August 20, 2024 5:53 PM

views 24

महाराष्ट्र राज्य समिती या नव्या पक्षाची स्थापना करण्याची बीआरएसचे राज्याचे प्रमुख शंकर धोंडगे यांची घोषणा

भारत राष्ट्र समितीने राज्यात विधानसभा निवडणूक लढवायला नकार दिल्याने पक्षाचा त्याग करून महाराष्ट्र राज्य समिती या नव्या पक्षाची स्थापना करण्याची घोषणा बीआरएसचे राज्याचे प्रमुख शंकर धोंडगे यांनी केली. ते आज नांदेडमध्ये वार्ताहरांशी बोलत होते. ५ सप्टेंबर रोजी नांदेडमध्ये ए्मआरएस या पक्षाचं अधिवेशन होणा...

August 20, 2024 3:33 PM

views 32

शाळांमध्ये विशाखा समित्या बंधनकारक होणार

मुलींच्या सुरक्षेसाठी राज्यात सर्व शाळांमध्ये विशाखा समित्या स्थापन करणं बंधनकारक करण्याचे आदेश आजच जारी करण्यात येणार असल्याचं शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितलं. बदलापूर येथील अत्याचाराची घटना उघडकीस आल्यानंतर मंत्रालयात शिक्षण विभागाची तातडीची बैठक घेण्यात आली. या बैठकीनंतर माध्यमांशी...

August 20, 2024 3:46 PM

views 36

अकोला जिल्ह्यातल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या नावांची यादी ई पंचनामा पोर्टलवर अपलोड करण्याचं सुरू

गेल्या वर्षी फेब्रुवारी आणि एप्रिल महिन्यात झालेल्या अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यांमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानासाठी अकोला जिल्ह्यातल्या २७ हजार ६८० शेतकऱ्यांसाठी शासनामार्फत ५४ कोटी ५५ लाख रुपयांची मदत मंजूर झाली आहे. या मदतीच्या अनुषंगाने जिल्ह्यातल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या नावांची य...

August 20, 2024 3:51 PM

views 17

माजी प्रधानमंत्री दिवंगत राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त आज सर्वत्र सद्भावना दिवसाचे कार्यक्रम

देशाचे माजी प्रधानमंत्री दिवंगत राजीव गांधी यांची आज ८० वी जयंती असून हा दिवस सद्‌भावना दिवस म्हणून पाळला जातो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ही समाजमाध्यमावरून राजीव गांधी यांना आदरांजली वाहिली. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नवी दिल्लीत वीर भूमी या राजीव गांधी यांच्या समाधीस्थळी जाऊन पुष्पांजली...

August 20, 2024 7:17 PM

views 19

राष्ट्रीय भू-विज्ञान पुरस्कार २०२३ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान

नैसर्गिक आपत्तींमुळे होणारी जीवितहानी रोखण्यासाठी अशा आपत्तींची पूर्वसूचना देणारी यंत्रणा सक्षम आणि अचूक करण्याची गरज असल्याचं मत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज मांडलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज प्रतिष्ठेचे राष्ट्रीय भू विज्ञान पुरस्कार २०२३ प्रदान केले. केंद्रीय कोळसा आणि खाण काम मंत्र...

August 20, 2024 1:38 PM

views 26

जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याची अधिसूचना जारी

जम्मू-काश्मीरच्या विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी आज निवडणूक आयोगानं आज अधिसूचना  जारी केली. पहिल्या टप्प्यात १८ सप्टेंबरला  मतदान होणार असून त्यात पुलवामा, अनंतनाग, शोपियां, कुलगाम, रामबन, किश्तवाडा आणि डोडा जिल्ह्यांतील २४ विधानसभेच्या जागांचा समावेश आहे. निवडणूक आयोगानं पम्पोर,त्राल,पुल...

August 20, 2024 1:20 PM

views 25

लायबेरियाचे उपराष्ट्रपती जेरेमिया कपान कोंग दिल्लीत दाखल

नवी दिल्लीत होणाऱ्या १९ व्या CII भारत आफ्रिका व्यापारी परिषद सहभागी होण्यासाठी लायबेरियाचे उपराष्ट्रपती जेरेमिया कपान कोंग आज दिल्लीत दाखल झाले. कोंग यांच्या भारत दौऱ्यामुळे उभय देशांमधील संबंध अधिक दृढ होतील, असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी समाज माध्यमावरील पोस्टमध्ये नमूद के...

August 20, 2024 1:21 PM

views 30

भारत आणि मलेशिया यांच्यात व्यापार वाढवणं महत्वाचं – मंत्री पियूष गोयल

भारत आणि मलेशिया यांच्या दरम्यान व्यापार वाढवणं महत्वाचं असल्याचं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियूष गोयल यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत झालेल्या भारत-मलेशिया सीईओ मंचावरुन ते बोलत होते. दोन्ही देशातल्या उद्योग आणि व्यापाराला बळकटी देण्यासाठी सहकार्याची गरज त्यांनी व्यक्त केली. शिक्षण, आरोग्य, ...

August 20, 2024 1:16 PM

views 27

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्यापासून पोलंड आणि युक्रेनच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्यापासून पोलंड आणि युक्रेनच्या तीन दिवसीय दौऱ्यावर असतील. नवी दिल्लीत काल झालेल्या पत्रकार परिषदेत परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव तन्मय लाल यांनी ही माहिती दिली. ४५ वर्षांनंतर भारतीय प्रधानमंत्री पोलंडला भेट देणार असल्यानं हा दौरा महत्त्वाचा असल्याचं मंत्रालयानं म्हटल...

August 20, 2024 1:52 PM

views 18

येत्या चार दिवसात देशात मुसळधार पावसाचा अंदाज

देशाच्या विविध भागात मोसमी पाऊस पुन्हा सक्रीय झाला असून येत्या चार दिवसात देशाच्या पूर्व,पश्चिम, वायव्य भागात तसंच मध्य भारतात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. याशिवाय दक्षिणेकडील द्विपकल्प भागातही उद्यापर्यंत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.  तसंच जम्मू, हिमाचल ...