December 21, 2024 3:21 PM

views 23

ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात लघुपट श्रेणीत भारतीय अनुजा लघुपटाला स्थान

२०२५ च्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात लघुपट श्रेणीत ‘अनुजा’ या भारतीय लघुपटाने स्थान मिळवलं आहे. १८० लघुपटांमधून ‘अनुजा’ची निवड करण्यात आली आहे. सुचित्रा मटाई यांनी या लघुपटाची निर्मिती केली असून गुनित मोंगा या कार्यकारी निर्मात्या आहेत. तर ऍडम ग्रेव्हस यांनी याचं दिग्दर्शन केलं आहे. या लघुपटात अभिनेते ...

December 21, 2024 2:58 PM

views 22

विधिमंडळ अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा

विदर्भाच्या अपेक्षेला या अधिवेशनात काय न्याय मिळाला असा सवाल उपस्थित करत राज्यात ४२ मंत्री आहेत पण त्यातील मुख्यमंत्री वगळता उर्वरित मंत्री अजूनही बिनखात्याचेच आहेत अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे गटनेते भास्कर जाधव यांनी केली आहे. कालपासून सुरू असलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावावरच्या चर...

December 21, 2024 2:47 PM

views 20

शरद पवार यांचं देशमुख कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन

बीड जिल्ह्यातल्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला जे कुणी जबाबदार असतील, त्यांना तातडीनं धडा शिकवण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. त्यांनी आज मस्साजोग गावाला भेट दिली आणि देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केल...

December 21, 2024 2:34 PM

views 20

जयपूर गॅस टँकर दुर्घटनेतील मृतांची संख्या १४ वर

जयपूर गॅस टँकर दुर्घटनेतील मृतांची संख्या १४ वर पोहोचली आहे. या दुर्घटनेतील २७ जखमींवर एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असून सहा जण सध्या कृत्रिम जीवरक्षक प्रणाली- व्हेंटीलेटरवर आहेत. जयपूरचे जिल्हाधिकारी जितेंद्र कुमार सोनी यांनी या घटनेच्या चौकशीसाठी संयुक्त तपास ...

December 21, 2024 3:05 PM

views 15

मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर गांजा जप्त

सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी काल रात्री उशिरा केलेल्या कारवाईत मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका प्रवाशाकडून ११ किलो पेक्षा जास्त हायड्रोपोनिक गांजा जप्त केला. जप्त कलेल्या अमली पदार्थाचे बाजारमूल्य अंदाजे ११ कोटी ३२ लाख रुपये असल्याचं सीमा शुल्क विभागानं म्हटलं आहे....

December 21, 2024 4:36 PM

views 16

सुक्या खोबऱ्याला प्रतिक्विंटल १२ हजार १०० रुपये इतका हमीभाव जाहीर

केंद्र सरकारनं २०२५ सालच्या हंगामासाठी सुक्या खोबऱ्याला प्रतिक्विंटल १२ हजार १०० रुपये इतका हमीभाव निश्चित केला आहे. आर्थिक व्यवहार विषयक केंद्रीय मंत्रिमंडळ समितीनं काल मंजुरी दिली. सुक्या खोबऱ्याच्या किसाकरता दर्जानुसार प्रति क्विंटल ११ हजार पाचशे ब्याऐंशी रुपये इतका, आणि गोटा खोबऱ्यासाठी प्रति क्...

December 21, 2024 1:42 PM

views 15

दोन जहाल नक्षलवाद्यांचं गडचिरोली पोलिस आणि केंद्रीय राखीव दलापुढे आत्मसमर्पण

वेगवेगळ्या गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या आणि शासनानं बक्षीस जाहीर केलेल्या दोन जहाल नक्षलवाद्यांनी काल गडचिरोली पोलिस आणि केंद्रीय राखीव दलापुढे आत्मसमर्पण केलं. रामसू पोयाम आणि रमेश कुंजाम अशी आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांची नावं आहेत. रामसू पोयामावर चकमक, खून, दरोडा आदी संबंधित १२ गुन्हे...

December 21, 2024 4:37 PM

views 16

हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मिरमध्ये पुढच्या ५ दिवसांत थंडीची तीव्र लाट

  हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मिरमध्ये पुढच्या पाच दिवसांत थंडीची तीव्र लाट येईल असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पंजाब आणि राजस्थानमध्येही सोमवारपर्यंत हीच परिस्थिती असेल. हिमाचल प्रदेश, पूर्व राजस्थान आणि झारखंडच्या काही भागात उद्यापर्यंत  दाट धुकं पडेल, तर  दिल्लीमध्ये पुढचे दोन दिवस संध्याकाळ...

December 21, 2024 1:16 PM

views 66

नवनीत कावत बीडचे नवे पोलीस अधिक्षक

बीडच्या पोलीस अधिक्षक पदावर नवनीत कॉवत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कॉवत सध्या छत्रपती संभाजीनगर येथे उपायुक्त असुन त्यांची एसपी म्हणून ही पहिलीच नियुक्ती आहे. ते २०१७ च्या बॅचचे आयपीएस आहेत. अविनाश बारगळ यांच्या बदलीची घोषणा काल सभागृहात करण्यात आली होती. त्यानंतर बीडला पोलीस अधिक्षक म्हणून कोण ...

December 21, 2024 1:13 PM

views 27

म्हाडा’मध्ये आठव्या लोकशाही दिनाचं १३ जानेवारी ला आयोजन 

मुंबई: महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणामध्ये (म्हाडा) आठव्या 'लोकशाही दिनाचं' आयोजन दिनांक १३ जानेवारीला २०२५ ला म्हाडा मुख्यालयात दुपारी १२:०० वाजता करण्यात येणार आहे. 'म्हाडा'चे उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यक्रमाचं आयोजन करण्या...