December 23, 2024 1:17 PM

views 24

विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपचं दिल्ली सरकारविरुद्ध आरोपपत्र जारी

दिल्लीत होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपने आज दिल्ली सरकारविरुद्ध आरोपपत्र जारी केले. सत्ताधारी आप सरकारनं नागरिकांना दिलेली आश्वासनं पूर्ण केले नाहीत असा आरोप करत भाजपचे ज्येष्ठ नेते  अनुराग ठाकूर, दिल्ली भाजपचे प्रमुख विरेंद्र सचदेवा आणि अन्य काही नेत्यांनी यासंदर्भातील पुरावे सादर केले आहेत....

December 23, 2024 1:10 PM

views 27

दक्षिण आफ्रिकेत वेगवेगळ्या रस्ते अपघातांमध्ये १९ नागरीक ठार

दक्षिण आफ्रिकेत काल वेगवेगळ्या रस्ते अपघातांमध्ये १९ नागरीक ठार झालेत. लिम्पोपो भागात एन १ महामार्गावर सात गाड्या एकमेकांवर आदळून झालेल्या भीषण अपघातात सात जण ठार तर पाच जखमी झालेत. तर केप प्रांतात ट्रक आणि प्रवासी टॅक्सी यांच्यातच धडक होऊन झालेल्या  अपघातात बारा जणांचा मृत्यू झाला.

December 23, 2024 1:04 PM

views 13

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी चौधरी चरणसिंग यांना जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आज चौधरी चरणसिंग यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन त्यांना आदरांजली वाहिली. यावेळी ते म्हणाले की, २००१ सालापासून चौधरी चरणसिंह यांची जयंती किसान दिन म्हणून साजरा केला जातो. चौधरी चरणसिंह यांनी शेतकरी आणि ग्रामीण भागाच्या विकासाबरोबरच देशाच्या विकासासाठी आपलं जीवन समर्पित केले ...

December 23, 2024 1:31 PM

views 12

तरूणांना सक्षम बनवण्याला केंद्र सरकार महत्व देत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

तरूणांच्या क्षमता आणि कलागुणांचा पूरेपूर वापर करून या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून तरूणांना सक्षम बनवण्याला केंद्र सरकार प्राधान्य देत असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. ते आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून आयोजित रोजगार मेळाव्याला संबोधित करत होते.  देशभरात ४५ ठिकाणी असे रो...

December 23, 2024 1:31 PM

views 13

राष्ट्रीय शेतकरी दिनानिमित्त देशात विविध कार्यक्रमांचं आयोजन

राष्ट्रीय शेतकरी दिनानिमित्त आज देशभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. देशाची प्रगती आणि विकासामध्ये शेतकऱ्यांच महत्व आणि भागिदारी अधोरेखित करणं, अन्न सुरक्षा, शाश्वत ग्रामीण अर्थव्यवस्था आणि कृषी परंपरा जपण्यासाठी शेतकऱ्यांचं योगदान कसं महत्वाचं आहे यासाठी आजचा दिवस साजरा केला जातो. शेतकऱ...

December 23, 2024 12:42 PM

views 30

उत्तरप्रदेशात पोलिसांच्या चकमकीत तीन खलिस्तानी अतिरेकी ठार

उत्तर प्रदेशातल्या पिलभीत जिल्ह्यात आज सकाळी खलिस्तानी अतिरेकी आणि पोलिसांच्या चकमकीत तीन अतिरेकी ठार झाले. हे तिन्ही खलिस्तानवादी अतिरेकी १९ डिसेंबर रोजी पंजाबच्या गुरुदासपूर जिल्ह्यातल्या एका पोलीस चौकीवर झालेल्या हातबॉम्ब हल्ल्यात सहभागी होते. पिलभीत जवळच्या भागात खलिस्तानवादी अतिरेकी असल्याची मा...

December 23, 2024 1:32 PM

views 26

देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीची तीव्र लाट

देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये सध्या थंडीची तीव्र लाट सुरु आहे. हवामान विभागानं, जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश, पंजाब आणि मध्य प्रदेशातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. श्रीनगरमध्ये काल रात्री निचांकी ४.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली असून डोंगराळ भागात सर्वत्र बर्फ ...

December 23, 2024 1:34 PM

views 9

प्रधानमंत्र्यांच्या हस्ते ७१ हजारांहून अधिक उमेदवारांना नियुक्तीपत्र प्रदान

देशभरात विविध सरकारी मंत्रालये आणि विभागांमध्ये नोकरीसाठी निवड झालेल्या ७१ हजारांहून अधिक उमेदवारांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे नियुक्तीपत्र प्रदान केलं. यावेळी त्यांनी उमेदवारांना संबोधित केलं. हा रोजगार मेळावा देशभरात ४५ ठिकाणी आयोजित करण्यात आला.    केंद्र सरकारच्या...

December 23, 2024 1:11 PM

views 53

एकदिवसीय सामन्यांमध्ये एका वर्षात सर्वाधिक धावा करण्याचा स्मृती मंधानाचा विक्रम

महिला क्रिकेटमध्ये एकदिवसीय सामन्यांत एका वर्षात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम स्मृती मंधानानं नोंदवला आहे. काल वडोदरामध्ये वेस्ट इंडिज संघाबरोबर झालेल्या सामन्यात स्मृतीनं ९१ धावा केल्यामुळे तिनं या वर्षी केलेल्या धावांची संख्या १ हजार ६०२ झाली आहे. त्यामुळे स्मृतीनं दक्षिण आफ्रिकेच्या लॉरा वोलवार्...

December 23, 2024 10:14 AM

views 19

राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांच्या हस्ते चांगल्या प्रशासनासाठीच्या राष्ट्रीय कार्यशाळेचं उद्घाटन होणार

कर्मचारी, सार्वजनिक गाऱ्हाणी आणि निवृत्तिवेतन विभागाचे राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्रसिह आज नवी दिल्लीत चांगल्या प्रशासनासाठीच्या राष्ट्रीय कार्यशाळेचं उद्घाटन करणार आहेत. विविध मंत्रालयं आणि खात्यांमधले अधिकारी या कार्यशाळेत सहभागी होणार आहेत. गेल्या चार वर्षांमधली ही अशा प्रकारची चौथी कार्यशाळा आहे. ...