August 14, 2024 9:03 AM

views 25

बीडच्या शेतकऱ्यांचा पीक विमा ३१ ऑगस्टपूर्वी वितरीत करा – कृषीमंत्री धनंजय मुंडे

बीड जिल्ह्यात २०२३-२४ च्या खरीप आणि रब्बी हंगामातल्या उर्वरित २२ कोटी तीन लाख रुपयांचं वितरण विमा कंपनीने कोणतंही कारण न देता ३१ ऑगस्टच्या आत पूर्ण करावे, असे निर्देश कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहेत. यासंदर्भातल्या बैठकीत ते काल बोलत होते. या वर्षासाठी एकूण ४०० कोटी २४ लाख रुपये पीकविमा आतापर...

August 14, 2024 8:59 AM

views 19

लातूर जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांवर तिरंगा फडकवून उपक्रमाला सुरुवात

हर घर तिरंगा अभियानांतर्गत लातूर इथं जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयावर ध्वज फडकावून या उपक्रमाला सुरुवात झाली. जिल्ह्यातल्या शासकीय, निमशासकीय कार्यालयांवर काल तिरंगा ध्वज फडकवण्यात आला.   हिंगोली इथं नगर परिषदेचे मुख्यधिकारी अरविंद मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत '...

August 14, 2024 11:41 AM

views 16

मुंबई महानगरपालिकेत प्रभाग स्तरावर ‘तिरंगा यात्रा’

मुंबई महानगरपालिकेत प्रभाग स्तरावर ‘तिरंगा यात्रा’ काढण्यात आली. महानगरपालिका मुख्यालय ते गेट वे ऑफ इंडियापर्यंत निघालेल्या तिरंगा यात्रेत, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर सहभागी झाले होते. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनीही ठिकठिकाणच्या तिरंगा यात्रांमध्...

August 14, 2024 10:35 AM

views 15

लाडकी बहीण योजनेमुळे महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार आहेत, यामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेला बळ, महिला सक्षमीकरणाला चालना मिळणार असल्याचं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. काल जळगाव इथं महिला सक्षमीकरण मेळाव्यात ते बोलत होते. लाडकी बहीण योजनेबरोबर राज्यातल्या विकास कामांना ...

August 13, 2024 8:15 PM

views 37

मराठवाड्यातल्या इनाम आणि देवस्थानच्या जमिनी वर्ग एक करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

मराठवाड्यातल्या खालसा झालेल्या वर्ग दोनच्या इनाम आणि देवस्थानच्या जमिनी वर्ग एक करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने  आज घेतला आहे. त्यामुळे या जमिनी ताब्यात असणाऱ्यांच्या मालकीच्या होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बेठकीत हा निर्णय घेण्यात आला. वर्ग दोन च्य...

August 13, 2024 8:14 PM

views 14

ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार

राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत प्रदान करण्यात येणारे विविध पुरस्कार जाहीर झाले आहेत. ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांना २०२४ सालचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर झाला आहे. भारतरत्न पंडीत भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवन गौरव पुरस्कार आरती अंकलीकर-टिकेकर यांना जाहीर झाला आहे....

August 13, 2024 8:10 PM

views 12

स्वातंत्र्य दिनासाठी लाल किल्ल्यावर ४०० पंचायती राज प्रतिनिधी आमंत्रित

केंद्र सरकारने येत्या १५ ऑगस्ट रोजी नवी दिल्लीतल्या स्वातंत्र्य दिन सोहळ्याला पंचायती राज संस्थांच्या निवडून आलेल्या चारशे प्रतिनिधींना विशेष पाहुणे म्हणून लाल किल्ल्यावर आमंत्रित केलं आहे. त्यात महिला प्रतिनिधींचा समावेश आहे. पंचायती राज मंत्रालयानं उद्या नवी दिल्लीत पंचायतींमधल्या महिला नेतृत्वावि...

August 13, 2024 8:18 PM

views 22

राष्ट्रपती भवनात अमृत उद्यान २०२४चं उद्या उद्घाटन

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या राष्ट्रपती भवनात वार्षिक उन्हाळी अमृत उद्यान २०२४चं उद्घाटन करणार आहेत. हे ​​उद्यान १५ सप्टेंबरपर्यंत जनतेसाठी खुलं राहणार आहे. उद्यानातल्या काही प्रमुख आकर्षणांत बोन्साय गार्डन, सेंट्रल लॉनमधील दुर्मिळ आणि विदेशी फुलांचे लँडस्केप, लांबलचक रोझ गार्डन, भव्य वटवृक्ष, ट्...

August 13, 2024 8:04 PM

views 18

कोलकाता डॉक्टर हत्या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याचे कोलकाता उच्च न्यायालयाचे निर्देश

कोलकाता इथल्या वैद्यकीय महाविद्यालयात महिला निवासी डॉक्टरवर बलात्कार आणि  हत्या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याचे निर्देश कोलकाता उच्च न्यायालयानं आज दिले. पोलिसांनी या प्रकरणाशी संबंधित सर्व कागदपत्र तात्काळ सीबीआय कडे सोपवावीत असे निर्देश न्यायालयानं दिले. तसंच राज्यसरकारला  आतापर्यंत केलेल्या तपासा...

August 13, 2024 8:01 PM

views 10

वक्फ दुरुस्ती विधेयकाविषयी संयुक्त संसदीय समितीच्या अध्यक्षपदी जगदंबिका पाल यांची नियुक्ती

लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी वक्फ दुरुस्ती विधेयक २०२४ साठी गठीत करण्यात आलेल्या  संयुक्त संसदीय समितीच्या अध्यक्षपदावर भाजपा  खासदार जगदंबिका पाल यांची नियुक्ती केली आहे. विधेयकावर पुढल्या पडताळणीसाठी ३१ सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली असून, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्याच्या शेव...