November 9, 2024 8:06 PM

views 22

वायू गुणवत्ता व्यवस्थापन आयोगाच्या अध्यक्षांची आज नवी दिल्लीत बैठक

ग्रेडेड रिस्पॅान्स ऍक्शन प्लॅन अंतर्गत वायू प्रदूषणाचा सामना करण्यासाठी उचलेल्या पावलांचा आढावा घेण्यासाठी वायू गुणवत्ता व्यवस्थापन आयोगाच्या अध्यक्षांनी आज नवी दिल्लीत बैठक घेतली. दिल्लीचे मुख्य सचिव आणि दिल्ली सरकारच्या संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी या बैठकीत सहभागी झाले होते. तक्रारींचे जलद नि...

November 9, 2024 8:00 PM

views 18

हज यात्रा सुखकर आणि सुलभ व्हावी या दृष्टीनं केंद्र सरकारनं अनेक धोरणांची केली अंमलबजावणी

हज यात्रा अधिक सुखकर आणि सुलभ व्हावी या दृष्टीनं केंद्र सरकारनं अनेक धोरणांची अंमलबजावणी केली आहे. यात्रेकरूंच्या सोईसाठी डिजिटल पायाभूत सेवा सुरू केल्यानं अधिक जणांना त्याचा लाभ मिळत आहे. विशेषतः अधिकाधिक महिला यात्रेकरूंना स्वतंत्रपणे यात्रा करणं शक्य झाल्यानं महिला समानतेला चालना मिळत आहे. याशिवा...

November 9, 2024 7:42 PM

views 14

मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ

मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली असून, राज्याच्या उर्वरित भागात तापमान सरासरीच्या जवळपास नोंदवलं गेलं. येत्या दोन दिवसांत संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा पुणे वेधशाळेचा अंदाज आहे.

November 9, 2024 7:39 PM

views 4

सी-व्हिजिल ॲपवर ३ हजार ७६४ तक्रारी प्राप्त

राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाल्यापासून आजपर्यंत सी-व्हिजिल ॲपवर ३ हजार ७६४ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यापैकी ३ हजार ७३४ तक्रारी निकाली काढल्याची माहिती निवडणूक आयोगानं दिली आहे. याशिवाय राज्य आणि केंद्र शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांनी केलेल्या कारवाईत बेकायदा पैसे, दारू,...

November 9, 2024 7:37 PM

views 23

बीड विधानसभा मतदारसंघात गृह मतदानाला आज सकाळपासून सुरुवात

बीड विधानसभा मतदारसंघात गृह मतदानाला आज सकाळपासून सुरुवात झाली. हे गृह मतदान उद्या संध्याकाळी ५ वाजेपर्यंत सुरु राहणार आहे. गडचिरोली जिल्ह्यातल्या आरमोरी विधानसभा क्षेत्रातील देसाईगंज येथील १०१ वर्षीय श्रीमती ताराबाई शेंडे यांनी गृहमतदान सुविधेचा लाभ घेत आज आपला मतदानाचा हक्क बजावला.

November 9, 2024 7:35 PM

views 14

देशातल्या ७ शैक्षणिक संस्थांना क्वाकरेली सिमोंड्स जागतिक मानांकनात आशिया विभागात पहिल्या १०० मधे स्थान

देशातल्या ७ शैक्षणिक संस्थांना क्वाकरेली सिमोंड्स जागतिक मानांकनात आशिया विभागात पहिल्या १०० मधे स्थान मिळालं आहे. त्यात आयआयटी मुंबईला ४८वा क्रमांक मिळाला आहे. आयआयटी दिल्लीला ४४ वा क्रमांक मिळाला असून आयआयटी मद्रास, आयआयटी खरगपूर, आयआयटी कानपूर, भारतीय विज्ञान संस्था, दिल्ली विद्यापीठ यांचा समावेश...

November 9, 2024 7:10 PM

views 27

विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मतदान जनजागृतीसाठी राज्यात विविध कार्यक्रम आयोजित

मुंबईत अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघात आज सकाळी ‘सायकल रॅली’ आणि पथनाट्यातून जनजागृती करण्यात आली. विलेपार्ले इथल्या दुभाषी मैदानातून सायकल रॅलीची सुरुवात झाली. यावेळी रॅलीत सहभागी झालेल्या सर्वांना ‘स्वीप’ उपक्रमा अंतर्गत मतदान करण्यासाठी शपथ देण्यात आली.   स्वीप अंतर्गत मतदार जनजागृतीसाठी म...

November 9, 2024 7:00 PM

views 26

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठीचा प्रचार शिगेला

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांसाठीच्या प्रचारानं कमालीचा वेग घेतला आहे. विविध राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या प्रचारसभा आणि पत्रकार परिषद आज राज्यभरात होत आहेत. वृत्तपत्र, वृत्तवाहिन्या आणि इतर समाजमाध्यम व्यासपीठांवर आपापली भूमिका मांडून उमेदवार आणि त्यांच्या पक्षांचे प्रचारक मतदारांपर्यंत पो...

November 9, 2024 6:49 PM

views 24

महाराष्ट्रातल्या मतदारांनी देशभक्ती, राजकीय समज आणि दूरदृष्टी दाखवून भाजपाला सलग १० वर्षं सर्वाधिक पसंती दिली – प्रधानमंत्री

महाराष्ट्रानं २०१४ ते २०२४ अशी दहा वर्षं भाजपाला सातत्यानं संधी दिली, महाराष्ट्रवासीयांची देशभक्ती, राजकीय समज आणि दूरदृष्टी यातून दिसते, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. अकोला इथं एका प्रचारसभेत ते बोलत होते. महाराष्ट्राच्या नागरिकांनी दाखवलेल्या या विश्वासामुळे महाराष्ट्राची...

November 9, 2024 6:54 PM

views 41

महायुुतीचं सरकार आल्यानंतर राज्यातली प्रशासन व्यवस्था कोलमडली – मल्लिकार्जुन खर्गे यांची टीका

काँग्रेसनं कायमच लोकशाही आणि संविधान यांचं रक्षण आणि संवर्धन केलं आहे, असं काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी अमरावती इथं प्रचारसभेत सांगितलं. विचारावर, तत्वावर, कामावर टीका करावी व्यक्तिगत टीका करु नये, असंही ते म्हणाले.  नरेंद्र मोदींनी खोटी आश्वासनं दिली, शेतकऱ्यांना हमीभाव, मह...