August 13, 2024 4:06 PM

views 17

कवी नर्मद साहित्य पुरस्कार यंदा ज्येष्ठ साहित्यिक बाबा भांड आणि ईश्वरलाल परमार यांना जाहीर

  राज्य गुजराती साहित्य अकादमीचा कवी नर्मद पुरस्कार यंदा ज्येष्ठ साहित्यिक बाबा भांड आणि ईश्वरलाल परमार यांना जाहीर झाला आहे. गुजराती साहित्य अकादमी तर्फे दरवर्षी प्रत्येकी एक मराठी आणि गुजराती साहित्यिकांना कवी नर्मद पुरस्काराने गौरवण्यात येतं. येत्या २४ ऑगस्ट रोजी सांस्कृतिक कार्य मंत्री सुधी...

August 13, 2024 4:55 PM

views 24

विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांना कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा

विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांना कॅबिनेट मत्रीपदाचा दर्जा देण्यात आला आहे, सामान्या प्रशासन विभाग राजशिष्टाचाराच्या २ ऑगस्टच्या निर्णयानुसार हा दर्जा दिल्याची माहिती  राज्य विधानमंडळ सचिवालयाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. नीलम गोऱ्हे या सन २००२ पासून विधानपरिषदेच्या सदस्या असून सध्या त...

August 13, 2024 3:56 PM

views 22

उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपनेते अव्दय हिरे यांची आज सुटका हेाणार

शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते अद्वय हिरे यांना उच्च न्यायालयानं जामीन मंजुर केला असून त्यांची आज नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहातून सुटका होणार आहे. त्यांच्यावर २०१३ मध्ये नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष असताना त्यांनी स्वत:च्या रेणूका सूतगिरीणीचं ज्यादा मुल्यांकन दाखवून कर्...

August 13, 2024 4:45 PM

views 22

मुंबईत आंतरराष्ट्रीय दर्जाचे ‘अहिल्या भवन’ उभारणार – मंत्री मंगल प्रभात लोढा

मुंबईत मानखुर्द इथं अहिल्या भवन उभारणार असल्याची घोषणा मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आज केली. जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं भवन उभारलं जाईल असं ते म्हणाले. या इमारतीत महिला आयोग आणि बालहक्क आयोगाचे मुंबई विभागाचं कार्यालय असेल. ३५ हजार ५०० चौरस मीटर इतक्या...

August 13, 2024 4:50 PM

views 22

पतंजलीवरील अवमानाचा खटला सर्वोच्च न्यायलयाकडून बंद

योगगुरु बाबा रामदेव आणि पतंजली आयुर्वेदचे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बालकृष्ण यांच्या विरुद्धचा अवमानाचा खटला सर्वोच्च न्यायलयाने बंद केला आहे. दिशाभूल करणाऱ्या जाहिराती केल्याप्रकरणी पतंजली उद्योगाने न्यायलयात दाखल केलेला माफीनामा आणि वृत्तपत्रांमार्फत प्रसिद्ध केलेली जाहीर माफी याचना न्यायालयाने स...

August 13, 2024 1:48 PM

views 37

अमेरिकेतले भारतीय राजदूत म्हणून विनय मोहन क्वात्रा यांनी पदभार स्वीकारला

अमेरिकेतले भारतीय राजदूत म्हणून विनय मोहन क्वात्रा यांनी काल आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. भारत आणि अमेरिका यांच्यातली भागीदारी मजबूत करण्यासाठी जोमाने काम करत राहू, असं त्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे.

August 13, 2024 1:45 PM

views 22

येत्या दोन दिवसात देशाच्या काही भागात जोरदार पाऊस

येत्या दोन दिवसांत देशाच्या मध्य, दक्षिण आणि ईशान्य भागात जोरदार पावसाची शक्यता असून हवामान विभागानं या ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. राजस्थान, उत्तरप्रदेश, पूर्व आणि ईशान्य भारतात तुरळक ठिकाणी पुढले ७ दिवस जोरदार पावसाची शक्यता असून पूर्व राजस्थानमध्ये अती जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं ...

August 13, 2024 1:41 PM

views 37

कॅनबेरा इथं सहाव्या भारत-ऑस्ट्रेलिया सागरी सुरक्षा संवादाचं आयोजन

ऑस्ट्रेलियामध्ये कॅनबेरा इथं आज भारत-ऑस्ट्रेलिया सागरी सुरक्षा संवाद आयोजित करण्यात आला होता. सर्वसमावेशक विकास  आणि जागतिक कल्याणासाठी सागरी क्षेत्रात सुरक्षित वातावरण कायम ठेवण्याच्या विविध मार्गांवर यावेळी चर्चा झाली. हिंद-प्रशांत महासागर क्षेत्रातली सुरक्षा, सागरी क्षेत्राबाबत जागरूकता, मानवतावा...

August 13, 2024 1:39 PM

views 18

देशाच्या अर्थव्यवस्थेत मत्स्यव्यवसायाचं मोठं योगदान – मंत्री राजीव रंजन सिंह

मच्छिमारांचा व्यवसाय वाढावा आणि त्यांना सुरक्षितता मिळावी, यासाठी केंद्रसरकार खोल समुद्रात मासेमारी करणाऱ्या १ लाख जहाजांवर ट्रान्सपॉन्डर्स बसवणार आहे. मत्स्यव्यवसाय क्षेत्रात अंतराळ तंत्रज्ञानाचा वापर या विषयावर नवी दिल्लीमध्ये आयोजित राष्ट्रीय परिषदेत केंद्रीय मत्स्यव्यवसाय मंत्री राजीव रंजन सिंह ...

August 13, 2024 1:25 PM

views 29

मध्यप्रदेश हे विद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकिनसाठी रोख रक्कम देणारं पहिलं राज्य

विद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकिनसाठी रोख रक्कम देणारं मध्यप्रदेश हे देशातलं पहिलं राज्य ठरलं आहे. कर्नाटक, राजस्थान, आणि दिल्ली या राज्यांमध्ये विद्यार्थिनींना मोफत सॅनिटरी नॅपकिन्स दिली जातात, मात्र मध्यप्रदेशमध्ये स्वच्छता आणि आरोग्य  योजने  अंतर्गत ७ वी ते १२ वी च्या विद्यार्थिनींच्या खात्यात थेट र...