August 13, 2024 7:55 PM

views 18

तरंग शक्ती सरावादरम्यान स्वदेशी बनावटीच्या तेजस लढाऊ विमानानं दाखवली आपल्या क्षमतेची झलक

तरंग शक्ती या, देशातल्या सर्वात मोठ्या बहुराष्ट्रीय लष्करी सरावादरम्यान तेजस या स्वदेशी बनावटीच्या हलक्या लढाऊ विमानानं जगातल्या अत्याधुनिक लढाऊ विमानांच्या बरोबरीनं आपल्या क्षमतेची झलक दाखवली. तमिळनाडूच्या सुलूर हवाई तळावर झालेल्या या सरावात राफेल, युरोफायटर टायफून यासारख्या परदेशी लढाऊ विमानांच्या...

August 13, 2024 7:50 PM

views 24

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते अहमदाबादमध्ये तिरंगा यात्रेचे उद्घाटन

९ ऑगस्टपासून सुरु झालेल्या हर घर तिरंगा अभियानाचं चैतन्यपूर्ण स्वरूप देशभरात दिसून येत आहे. नागरिकांमध्ये एकता आणि राष्ट्राभिमान यांची जोपासना करण्याच्या हेतूने आज संध्याकाळी अहमदाबाद इथं तिरंगा यात्रा झाली. या यात्रेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे सहभागी झाले होते.  गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र प...

August 13, 2024 7:38 PM

views 17

कोळसा उत्पादन वाढवण्यासाठी केंद्रसरकारची महत्त्वाकांक्षी योजना

देशात कोळसा उत्पादन वाढवण्याची महत्त्वाकांक्षी योजना केंद्रसरकारने आखली आहे. जागतिक पातळीवर खाण उद्योगात कार्यरत कंपन्यांकडे हे काम सोपवण्यात येणार आहे. त्यामुळे अद्ययावत तंत्रज्ञान आणि कार्यक्षमता उपलब्ध होईल असं केंद्रीय कोळसा मंत्रालयाच्या पत्रकात म्हटलं आहे. या कंपन्या कोळसा उत्खननाबरोबरच पुनर्व...

August 13, 2024 7:04 PM

views 16

राज्यातील सरकारी अधिकारी आणि कर्मचारी येत्या २९ तारखेपासून बेमुदत संपावर जाणार

राज्यातील सरकारी अधिकारी आणि कर्मचारी येत्या २९ तारखेपासून बेमुदत संपावर जाणार आहेत. जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी नेमलेल्या समितीचा अहवाल स्वीकारून ही सरकार त्यावर अंतिम निर्णय घेत नसल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन पुकारत असल्याचं राजपत्रित अधिकारी महासंघाकडून सांगण्यात आलं आहे. यासंदर्भात मुख्यमं...

August 13, 2024 7:01 PM

views 27

भारतीय रिझर्व्ह बँकेकडून आर्थिक साक्षरता वाढवण्यासाठी बचत गटांसाठी कार्यशाळांचे आयोजन

महिलांमधे आर्थिक साक्षरता वाढवण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक कार्यशाळा आयोजित करते. कोल्हापूर जिल्ह्यातल्या आजरा, भुदरगड आणि राधानगरी तालुक्यातील बचत गटांसाठी घेण्यात आलेल्या कार्यशाळांत फसवणुकीसाठी वापरल्या जात असलेल्या वेगवेगळ्या प्रकारांची आणि त्यापासून वाचण्यासाठीच्या उपायांची माहिती देण्यात आली. ...

August 13, 2024 6:46 PM

views 29

कोलकात्यात महिला डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्याप्रकरणाच्या निषेधार्थ निवासी डॉक्टरांचं आज काम बंद आंदोलन

राज्यात विविध सार्वजनिक रुग्णालयांतल्या निवासी डॉक्टरांनी आज काम बंद आंदोलन सुरू केलं. मुंबईत मार्डच्यावतीने सकाळी साडेदहा वाजल्यापासून केईएम, नायर, सायन कुपर या रुग्णालयांमध्ये आंदोलन सुरू करण्यात आलं आहे. कोलकाता इथल्या वैद्यकीय महाविद्यालयात महिला निवासी डॉक्टरवर झालेला बलात्कार आणि  हत्या प्रकरण...

August 13, 2024 6:22 PM

views 25

राज्यात सर्वत्र हर घर तिरंगा अभियानानिमित्त विविध कार्यक्रमाचं आयोजन

हर घर तिरंगा या अभियानाचा एक भाग म्हणून नागपूर महापालिकेनं आज तिरंगा मॅरथॉनचं आयोजन केलं होतं. सहायक आयुक्तांनी या मॅरेथॉनला हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं.  नागरिक या मॅरेथॉनमध्ये मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते.   छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वेरुळ इथं आज शालेय विद्यार्थ्यांनी शंभर फूट तिरंगा घेऊन ...

August 13, 2024 6:18 PM

views 15

नोंदणीकृत नसलेल्या टेलीमार्केटर्स कंपन्यांकडून ग्राहकांना जाणारे जाहिरातीसाठीचे दूरध्वनी त्वरित थांबवण्याचा ट्रायच्या सूचना

नोंदणीकृत नसलेल्या टेलीमार्केटर्स कंपन्यांकडून ग्राहकांना जाणारे जाहिरातीसाठीचे दूरध्वनी त्वरित थांबवावेत अशी सूचना  ट्राय अर्थात दूरसंचार नियामक आयोगाने सर्व इंटरनेट सेवा पूरवठादार कंपन्यांना केली आहे.  दूरसंचार सेवेचा वाणिज्य उपयोजन कॉलसाठी बेकायदा वापर होत असल्यास असे वापरकर्ते इंटरनेट सेवा पुरवठ...

August 13, 2024 6:13 PM

views 25

नैसर्गिक आपत्ती प्रतिबंधक १ हजार ९५० कामांना मंजुरी

नैसर्गिक आपत्ती रोखण्यासाठी प्रभावी उपायोयजना करण्यासाठी २ हजार ७६६ कोटी रुपये खर्चाच्या एकूण १ हजार ९५० कामांना आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं आज मंजुरी दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला.  दरड - वीज कोसळणे, पूर, यापासून संरक्षणासाठी भिंत, पुलांचं बां...

August 13, 2024 4:11 PM

views 35

खोट्या कथनांचा फटका महायुतीच्या उमेदवारांना बसला मात्र, विधानसभेवेळी अशा प्रकारच्या घटनांना कडाडून विरोध करा – मंत्री उदय सामंत

लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी रचलेल्या खोट्या कथनांचा फटका महायुतीच्या उमेदवारांना बसला. मात्र, विधानसभेवेळी अशा प्रकारच्या घटनांना कडाडून विरोध करा, असं आवाहन उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज केलं. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या नेत्यांची समन्वय बैठक नाशिक इथं झाली, त्यावेळी त...