December 27, 2024 7:11 PM

views 22

रत्नागिरी पंचायत समितीचे माजी सभापती सुहास वामन यांचं निधन

रत्नागिरी पंचायत समितीचे माजी सभापती आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सुहास वामन, उर्फ कुमार शेट्ये यांचं आज दुपारी रत्नागिरी इथं निधन झालं. ते ७० वर्षांचे होते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून त्यांनी विविध क्षेत्रांमध्ये आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला....

December 27, 2024 7:11 PM

views 31

वायव्य आणि मध्य भारताच्या काही भागात मेघगर्जनेसह वादळी वारे

वायव्य आणि मध्य भारताच्या काही भागात आज मेघगर्जनेसह वादळी वारे आणि गारपिटीचा अंदाज असून, हवामान विभागानं या भागाला ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेशचा पश्चिम भाग, पूर्व राजस्थान आणि पश्चिम मध्य प्रदेशात अतिवृष्टी आणि गारपिटीची शक्यता असल्याचं हवामान वि...

December 27, 2024 6:58 PM

views 14

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या २६ प्रभागांत क्षयरोग निर्मूलन मोहीम

राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम अंतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातल्या २६ प्रभागांत  मोहिम सुरू असून ती १०० दिवस चालणार आहे.  आहे. या कालावधीत निःक्षय प्रतिज्ञेचं वाचन, निक्षय शिबीर, शाळा आणि महाविद्यालयांत विविध स्‍पर्धा आणि कार्यक्रमांद्वारे निक्षय सप्‍ताह साजरा केला जात आहे.

December 27, 2024 6:55 PM

views 37

कोल्हापूर जिल्ह्यात उद्यापासून ९ जानेवारीपर्यंत जमावबंदी आदेश जारी

कोल्हापूर  जिल्ह्यात यात्रा, उत्सव, विविध पक्षांची आंदोलन सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातली कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी संजय तेली यांनी संपूर्ण जिल्ह्यात उद्या सकाळी ६ वाजल्यापासून ९ जानेवारी २०२५ ला रात्री १२ वाजेपर्यंत जमावबंदी आदेश जारी केला आहे. हा हुकूम सर्व जाती...

December 27, 2024 6:50 PM

views 29

मुंबईत धुळीचं वातावरण, पालिकेची प्रदूषण रोखण्यासाठीची अंमलबजावणी सुरू

मुंबईच्या वातावरण आज धुळीनं व्यापलं होते. काही अंतरावरील वाहने, इमारती पुसट दिसत होत्या. शहरात आज दिवसभर ढगाळ वातावरण होतं. अशा वातावरणामुळे श्वसनाचा त्रासात वाढ झाली आहे.    पालिकेने प्रदूषण रोखण्यासाठी उपाय योजनांच्या अंमलबजावणी सुरू केली आहे. मुंबई महापालिकेने २४ विभागांत मिस्‍ट कॅनॉन संयंत्...

December 27, 2024 4:02 PM

views 20

नववर्षी मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे विशेष रेल्वे गाड्या चालवणार

नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे विशेष रेल्वे गाड्या चालवणार आहे. मध्य रेल्वेवर विशेष रेल्वे गाडी सीएसएमटी स्थानकातून आणि कल्याणहून पहाटे दीड वाजता सुटेल. हार्बर मार्गावर ही विशेष रेल्वे गाडी सीएसएमटी आणि पनवेल इथून पहाटे दीड वाजता सुटेल. पश्चिम रेल्वे...

December 27, 2024 3:59 PM

views 30

भारत-अमेरिकेतल्या धोरणात्मक भागीदारीच्या प्रगतीवर तसंच जागतिक घडामोडींवर चर्चा

परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर यांनी काल रात्री वॉशिंग्टन डीसी इथं अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिव्हान यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांनी भारत-अमेरिकेतल्या धोरणात्मक भागीदारीच्या प्रगतीवर आणि सध्याच्या प्रादेशिक तसंच जागतिक घडामोडींवर चर्चा केली. डॉ. जयशंकर २४ डिसेंबरपासून सहा दिवसांच्...

December 27, 2024 3:59 PM

views 6

राष्ट्रीय नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत विजयवीर सिद्धूला विजेतेपद

तुलघकाबाद इथं झालेल्या ६७व्या राष्ट्रीय नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत विजयवीर सिद्धूने पुरुषांच्या २५ मीटर रॅपिड फायर पिस्तुल प्रकारात विजेतेपद पटकावलं. तसंत नेमबाज गुरप्रीत सिंगने रौप्यपदक तर शिवम शुक्लाने कास्यपदक जिंकलं आहे.

December 27, 2024 8:34 PM

views 9

मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती, प्रधानमंत्र्यांकडून शोक व्यक्त

माजी प्रधानमंत्री डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. डॉ सिंग हे अशा दुर्मिळ राजकारण्यांपैकी एक होते, ज्यांनी शैक्षणिक आणि प्रशासकीय अशा दोन्ही विश्वात आपला ठसा उमटवला, असं राष्ट्रपतींनी आपल्या...

December 27, 2024 7:13 PM

views 25

महिला क्रिकेटमधे भारताचा ३-० असा मालिका विजय

भारतीय महिला क्रिकेट संघानं वेस्ट इंडिजविरुद्धची एकदिवसीय मालिका ३-० अशी जिंकली.  वडोदरा इथं आज झालेल्या तिसऱ्या आणि अखेरच्या एकदिवसीय सामन्यात भारतानं वेस्ट इंडिजवर पाच गडी राखून विजय मिळवला. वेस्ट इंडिजनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ३८ षटकात सर्वबाद १६२ धावा केल्या. भारतानं अवघ्या २८ षटकां...