, 2024 8:17 PM

views 23

राज्यातल्या नागरिकांना दिलेली आश्वासनं पूर्ण करण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही

राज्यातल्या, शेतकरी, युवा वर्ग, ज्येष्ठ नागरिक, वंचित घटकांना दिलेली आश्वासनं पूर्ण केली जातील. शासनाच्या सुरु असलेल्या योजना बंद होऊ देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज विधानसभेत दिली. राज्यपालांच्या अभिभाषणावरच्या चर्चेला ते उत्तर देत होते. राज्यात १६ हजार मेगावॅट सौर ऊर्जा...