July 21, 2024 10:42 AM

views 23

नीट परीक्षा प्रश्नपत्रिकाफुटी प्रकरणात आणखी तीन आरोपींना सीबीआयकडून अटक

केंद्रीय प्रवेश परीक्षा प्रश्नपत्रिकाफुटीप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागानं आणखी तीन संशयित आरोपींना अटक केली आहे. यापैकी दोघे राजस्थानच्या भरतपूर वैद्यकीय महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाच मे रोजी झालेल्या परीक्षेच्या दिवशी या दोघा आरोपींच्या उपस्थितीची तांत्रिक पुष...

July 21, 2024 10:30 AM

views 18

बांग्लादेशातल्या हिंसाचाराच्या पार्श्वभुमीवर, एक हजार भारतीय विद्यार्थी सुरक्षित मायदेशी परत

बांग्लादेशात आरक्षणाविरोधात सुरू असलेल्या हिंसक निदर्शनांच्या पार्श्वभुमीवर, तिथले अंदाजे एक हजार भारतीय विद्यार्थी काल मायदेशी परतले. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, 778 विद्यार्थी जलमार्गानं तर दोनशे विद्यार्थी ढाका आणि चितगाँग विमानतळावरून सुटणाऱ्या नियमित विमानसेवेद्वारे मायद...

July 20, 2024 8:44 PM

views 15

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या सदस्यसंख्येत मे महिन्यात १९ लाख ५० हजारांची भर

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या सदस्यसंख्येत गेल्या मे महिन्यात १९ लाख ५० हजारांची भर पडली आहे. मे २०२४मधे नवीन ९ लाख ८५ हजार पगारदारांनी संघटनेचं सदस्यत्व घेतलं. गेल्या वर्षीच्या मे महिन्यात नोंदल्या गेलेल्या सदस्यसंख्येच्या तुलनेत ही संख्या साडे अकरा टक्क्यांनी जास्त आहे.

July 20, 2024 8:37 PM

views 42

हरयाणाचे काँग्रेस आमदार सुरेंद्र पवार यांना ईडीकडून अटक

हरयाणामधले कॉँग्रेसचे आमदार सुरेंद्र पवार यांना आज सक्तवसुली संचालनालयाने अटक केली. त्यांच्यावर यमुनानगर भागात अवैध खाणकाम आणि आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. त्यांना अंबाला जिल्हा आणि सत्र न्यायालयासमोर हजर करण्यात आलं. सक्तवसुली संचालनालयाने १४ दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी केली होती, मात्र ...

July 20, 2024 8:33 PM

views 31

नागपूरच्या १३७ गावांमध्ये बीएसएनएलची 4-जी सेवा उपलब्ध

महाराष्ट्रातल्या नागपूर जिल्ह्यातल्या १३७ गावांमध्ये जेथे कुठलीही मोबाईल सेवा नव्हती तेथे बीएसएनएलची 4 -जी सेवा आता उपलब्ध होत आहे. देशात 4-जी स्तरावरची मोबाईल सेवा असली पाहिजे या उद्देशाने देशातल्या १ लाख गावांपैकी ज्या ३४ हजार गावात कोणतीही सेवा नव्हती त्याठिकाणी बीएसएनएलच्या 4 जी सेक्युरेशन प्रोज...

July 20, 2024 8:30 PM

views 27

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा न्यूझीलंडचे प्रधानमंत्री ख्रिस्तोफर लक्सन यांच्याशी दूरध्वनीद्वारे संवाद

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज न्यूझीलंडचे प्रधानमंत्री ख्रिस्तोफर लक्सन यांच्याशी दूरध्वनीद्वारे संवाद साधला. नजीकच्या भविष्यात दोन्ही देशांना नव्या उंचीवर नेण्यासाठी द्विपक्षी सहकार्याच्या वचनबद्धतेचा त्यांनी पुनरुच्चार केला. दोन्ही देशांमध्ये विविध क्षेत्रांत परस्परसंमतीनं द्विपक्षी सहकार्य क...

July 20, 2024 8:27 PM

views 23

महिलांच्या आशिया चषक टी 20 क्रिकेट स्पर्धेत थायलंडचा मलेशियावर २२ धावांनी विजय

श्रीलंका इथं सुरू असलेल्या महिलांच्या आशिया चषक टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत आज थायलंडने मलेशियावर २२ धावांनी विजय मिळवला. रंगिरी दांबुला आंतरराष्ट्रीय मैदानात झालेल्या या सामन्यात थायलंडने मलेशियासमोर १३४ धावांचं उद्दिष्ट ठेवलं होतं, मात्र मलेशियाला ८ गडी गमावून १११ धावांपर्यंतच मजल मारता आली. याच म...

July 20, 2024 8:11 PM

views 18

मोदी सरकारच्या निर्णयामुळे कृषी आणि सहकार क्षेत्र अधिक बळकट झालं – राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ

सहकार क्षेत्रासाठी नवीन मंत्रालय स्थापन करून केंद्रातील मोदी सरकारनं गेल्या १० वर्षात घेतलेल्या निर्णयांमुळे कृषी आणि सहकार क्षेत्र अधिक बळकट होत असल्याचं केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आज पुण्यात सांगितलं. वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकार व्यवस्थापन संस्थेच्या वार्षिक पदवीदान समारंभात प...

July 20, 2024 8:03 PM

views 27

चीन : मुसळधार पावसामुळे पूल नदीत कोसळून ११ जणांचा मृत्यू

चीनच्या उत्तरेकडे मुसळधार पावसामुळे महामार्गावरील पूल नदीत कोसळून झालेल्या दुर्घटनेत ११ जणांचा मृत्यू झाला. शान्क्सी प्रांतात काल रात्री हा अपघात घडला. बचावकार्य सुरू आहे. महामार्गावरची सुमारे २० वाहनं आणि ३० जण या दुर्घटनेनंतर बेपत्ता आहेत.

July 20, 2024 8:01 PM

views 16

आदिवासी शेतकरी आणि पद्मश्री विजेत्या कमला पुजारी यांचं निधन

सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन देणाऱ्या ओडिशातल्या आदिवासी शेतकरी आणि पद्मश्री विजेत्या कमला पुजारी यांचं आज मूत्रपिंडाच्या विकारानं निधन झालं. त्या ७४ वर्षांच्या होत्या. राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांनी कमला पुजारी यांच्या निधनाबद्दल समाजमाध्यमांवर शोक व्यक्त केला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही पुजा...