November 11, 2025 3:11 PM

views 32

दर्यापूर कृषी बाजार समितीत कापूस खरेदीला प्रारंभ

अमरावतीत दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत भारतीय कपास निगमतर्फे यंदाच्या हंगामातल्या कापूस खरेदीला आज प्रारंभ झाला. या टप्प्यात १० ते १५ कापूस गाड्यांची आवक बाजार समितीत झाली आहे. यंदा ८ टक्के आर्द्रता असलेल्या कापसाला ८ हजार १० रुपये प्रतिक्विंटल तर १२ टक्के आर्द्रता असलेल्या कापसाला ७ हजार ६८९ र...

November 11, 2025 7:53 PM

views 704

राज्यातल्या विविध महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी आरक्षण सोडत जाहीर

राज्यातल्या विविध महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी आज आरक्षण सोडती जाहीर झाल्या. परभणी महानगरपालिकेतल्या १६ प्रभागांसाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागास प्रवर्ग आणि सर्वसाधारण- महिला तसंच सर्वसाधारण अशा प्रवर्गांचं आरक्षण निश्चित करण्यात आलं.  छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीसाठी आज स...

November 11, 2025 3:02 PM

views 41

जहाल नक्षलवाद्याचं गोंदिया पोलिसांपुढं आत्मसमर्पण

राज्य सरकारच्या नक्षल आत्मसमर्पण योजनेला प्रतिसाद देत जहाल नक्षलवादी, आणि दलम सदस्य कोसा मंगलू उईका, उर्फ वर्गेश यानं काल  गोंदिया पोलिसांपुढं आत्मसमर्पण केलं. लहानपणापासूनच तो नक्षलवादी चळवळीत सक्रिय होता. त्याच्यावर साडेतीन लाख रुपयांचं बक्षीस होतं. माओवादी संघटनेत होणारा त्रास आणि अत्याचाराला कंट...

November 11, 2025 1:41 PM

views 33

ISSF Championships: १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात सम्राट राणाला सुवर्णपदक

इजिप्तमध्ये कैरो इथे सुरू असलेल्या आय एस एस एफ जागतिक नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत पुरुषांच्या १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात सम्राट राणा याने काल सुवर्णपदक जिंकलं. त्याने २४३ पूर्णांक ७ गुणांची कमाई केली. एअर पिस्तुल गटात वैयक्तिक जागतिक विजेतेपद मिळवणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे.   याच स्प...

November 11, 2025 1:37 PM

views 160

ब्रिटिश लेखक डेविड सॅले यांच्या ‘फ्लेश’ या कादंबरीला यंदाचा ‘बुकर पुरस्कार’

हंगेरी वंशाचे ब्रिटिश लेखक डेविड सॅले यांच्या फ्लेश या कादंबरीला २०२५ चा प्रतिष्ठित असा बुकर पुरस्कार जाहीर झाला. लंडनमध्ये काल झालेल्या कार्यक्रमात या पुरस्काराची घोषणा झाली. रोख ५० हजार पाऊंड असं या पुरस्काराचं स्वरुप आहे.    सॅले यांच्या फ्लेश या कादंबरीतून हंगेरीतील हाऊसिंग इस्टेटपासून लंडन...

November 11, 2025 1:24 PM

views 64

दिल्लीत स्फोट घडवून आणणाऱ्या दोषींवर कठोर कारवाईचा प्रधानमंत्र्यांचा इशारा

दिल्लीत लाल किल्ला परिसरात स्फोट घडवून आणणाऱ्या दोषींवर अत्यंत कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सांगितलं. भूतान इथं एका कार्यक्रमात ते बोलत होते. काल रात्रीपासून स्फोटाचा तपास करणाऱ्या यंत्रणांकडून सातत्यानं माहिती घेत असून या स्फोटामागच्या खऱ्या सुत्रधाराला तपा...

November 11, 2025 3:17 PM

views 45

दिल्लीत झालेल्या स्फोटानंतर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठक

लाल किल्ला इथल्या स्फोटानंतर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक झाली. शहा यांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीला केंद्रीय गृह सचिव,  गुप्तचर विभागाचे प्रमुख, दिल्ली पोलिस आयुक्त, राष्ट्रीय तपास संस्थेचे महासंचालक उपस्थित होते. जम्मू आणि का...

November 11, 2025 1:28 PM

views 43

भारत – भूतान यांच्यातले संबंध भविष्यातही वृद्धिंगत होतील – प्रधानमंत्री मोदी

प्रधानमंत्री मोदी दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी आज सकाळी भूतानमध्ये दाखल झाले. भूतानचे प्रधानमंत्री त्शेरिंग तोबगे यांनी मोदी यांचं विमानतळावर स्वागत केलं. अनेक शतकांपासून भारत आणि भूतान मधले सांस्कृतिक, राजकीय संबंध अतिशय चांगले असून भविष्यातही ते वृद्धिंगत होतील, असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ...

November 11, 2025 3:14 PM

views 152

Bihar Elections : दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी मतदानाला सुरुवात

बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यातल्या मतदानाला आज सकाळी सुरुवात झाली. दुपारी १ वाजेपर्यंत ४७ पूर्णांक ६२ टक्के इतकं मतदान झालं होतं.    बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याच्या मतदानासाठी १२२ मतदारसंघात ४५ हजार मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत. या टप्प्यात १ हजार ३...

November 11, 2025 1:38 PM

views 27

दहशतवाद्यांना शस्त्रास्त्रासाठी निधी पुरवणाऱ्यांविरोधात शून्य सहिष्णुता धोरण अवलंबवण्याची भारताची संयुक्त राष्ट्रांना विनंती

दहशतवाद्यांना शस्त्रास्त्रासाठी निधी पुरवणाऱ्यांविरोधात शून्य सहिष्णुता धोरण अवलंबवावं अशी विनंती भारातानं संयुक्त राष्ट्रांना केली आहे. भारत गेली अनेक दशकं दहशतवादाशी लढत असल्याचं भारताचे संयुक्त राष्ट्रसंघातले स्थायी प्रतिनिधी, राजदूत पार्वतनेनी हरीश म्हणाले. गैर राज्यसंस्था गटांना आणि दहशतवादी सं...