December 21, 2024 7:50 PM

views 16

देशांतर्गत क्रिकेटमध्ये अनमोलप्रीत सिंगचा सर्वात जलद लिस्ट-ए शतकाचा विक्रम

देशांतर्गत क्रिकेटमध्ये पंजाबच्या अनमोलप्रीत सिंगने सर्वात जलद लिस्ट ए शतकाचा विक्रम केला आहे. विजय हजारे करंडक स्पर्धेच्या क गटात अरुणाचल प्रदेशाविरोधात झालेल्या सामन्यात त्यानं केवळ ३५ चेंडूंमध्ये शतक झळकावलं, आणि भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युसूफ पठाणचा ४० चेंडूमधील वेगवान शतकाचा विक्रम मोडला. अ...

December 21, 2024 7:24 PM

views 30

मार्चपर्यंत राज्याला नक्षलवादमुक्त करण्याचा मानस – एकनाथ शिंदे

राज्याला प्रगत आणि समृद्ध करण्यासाठी महायुतीचं सरकार अहोरात्र काम करेल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानपरिषदेत दिली. ते आज विधानपरिषदेत अंतिम आठवडा प्रस्तावावरच्या चर्चेला उत्तर देताना बोलत होते.    महायुतीच्या काळात गुन्हे उघडकीला येण्याचे प्रमाण वाढले, विकास आणि कल्याणकारी...

December 21, 2024 7:33 PM

views 4

अधिवेशनात विदर्भ आणि मराठवाड्याच्या जनतेला न्याय देण्यासाठी कोणतीच चर्चा नाही- नाना पटोले

विदर्भ, मराठवाड्याच्या जनतेला न्याय देण्यासाठी हिवाळी अधिवेशनात चर्चा होणं अपेक्षित होतं पण अशी कोणतीच चर्चा झाली नाही. मविआ सरकार असताना याच अधिवेशनात शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली होती पण भाजपा युती सरकारने शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन देऊनही कर्जमाफीची घोषणा केली नाही, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग...

December 21, 2024 8:28 PM

views 11

क्षयरोग निर्मूलन मोहिमेसाठी सर्वतोपरी साह्य करण्याचं जे पी नड्डा यांचं आवाहन

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे पी नड्डा यांनी केंद्र सरकारच्या क्षयरोग निर्मूलनाच्या तीव्र मोहिमेच्या शंभराव्या दिवसाच्या पार्श्वभूमीवर आज देशभरातल्या सर्व राज्यांच्या तसंच  केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्यमंत्रांची बैठक घेतली. क्षयरोग निर्मूलन मोहिमेसाठी सर्वतोपरी साह्य करण्याचं आवाहन नड...

December 21, 2024 6:47 PM

views 21

सह्याद्री फार्म्समध्ये युरोप आणि अमेरिकेतल्या कंपनीची ३९० कोटींची गुंतवणूक

नाशिक  जिल्ह्यातल्या  सह्याद्री फार्म्स पोस्ट हार्वेस्ट केअर लिमीटेड या कंपनीमध्ये युरोपमधल्या रिसपॉन्स अबिलिटी  तसंच   अमेरिकेतल्या जीईएफ कंपनीनं ३९० कोटी रूपयांची गुंतवणूक केली आहे. या गुंतवणुकीचा वापर  पेटंटेड द्राक्षे आणि लिंबूवर्गीय फळांचे  लागवड क्षेत्र विस्तारण्यासाठी आणि  मूल्यवर्धित उत्पादन...

December 21, 2024 6:41 PM

views 22

बुलडाणा जिल्ह्यात सुमारे २४ लाख ३३ हजार रुपये किंमतीचा अवैध औषधसाठा जप्त

अन्न  औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी आज बुलडाणा जिल्ह्यातल्या  लोणार इथल्या  चंदन मेडीकोज या औषध विक्रेत्याने दडवून ठेवलेल्या  सुमारे २४ लाख ३३ हजार रुपये किमतीचा अवैध औषधांचा साठा जप्त केला. या साठ्यामध्ये कामोत्तेजक औषधांचाही समावेश असल्याचं उघड झालं आहे. औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी या अवैध औषध स...

December 21, 2024 6:38 PM

views 7

देशाच्या वन आणि वृक्षाच्छादनात एक हजार ४४५ चौरस किलोमीटरने वाढ

देशाच्या वन आणि वृक्षाच्छादनात एक हजार ४४५ चौरस किलोमीटरने वाढ झाली आहे. वन सर्वेक्षण विभागाने २०२३मधे केलेल्या वन स्थिती पाहणीचा अहवाल आज केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामानबदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी प्रसिद्ध केला. त्यात म्हटलंय  की सध्या एकूण ८ लाख २७ हजार ३५७ चौरस किलोमीटर क्षेत्र वन आणि वृक्षाच...

December 21, 2024 6:38 PM

views 21

पुढल्या वर्षी होणाऱ्या आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रीडा स्पर्धांचं यजमान पद भारताकडे

आयएसएसएफ अर्थात आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रीडा महासंघानं भारताला पुढल्या वर्षीच्या जुनिअर वर्ल्ड कप स्पर्धा आयोजित करण्याचे अधिकार बहाल केले आहेत. या स्पर्धांमध्ये  रायफल, पिस्तूल तसंच शॉटगन प्रकारच्या नेमबाजी स्पर्धांचा समावेश असणार आहे. त्याबाबतचं  वेळापत्रक  अद्याप निश्चित झालेलं नाही. मात्र या स्प...

December 21, 2024 6:12 PM

views 7

न्यायमूर्ती मदन लोकूर यांची संयुक्त राष्ट्रांच्या अंतर्गत न्यायमंडळाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती

सर्वोच्च न्यायालयातून  निवृत्त झालेले न्यायमूर्ती मदन लोकूर यांची संयुक्त राष्ट्रांच्या अंतर्गत न्यायमंडळाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली आहे. १२ नोव्हेंबर २०२८ पर्यंतची ४ वर्ष  त्यांचा कार्यकाळ राहील. संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अंटोनियो गुटेरस यांनी न्यायमूर्ती लोकूर यांचं स्वागत केलं आहे. सर्वोच्...

December 21, 2024 6:05 PM

views 17

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ईशान्येकडे विशेष लक्ष केंद्रित केलं – अमित शहा

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ईशान्येकडे विशेष लक्ष केंद्रित केलं असल्याचं प्रतिपादन गृहमंत्री अमित शहा यांनी केलं. ते त्रिपुराची राजधानी आगरतळा इथं ७२ व्या ईशान्य परिषदेला संबोधित करत होते.  ईशान्येसाठी गेली दहा वर्षं खूप महत्त्वाची राहिली आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ईशान्य भारताच्या वि...