July 20, 2024 3:54 PM

views 39

भूतानमध्ये तिसरी भारत-भूतान विकास सहकार्य चर्चा

परराष्ट्र व्यवहार सचिव विक्रम मिस्त्री आणि भूतानचे परराष्ट्र व्यवहार सचिव आउम पेमा छोद्जोन यांच्या सहअध्यक्षतेखाली तिसरी भारत-भूतान विकास सहकार्य चर्चा आज भूतानमध्ये झाली. या बैठकीत १३ व्या पंचवार्षिक योजना कालावधी अंतर्गत विकास भागीदारीची विविध क्षेत्रे, त्यातलं सहकार्य आणि कार्यान्वयनाचे मार्ग, या...

July 20, 2024 3:35 PM

views 37

भाजपाच्या अधिवेशनात ५,३०० प्रतिनिधी उपस्थित राहणार – भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे

पुण्यात उद्या होणाऱ्या भाजपाच्या अधिवेशनात ५ हजार ३०० प्रतिनिधी उपस्थित राहणार असल्याची माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. महाविकास आघाडी सत्तेत आल्यास महायुतीनं नागरिकांच्या कल्याणासाठी सुरु केलेल्या सर्व योजना ते बंद करतील, असं बा...

July 20, 2024 7:14 PM

views 20

मुंबईतल्या धारावी पुनर्वसन प्रकल्पाची निविदा रद्द करण्याची उद्धव ठाकरे यांची मागणी

मुंबईतल्या धारावी पुनर्वसन प्रकल्पाची अदानी समूहाला दिलेली निविदा रद्द करून पुन्हा पारदर्शक पद्धतीनं निविदा काढावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते.   धारावीकरांना त्यांच्या हक्काचं ५०० चौरस फुटांचं हक्काचं घर तिथेच मिळायला पाहिजे, ही आप...

July 20, 2024 3:19 PM

views 26

रांचीची सुरभी कुमारीला नीट-यूजी प्रवेशपरीक्षा पेपरफुटी प्रकरणी निलंबित

रांचीच्या राजेंद्र वैद्यकीय विज्ञान संस्थेनं एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षाला शिकणाऱ्या सुरभी कुमारीला नीट-यूजी प्रवेशपरीक्षा पेपरफुटी प्रकरणी निलंबित केलं आहे. तसंच परीक्षेच्या काळातल्या सुरभीच्या कृत्यांची चौकशी करण्यासाठी पाच सदस्यांच्या समितीचीही स्थापना संस्थेनं केली आहे. केंद्रीय अन्वेषण संस्थेनं ...

July 20, 2024 3:15 PM

views 21

बांगलादेशात हिंसक आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरात संचारबंदी लागू

बांगलादेशात गेल्या काही दिवसांपासून पसरलेल्या हिंसक आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसंच लष्कर तैनात करण्यात आलं आहे. बांगलादेशातल्या सरकारी नोकऱ्यांमधल्या आरक्षणाच्या धोरणात सुधारणा करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी काही दिवसांपूर्वी आंदोलन पुकारलं होतं...

July 20, 2024 3:00 PM

views 21

केंद्रिय गृहमंत्री अमित शाह रांचीच्या दौऱ्यावर

केंद्रिय गृहमंत्री अमित शाह आज झारखंडची राजधानी रांचीच्या दौऱ्यावर जाणार आहेत. भाजपाच्या कार्यकारी समितीच्या बैठकीला ते आज संबोधित करतील, तसंच पक्षाच्या राज्यातल्या महत्वाच्या नेत्यांशी आणि कार्यकर्त्यांशी ते चर्चा करणार आहेत.

July 20, 2024 8:51 PM

views 23

‘नीट-यूजी’ परीक्षेच्या केंद्रनिहाय निकालाची माहिती जाहीर

वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीच्या ‘नीट-यूजी’ परीक्षेच्या केंद्रनिहाय निकालाची माहिती आज एनटीए अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेने आपल्या संकेतस्थळावर जाहीर केली. एनटीएने आज दुपारी १२ वाजेपर्यंत शहर आणि केंद्रनिहाय निकालाची माहिती संकेतस्थळावर जाहीर करावी, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले ह...

July 20, 2024 2:49 PM

views 29

रत्नागिरी आणि चंद्रपूर जिल्ह्यासाठी आज रेड अलर्ट जारी

महाराष्ट्रात आज मुसळधार पाऊस पडत असून हवामान विभागानं रत्नागिरी आणि चंद्रपूर जिल्ह्यासाठी आज रेड अलर्ट जारी केला आहे. विदर्भात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे. नागपूर, चंद्रपूर, अमरावतीमध्ये जोरदार पाऊस सुरू असून अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचलं होतं. त्याचा परिणाम वाहतुकीवर झाल्यानं चाकरमान्यांची...

July 20, 2024 2:45 PM

views 26

हैतीच्या उत्तर किनाऱ्याजवळ जहाजाला लागलेल्या आगीत ४० स्थलांतरितांचा मृत्यू

हैतीच्या उत्तर किनाऱ्याजवळ एका जहाजाला लागलेल्या आगीत किमान ४० स्थलांतरितांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. या प्रवासात किमान ८० जण प्रवास करत होते. हैतीहून दीडशे मैलावर असलेल्या टर्क्स अँड कॅकॉस बेटाच्या दिशेनं हे जहाज निघालं होतं. हैतीच्या तटरक्षक दलानं ४१ स्थलांतरितांची सुटका केली असून...

July 20, 2024 1:59 PM

views 29

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भाग घेणाऱ्या ११७ भारतीय खेळाडूंमध्ये सशस्त्र दलाचे २४ जवान

पॅरिस इथं येत्या सोमवारपासून सुरू होत असलेल्या ऑलिंपिक क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या ११७ भारतीय खेळाडूंमध्ये चोवीस सशस्त्र दलाचे जवान सहभागी होणार आहेत. सुप्रसिद्ध भालाफेकपटू आणि २०२० मधल्या टोकियो ऑलिंपिक मधला सुवर्णपदक विजेता सुभेदार नीरज चोप्रा याच्यासह एकूण २२ पुरुष आणि दोन महिला खेळाडू य...