July 20, 2024 8:21 PM

views 21

राफेल नदालची स्वीडीश खुल्या टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक

राफेल नदालने स्वीडीश खुल्या टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. क्रोएशियाच्या ड्युए आजुकोविकचा त्यानं ४-६, ६-३, आणि ६-४ असा तीन सेट्स मधे पराभव केला. दुसऱ्या उपांत्य सामन्यात तियागो ऑगस्टीन तिरांते आणि नुनो बोर्जेस यांच्यात लढत होत असून, त्यातल्या विजेत्याचा सामना अंतिम फेरीत नदालबरोबर होईल...

July 20, 2024 7:56 PM

views 28

भारतात कोरोना महामारीत अत्याधिक मृत्युदर दर्शवणारा ‘सायन्स ऍडव्हान्सेस’ नियतकालिकातला अहवाल तथ्यहिन

भारतात २०२० मध्ये कोविड -१९ महामारीत अत्याधिक मृत्युदर दर्शवणारा ‘सायन्स ऍडव्हान्सेस’ या नियतकालिकातला अहवाल तथ्यहिन असल्याचं सरकारनं म्हटलं आहे. नियतकालिकात प्रकाशित अहवाल चुकीचा असून लेखकांच्या  कार्यपद्धतीत गंभीर त्रुटी असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे. अहवालातील दाव्यात सुसंगती नस...

July 20, 2024 7:34 PM

views 23

मनोज जरांगे यांचं पुन्हा आमरण उपोषण सुरू

मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून जालना जिल्ह्यातल्या अंतरवाली सराटी या गावात पुन्हा आमरण उपोषण सुरू केलं आहे. उपोषणाला सुरुवात करण्यापूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सगेसोयरेंची अंमलबजावणी करावी, मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावे, तसंच तीनही गॅझेट लागू करावे या माग...

July 20, 2024 7:32 PM

views 27

राज्यात अनेक ठिकाणी पावसाच्या सरी

राज्यात आज अनेक जिल्ह्यात पावसानं जोरदार हजेरी लावली. रायगड, साताऱ्यातील घाट परिसर, नागपूर, वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यासाठी आज हवामान विभागानं रेड अलर्ट जारी केला आहे.   रायगड जिल्ह्यात सर्व नद्यांना पूर आले असून रोह्यात कुंडलिका नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे. रोह्याजवळ भिसे खिंडीत दरड कोसळल...

July 20, 2024 7:13 PM

views 23

राज्यात महाविकास आघाडीच्या बाजूने कल असल्याचा शरद पवार यांचा दावा

राज्यात जनतेने ज्यांच्या हातात सत्ता दिली त्यांच्याकडून जनतेचे प्रश्न सुटले नाहीत. आता जनतेने महाविकासआघाडीकडून अपेक्षा ठेवल्या असून मविआ राज्याला स्थिर सरकार देईल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला. ते पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत ह...

July 21, 2024 11:18 AM

views 32

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला केंद्रात आज सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे. यानिमित्तानं केंद्र सरकारनं आज सर्वपक्षीय बैठक आयोजित केली आहे. दोन्ही सदनांचं कामकाज या अधिवेशन काळात सुरळीत होण्यासाठी सर्व पक्षांनी सहकार्य करावं, असं आवाहन या बैठकीत करण्यात येणार आहे. हे अधिवेशन 12 ऑगस्टपर्यंत चालणार असून, मंगळवारी 23 त...

July 20, 2024 7:51 PM

views 19

भाजपाचं उद्या पुण्यात महाअधिवेशन

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाचं महाअधिवेशन उद्या पुण्यात होणार असून यासाठी केंद्रीय मंत्री अमित शाह आणि नितीन गडकरी उपस्थित राहणार आहेत. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत याबाबत माहिती दिली. यावेळी माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे उपस्थित हो...

July 21, 2024 11:30 AM

views 26

जागतिक वारसा समितीचं ४६वं अधिवेशनाचं आज प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

जागतिक वारसा समितीचं ४६ वं अधिवेशन आजपासून नवी दिल्लीतल्या भारत मंडपम इथं सुरू होत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सायंकाळी ७ वाजता याचं उद्घाटन होणार आहे. या उद्घाटन सोहळ्यात युनेस्कोच्या महासंचालक ऑड्रे अझोले आणि युनेस्को जागतिक वारसा सचिवालयातले वरिष्ठ अधिकारी तसंच विविध देशातले सांस...

July 20, 2024 8:52 PM

views 16

बांगलादेशातून १ हजार भारतीय विद्यार्थी मायदेशी सुखरूप परत

बांगलादेशमध्ये सध्या सुरू असलेल्या हिंसक संघर्षाच्या काळात बांगलादेशातून सुमारे एक हजार भारतीय विद्यार्थी सुखरूप परत आले आहेत. यापैकी ७७८ विद्यार्थी जलमार्गाने, तर सुमारे दोनशे विद्यार्थी हवाई मार्गाने भारतात परत आल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयानं दिली आहे. ढाका इथलं भारताचं उच्चायुक्तालय, तसंच चि...

July 20, 2024 3:58 PM

views 16

वेस्ट बँक आणि पूर्व जेरुसलेममधली इस्राएलची उपस्थिती बेकायदेशीर – संयुक्त राष्ट्राचे आंतरराष्ट्रीय न्यायालय

वेस्ट बँक आणि पूर्व जेरुसलेममधली इस्राएलची उपस्थिती बेकायदेशीर असल्याचं संयुक्त राष्ट्राच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. गाझा आणि वेस्टबँकमधला भूप्रदेश हस्तगत करण्याच्या इस्रायलच्या धोरणालाही न्यायालयाने चुकीचं ठरवलं असून या प्रदेशातली कार्यवाही तातडीनं थांबवण्याचा सल्ला दिला आहे. न्य...