December 27, 2024 3:15 PM

views 14

सक्तवसुली अधिकारी नियुक्त झालेल्या ३४ उमेदवारांना नियुक्ती पत्रं प्रदान

केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री डॉ. मनसुख मांडविय यांनी काल नवी दिल्ली इथं श्रम मंत्रालयात सक्तवसुली अधिकारी म्हणून नियुक्त झालेल्या ३४ उमेदवारांना नियुक्ती पत्रं दिली. निवड झालेल्या उमेदवारांचे अभिनंदन करून डॉ. मांडविय यांनी कामगारांच्या कल्याणासाठी परिश्रम करण्याचं आणि कामगार कायद्याच्या पालनाकडे ...

December 27, 2024 3:15 PM

views 23

बियाण्यांच्या उत्पादनावर अधिक लक्ष केंद्रीत केलं पाहिजे-अमित शहा

भारतीय बीज सहकारी संस्थेनं कमी पाणी आणि कमी कीटकनाशकांच कमी प्रमाण आवश्यक असलेल्या बियाण्यांच्या उत्पादनावर अधिक लक्ष केंद्रीत केलं पाहिजे असं केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. भारतीय बीज सहकारी संस्थेच्या काल झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. लहान शेतकऱ्यांकडून जास्तीत जास्...

December 27, 2024 2:46 PM

views 21

देशातल्या बँकांच्या नफ्यात सलग सहा वर्षं वाढ झाल्याची रिझर्व्ह बँकेच्या अहवालात माहिती

देशातल्या बँकांच्या नफ्यात २०२३-२४ या आर्थिक वर्षापर्यंत सलग सहा वर्षं वाढ झाली असून, चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीतही वाढीचा कल कायम असल्याचं भारतीय रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे. रिझर्व्ह बँकेनं देशातील बँकिंग आणि त्यातला कल याबाबतचा एक अहवाल काल प्रसिद्ध केला, त्यात ही माहिती देण्यात आली आहे...

December 27, 2024 12:32 PM

views 17

एमएसव्ही ताज धरे हराम या बुडालेल्या जहाजातून नऊ भारतीय कर्मचाऱ्यांची सुटका

भारतीय तटरक्षक दलानं एमएसव्ही ताज धरे हराम या बुडालेल्या जहाजातून नऊ भारतीय कर्मचाऱ्यांची सुटका केली. हे जहाज पाकिस्तानच्या शोध आणि बचाव क्षेत्रात गुजरातमधील पोरबंदरच्या पश्चिमेला सुमारे ३११ किलोमीटर अंतरावर बुडालं होतं.   गुजरातमधील मुंद्रा बंदरातून ते येमेनकडे निघालं होतं, मात्र उसळलेल्या समु...

December 27, 2024 11:57 AM

views 28

लातूरमध्ये मुख्याध्यापकांचं ६१ वे राज्यस्तरीय शैक्षणिक संमेलन

लातूर इथं उद्या २८ डिसेंबर पासून अखिल महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संयुक्त महामंडळ पुणे यांच्यावतीने दोन दिवशीय मुख्याध्यापकांचं ६१ वे राज्यस्तरीय शैक्षणिक संमेलन होत आहे.   दोन दिवस असणआऱ्या या संमेलनाचं उद्घाटन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते होणार असून, ...

December 27, 2024 10:45 AM

views 29

बीड जिल्ह्यात येत्या ३० आणि ३१ डिसेंबरला रेल्वेची जलदगती चाचणी

बीड जिल्ह्यात येत्या ३० आणि ३१ डिसेंबर रोजी विघनवाडी ते राजूरी या मार्गावरून रेल्वेची जलदगती चाचणी होणार आहे. या चाचणीदरम्यान रेल्वे मार्गाजवळ कोणीही येवू नये, असं आवाहन रेल्वेच्या अधिकाऱ्यांसह भूसंपादन विभागाच्या उपजिल्हाधिकाऱ्यांनी केल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.   बीडपासून काही अंतरा...

December 27, 2024 10:38 AM

views 22

जलसंधारणाचं महत्त्व सामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी पाणलोट यात्रा काढण्यात येणार

जलसंधारणाचं महत्त्व सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी जानेवारी महिन्यापासून पाणलोट यात्रा काढण्यात येणार असल्याचं, मृद आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी सांगितलं आहे. ते काल छत्रपती संभाजीनगर इथं, जल व भूमी व्यवस्थापन संस्था-वाल्मीत बैठक झाल्यानंतर पत्रकारांशी बोलत होते.   वाल्मीला गतवैभव प...

December 27, 2024 3:15 PM

views 12

बॉर्डर-गावस्कर करंडक कसोटी क्रिकेट मालिकेत भारताच्या पाच बाद १६४ धावा

ऑस्ट्रेलियात मेलबर्न इथं सुरू असलेल्या बॉर्डर-गावस्कर करंडक कसोटी क्रिकेट मालिकेतल्या चौथ्या सामन्याच्या आज दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात सर्व बाद ४७४ धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजी गडगडली. विराट कोहली आणि के एल राहुल हे दोघं अनुक्रमे ३६ आणि २४ धावांवर बाद झाले....

December 26, 2024 3:36 PM

views 21

ठाण्यात टेम्पोमधून ८ लाख ४२ हजार रुपयांचा गुटखा जप्त

ठाणे पोलिसांनी एका टेम्पोमधून ८ लाख ४२ हजार रुपयांचा गुटखा जप्त केला. काल संध्याकाळी भिंवडीतल्या कारीवाली पोलीस चौकीत हा टेम्पो आढळला होता. त्याची तपासणी केली असता त्यातून अवैध गुटख्याची वाहतूक होत असल्याचे आढळले. ठाणे पोलिसांनी ड्रायव्हरलाही अटक केली आहे.  

December 26, 2024 3:28 PM

views 13

भारताच्या दक्षिण किनाऱ्यावर आलेल्या त्सुनामीला आज २० वर्षे पूर्ण

भारताच्या दक्षिण किनाऱ्यावर २६ डिसेंबर २००४ रोजी आलेल्या त्सुनामीला आज २० वर्षे पूर्ण झाली. या त्सुनामीमुळे तामिळनाडु आणि पुद्दुचेरीमध्ये हजारो लोकांचा मृत्यू झाला होता. इंडोनेशियातल्या सुमात्रा बेटांजवळ ९ पूर्णांक १ रिक्टर स्केलच्या भूकंपांमुळे आलेली त्सुनामी, ही इतिहासातल्या सर्वात भीषण नैसर्गिक आ...