November 20, 2025 7:28 PM

views 38

मतदार यादी पुनरीक्षणाच्या दुसऱ्या टप्पात ५० कोटींहून अधिक अर्ज वितरित

नोव्हेंबर महिन्याच्या ४ तारखेला मतदार यादी पुनरीक्षणाचा दुसरा टप्पा सुरू झाल्यापासून ५० कोटींहून अधिक गणना अर्ज वितरित करण्यात आले असल्याची माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाने दिली आहे.   उत्तर प्रदेशात सर्वाधिक म्हणजे १५ कोटी ३७ लाख गणना अर्ज वितरित करण्यात आले आहेत. तर पश्चिम बंगालमध्ये ७ कोटी ६४...

November 20, 2025 9:02 PM

views 30

विश्वचषक मुष्टियुद्ध स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय महिलांना सुवर्ण पदक

उत्तर प्रदेशातल्या नॉयडा इथं विश्वचषक मुष्टियुद्ध स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आज अरूंधती चौधरी, प्रीति पवार, मीनाक्षी हुदा आणि नुपुर शेरॉन या भारतीय महिला मुष्टियोद्ध्यांनी सुवर्ण कामगिरी केली. ७० किलो वजनी गटात अरूंधतीनं उझबेकिस्तानच्या अझिजा झोकिरोवाचा ५-० असा सपशेल पराभव केला. प्रीतिनं ५४ किलो वजन...

November 20, 2025 6:49 PM

views 39

मुंबईत वायू प्रदूषण नियंत्रणासाठीच्या मार्गदर्शक तत्त्वांचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईचे निर्देश

मुंबईत वायू प्रदूषण नियंत्रणासाठी मुंबई महानगरपालिकेनं जारी केलेल्या २८ मार्गदर्शक तत्त्वांचं  उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करावी, असे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त शहर डॉ. अश्विनी जोशी यांनी दिले आहेत. विविध उपाययोजनांच्या अंमलबजावणीसाठी महानगरपालिकेडून प्रत्येक प्रशासकीय विभाग स्तरा...

November 20, 2025 5:43 PM

views 37

कर्णबधिरांच्या ऑलिंपिक स्पर्धेत भारतीय गोल्फपटू दीक्षा डागरनं पटकावलं सुवर्णपदक

जपानमध्ये टोक्यो इथं सुरू असलेल्या कर्णबधिरांच्या ऑलिंपिक स्पर्धेत भारतीय गोल्फपटू दीक्षा डागर हिने सुवर्णपदक मिळवलं आहे. तिने उर्वरित २१ खेळाडूंपेक्षा अधिक गुण मिळवत ही सुवर्णपदकाची कमाई केली. नेमबाजी स्पर्धेत भारताच्य ५० मीटर प्रोन प्रकारात भारताच्या महित संधू याने रौप्यपदक जिंकलं आहे. नेमबाजीत भा...

November 20, 2025 3:27 PM

views 48

नाशिक शहरात तपोवन इथं आगामी कुंभमेळ्यासाठी साधुग्राम साकारण्यात येणार

नाशिक शहरात तपोवन इथं आगामी कुंभमेळ्यासाठी साधुग्राम साकारण्यात येणार आहे. त्यासासाठी सतराशे झाडं तोडण्याचा प्रस्ताव असून एका तोडलेल्या झाडाच्या बदल्यात दहा झाडं प्रशासनाच्या वतीने लावण्यात येतील अशी माहिती कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी आज नाशिकमध्ये दिली. वृक्षतोडीच्या विरोधात पर्यावरणप्रेमींनी...

November 20, 2025 3:04 PM

views 62

पुणे-माणगाव रस्त्यावर ताम्हिणी घाटात झालेल्या अपघातात ४ जणांचा मृत्यू

पुणे - माणगाव मार्गावर ताम्हिणी घाटात झालेल्या अपघातात चौघांचा मृत्यू झाला असून दोन जण बेपत्ता आहे. परवा रात्री ही घटना घडलेल्या या अपघाताची माहिती आज समोर आली.   चालकाचे नियंत्रण सुटल्यानं गाडी दरीत कोसळली. या वाहनातल्या तरुणांशी संपर्क होत नसल्यानं त्याच्या पालकांनी शोध सुरू केल्यावर हा अपघात झाल्...

November 20, 2025 2:57 PM

views 26

विद्यार्थ्यांसाठी भारतीय टपाल सेवेक विशेष स्टुडंट मेल योजना सुरू

विद्यार्थांना शैक्षणिक सामग्री, प्रवेश अर्ज आणि तत्सम कागदपत्रं पाठवण्यासाठी आता भारतीय टपाल सेवेनं विशेष स्टुडंट मेल योजना सुरू केली आहे. या योजनेत विद्यार्थ्यांना टपाल सेवेच्या शुल्कावर १० टक्के सूट मिळणार आहे.   त्यासाठी विद्यार्थ्यांना आपल्या संबंधित शैक्षणिक संस्थेचं विद्यार्थी ओळखपत्र आणि...

November 20, 2025 2:46 PM

views 33

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अर्थसंकल्पपूर्व नववी बैठक घेतली

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अर्थसंकल्पपूर्व नववी बैठक घेतली. यात त्यांनी पर्यटन आणि आदरातिथ्य क्षेत्रातल्या व्यावसायिक आणि तज्ञांशी चर्चा केली.   यावेळी अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी, अर्थ मंत्रालयाच्या सचिव अनुराधा ठाकूूर आणि पर्यटन मंत्रालयाचे मुख्य आर्थिक सल्लागार ज्ञानेश भूष...

November 20, 2025 1:45 PM

views 22

बांगलादेशात पुन्हा एकदा काळजीवाहू सरकार प्रणाली लागू करण्याचा निर्णय

बांगलादेशात पुन्हा एकदा काळजीवाहू सरकार प्रणाली लागू करण्याचा निर्णय तिथल्या सर्वोच्च न्यायालयाच्या अपिलीय विभागाने दिला आहे. १४ व्या सार्वत्रिक निवडणुकीपासून काळजीवाहू सरकार प्रणाली लागू होईल.   १० मे २०११ ला सर्वोच्च न्यायालयाने काळजीवाहू सरकार प्रणाली बंद केली होती. या निर्णयाचा येणाऱ्या सार...

November 20, 2025 1:40 PM

views 23

युएईच्या नागरिकांसाठी आंतरराष्ट्रीय विमानतळांवर व्हिसा-ऑन-अरायव्हल सुविधा उपलब्ध

भारतानं संयुक्त अरब अमिराती अर्थात युएईच्या नागरिकांसाठी कोचीन, कालिकत आणि अहमदाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळांवर व्हिसा-ऑन-अरायव्हल सुविधा उपलब्ध केली आहे. यामुळं आता युएईच्या नागरिकांना आता भारतातील नऊ प्रमुख विमानतळांवर ही सुविधा उपलब्ध झाली आहे. पूर्वी ही सुविधा नवी दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई, ब...